Corona Guidelines | कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा धोका वाढला, आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नव्या गाईडलाईन्स जारी

यात्रेपूर्वी एअर सुविधा पोर्टलवर सेल्फ डिक्लेरशन फॉर्म जमा करावा लागेल. कोव्हिड निगेटीव्ह RT-PCR टेस्ट रिपोर्टही अपलोड करावी लागणार.

Corona Guidelines | कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा धोका वाढला, आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नव्या गाईडलाईन्स जारी
प्रवाशांसाठी नव्या गाईडलाईन्स

नवी दिल्ली : आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नव्या गाईडलाईन्स (New Guidelines For Air Travellers) जारी केल्या आहेत. या गाईडलाईन्स 2 ऑगस्ट 2020 च्या जुन्या गाईडलाईन्सला रिप्लेस करतील आणि या गाई़डलाईन्स 22 फेब्रुवारीच्या रात्री 11.59 वाजेपासून लागू होतील (New Guidelines For Air Travellers).

गाईडलाईन्सनुसार, यात्रेपूर्वी एअर सुविधा पोर्टलवर सेल्फ डिक्लेरशन फॉर्म जमा करावा लागेल. कोव्हिड निगेटीव्ह RT-PCR टेस्ट रिपोर्टही अपलोड करावी लागणार. हा रिपोर्ट 72 तासांपेक्षा जुना नसावा.

गाईडलाईन्सनुसार, सर्व प्रवाशांना RT-PCR टेस्ट रिपोर्टच्या ऑथेन्टिसिटीचं डिक्लेरेशन देणेही गरजेचं असेल. जर हे खोटं आढळून आलं तर दंडात्मक कारवाई होईल. सोबतच प्रवाशांना आपल्या एअरलाईनच्या माध्यमातून एअर सुविधा पोर्टल या उड्डयण मंत्रालयाला ही अंडरटेकिंग देणं गरजेचं असेल. गरज असल्यास तो 14 दिवसांसाठी होम क्वारंटाईन किंवा सेल्फ हेल्थ मॉनिटरिंगच्या निर्णयाला मानतील.

या लोकांना दिलासा

गाईडलाईनमध्ये त्या लोकांना दिलासा देण्यात आला आहे, जे आपल्या कुटुंबातील कुठल्या सदस्‍याच्या मृत्यू झाल्याने भारतात येत आहेत. अशा लोकांना कुठल्याही नकारात्मक आरटी-पीसीआर रिपोर्टची गरज नसेल. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या वाढत्या धोक्याला पाहता या नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आलेल्या आहेत (New Guidelines For Air Travellers).

23 मार्चपासून नियमित आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान सेवा स्थगित

कोरोना व्हायरस महामारी दरम्यान गेल्या 23 मार्चपासून नियमित आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान सेवा स्थगित आहे. तर, वंदे भारत अभियान आणि एअर बबल सिस्टमअंतर्गत मे महिन्यापासून काही निश्चित देशांसाठी विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या संचालनाची परवानगी दिली आहे. भारताने अमेरिका, ब्रिटेन, सऊदी अरब, केनिया, भुटान आणि फ्रान्ससह 24 देशांसोबत एअर बबल करार केला.

New Guidelines For Air Travellers

संबंधित बातम्या :

Jayant Patil | राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कोरोनाची लागण

वर्धा जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता! 5 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास बंदी

पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढतायत, लॉकडाऊन लागणार? महापौर मोहोळ म्हणतात…

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI