AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IRCTC चं साऊथ इंडिया Tour Package : अवघ्या 25 हजार रुपयांपासून सुरुवात

आयआरसीटीसी झोनल ऑफिस मुंबई एक साऊथ इंडिया टूर पॅकेज ऑफर करत आहे. या पॅकेजमध्ये अनेक जागांना भेट दिली जाणार आहे.

IRCTC चं साऊथ इंडिया Tour Package : अवघ्या 25 हजार रुपयांपासून सुरुवात
Tourist Guides
| Updated on: Feb 18, 2021 | 7:46 PM
Share

मुंबई : आयआरसीटीसी अर्थात (Indian Railway Catering and Tourism Corporation) झोनल ऑफिस मुंबई एक साऊथ इंडिया टूर पॅकेज ऑफर करत आहे. या पॅकेजमध्ये अनेक जागांना भेट दिली जाणार आहे. त्यात रामेश्वरम, मदुराई, कन्याकुमारी, तिरुवअनंतपुरम अशा ठिकाणांचा समावेश आहे. IRCTCच्या या टूर पॅकेजद्वारे तुम्ही दक्षिण भारताची टूर प्लॅन करु शकता.(IRCTC’s South India Tour Package)

कोणत्या ठिकाणांना भेट दिली जाणार?

रामेश्वरम

चारधामपैकी एक असलेल्या रामेश्वरला या टूर पॅकेजद्वारे तुम्ही भेट देऊ शकता. हे 12 ज्योर्तिलिंगापैकी एक देवस्थान आहे. हे ठिकाण हिंदी महासागर आणि बंगालच्या खाडीने चारही बाजूंनी वेढलेला एक सुंदर द्वीप आहे.

मदुराई

मदुराई हे ठिकाण प्राचीन शहरांपैकी आहे. या ठिकाणाला अनेक नावांनी ओळखलं जातं. कुडल मानगर, कधीही न झोपणारं शहर, मोगऱ्याचं शहर, पूर्वचं एथेंस अशा नावांनीही हे शहर ओळखलं जातं. हे ठिकाण वैगई नदीच्या किनाऱ्यावर स्थानप झालेलं आहे.

कन्याकुमारी

हिंदी महासागर, बंगालची खाडी आणि अरबी समुद्राच्या संगमाचं स्थान म्हणजे कन्याकुमारी. हे तिनही समुद्र आपल्या वेगळ्या रंगासह इथे भेटतात. भारत्या दक्षिण टोकाला वसलेलं हे शहर अनेक वर्षांपासून कला, संस्कृती आणि सभ्यतेचं प्रतिक आहे. हे शहत भारताच्या पर्यटन स्थळांच्या यादीत समाविष्ट आहे. इथं सुर्योदय आणि सूर्यास्त खूप चांगल्या प्रकारे पाहायला मिळतो.

तिरुवअनंतपुरम

केरळची राजधानी असलेलं तिरुवअनंतपुरमला त्रिवेंद्रमच्या नावानेही ओळखलं जातं. या शहराला देवांची नगरी म्हणूनही ओळखलं जातं. या शहराला महात्मा गांधी यांनी नित हरा शहर अशी ओळख दिलेली आहे.

पॅकेजचं विवरण

1. पॅकेजचं नाव – साऊथ इंडिया टूर (South India Tour)

2. टॅव्हलिंग मोड – फ्लाईट

3. किती दिवसांसाठी – 5 रात्र आणि 6 दिवस

4. टूर इटिनेररी – मूंबई- मदुरई- रामेश्वरम- कन्याकुमारी- तिरुवनंतपुरम – मूंबई

5. क्लास – कंफर्ट

6. तारीख – 09.03.2021 ते 14.03.2021

7. मील प्लॅन – ब्रेकफास्ट आणि डिनर

8. प्रवासाची सुरुवात कुठून? – मुंबई

पैकेज कॉस्ट कलास- कंफर्ट

कॅटेगरी

1.) अडल्ट ऑन सिंगल ऑक्यूपेंसी – 37 हजार 800 रुपये

2.) अडल्ट ऑन डबल ऑक्यूपेंसी – 27 हजार 500 रुपये

3.) अडल्ट ऑन ट्रिपल ऑक्यूपेंसी- 25 हजार 400 रुपये

4.) चाइल्ड विथ बेड ( 2 से 11 साल) – 22 हजार 600 रुपये

5.) चाइल्ड विथआउट बेड ( 2 से 11 साल) – 18 हजार 600 रुपये

कॅन्सलेशन पॉलिसी –

1. डिपार्चर डेटपासून 21 दिवस आधी – पॅकेज कॉस्टवर 30 टक्के

2. डिपार्चर डेटपासून 21 ते 15 दिवस आधी – पैकेज कॉस्टवर 55 टक्के

3. डिपार्चर डेटपासून 14 ते 8 दिवस आधी – पैकेज कॉस्टवर 80 टक्के

4. डिपार्चर डेटपासून 7 से 0 दिवस आधी – पैकेज कॉस्टवर 100 टक्के

संबंधित बातम्या :

Corona Guidelines | कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा धोका वाढला, आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नव्या गाईडलाईन्स जारी

कोरोना काळात पहिल्यांदाच अनारक्षित मेल/एक्सप्रेस विशेष गाड्या धावणार; काय असेल खास?

IRCTC’s South India Tour Package

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.