AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुगल एआय आणि 12.5 तासांच्या बॅटरी लाईफसह Asus Chromebook CX15 लॅपटॉप भारतात लाँच

असूसने भारतीय बाजारपेठेत नवीन क्रोमबुक CX15 सादर केला आहे. हा लॅपटॉप गूगल एआय फीचर्स, दीर्घ बॅटरी लाईफ आणि क्रोमओएससह येतो. चला तर मग आजच्या लेखात आपण या लॅपटॉपची किंमत

गुगल एआय आणि 12.5 तासांच्या बॅटरी लाईफसह Asus Chromebook CX15 लॅपटॉप भारतात लाँच
| Edited By: | Updated on: Aug 05, 2026 | 4:28 PM
Share

असूसने भारतात त्यांचा नवीन क्रोमबुक CX15 लॅपटॉप लाँच केला आहे. हा लॅपटॉप क्रोमओएस, इंटेल एन50 प्रोसेसर, 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह येतो. यात 15.6-इंचाचा फुल एचडी अँटी-ग्लेअर डिस्प्ले, वाय-फाय 6 आणि गूगल एआय प्रो मेंबरशिप आहे. कंपनीचा दावा आहे की या लॅपटॉपची बॅटरी एकदा चार्ज केल्यावर 12.5 तासांपर्यंत टिकू शकते. तसेच यात मिलिटरी-ग्रेड टिकाऊपणा देखील आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण या लॅपटॉपची किंमत त्यावरील ऑफर्स आणि उपलब्धता याबद्दल जाणून घेऊयात.

असूस क्रोमबुक CX15: किंमत, ऑफर्स आणि उपलब्धता

असूस क्रोमबुक CX15 भारतात 47 हजार 990 या किमतीत लाँच करण्यात आला आहे. तो प्युअर ग्रे रंगात उपलब्ध असेल. ग्राहक दरमहा 3 हजार 999 रूपयांपासून सुरू होणाऱ्या नो-कॉस्ट EMI वर देखील तो खरेदी करू शकतात. कंपनी एक वर्षाची स्टँडर्ड वॉरंटी आणि एक वर्षाचे अपघाती नुकसान संरक्षण देत आहे. हा लॅपटॉप असूस ईशॉप, असूस एक्सक्लुझिव्ह स्टोअर्स, ROG स्टोअर्स, असूस ऑथोराइज्ड रिटेल पार्टनर्स, रिलायन्स डिजिटल आणि इतर प्रमुख रिटेल स्टोअर्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

असूस क्रोमबुक CX15: डिस्प्ले, कार्यक्षमता आणि गूगल एआय फिचर्स

असूस क्रोमबुक CX15 मध्ये 1920 x 1080 पिक्सेल रिझोल्यूशन असलेला 15.6-इंचाचा फुल एचडी अँटी-ग्लेअर आयपीएस नॅनोएज डिस्प्ले आहे. यात 300 निट्स ब्राइटनेस, 16:9 आस्पेक्ट रेशो, 87 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशो आणि 45 टक्के NTSC कलर कव्हरेज आहे.

या लॅपटॉपमध्ये इंटेल N50 प्रोसेसर, इंटेल UHD ग्राफिक्स, 8GB LPDDR5 रॅम आणि 128GB eMMC स्टोरेज आहे. हा ChromeOS वर चालतो आणि लॅपटॉपला ऑटोमॅटिक सुरक्षा अपडेट्स मिळतील.

कंपनी तीन महिन्यांची गूगल एआय प्रो मेंबरशिप देखील देत आहे, ज्यामध्ये जेमिनी, जेमिनी नोटबुक, जीमेल, डॉक्स आणि शीट्समधील एआय फीचर्स, गूगल फ्लो, नॅनो बनाना इमेज जनरेशन, गूगल फोटोजमधील प्रगत एडिटिंग टूल्स, यूट्यूब प्रीमियम लाइट आणि 5TB क्लाउड स्टोरेजचा समावेश आहे.

असूस क्रोमबुक CX15: बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी

असूस क्रोमबुक CX15 मध्ये 42Wh क्षमतेची तीन-सेल लिथियम-आयन बॅटरी आहे, जी 45W USB टाइप-C चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीच्या मते हा लॅपटॉप एका चार्जवर 12.5 तासांपर्यंत बॅटरी लाईफ देतो. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये Wi-Fi 6, ब्लूटूथ 5.4, दोन USB 3.2 Gen 1 टाइप-C पोर्ट्स, एक USB 3.2 Gen 1 टाइप-A पोर्ट, एक HDMI 1.4 पोर्ट आणि एक 3.5mm ऑडिओ जॅक यांचा समावेश आहे.सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये टायटन सी सिक्युरिटी चिप आणि केन्सिंग्टन नॅनो सिक्युरिटी स्लॉट यांचा समावेश आहे. यात 720p HD वेबकॅम, फिजिकल प्रायव्हसी शटर, स्पिल-रेझिस्टंट चिकलेट कीबोर्ड आणि US MIL STD 810H मिलिटरी-ग्रेड टिकाऊपणा देखील आहे.

Follow Us
शिवसेना चिन्हाचा निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? कोर्टात कपिल सिब्बल...
शिवसेना चिन्हाचा निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? कोर्टात कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; मात्र...
LIVE अपडेट्स! शिवसेना पक्ष, चिन्हाप्रकरणी सुनावणी सुरू; सुरतहून आमदार
LIVE अपडेट्स! शिवसेना पक्ष, चिन्हाप्रकरणी सुनावणी सुरू; सुरतहून आमदार गुवाहटीला गेले हा योगायोग...
केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? यंदा 3 दिवसांचं विशेष...
केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? यंदा 3 दिवसांचं विशेष अधिवेशन, नेमकी कसली चर्चा?
कर्जमाफीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार?
मोठी बातमी! कर्जमाफीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार जाणून घेण्यासाठी व्हिडीओ पहाच
अमित शाह तोंड लपवत आहेत; ते विद्यार्थ्यांचे गुन्हेगार - राहुल गांधींचा
Rahul Gandhi on Amit Shah | अमित शाह तोंड लपवत आहेत; ते विद्यार्थ्यांचे गुन्हेगार - राहुल गांधींचा थेट हल्ला!
दिल्लीत भेटीगाठी सुरू! राहुल गांधींसोबतच्या भेटीनंतर किरण रिजीजू थेट
दिल्लीत भेटीगाठी सुरू! राहुल गांधींसोबतच्या भेटीनंतर किरण रिजीजू यांची थेट अमित शाह यांच्यासोबत बैठक, पडद्याआड मोठ्या अडामोडी
इन्शुरन्स नाही? मग पेट्रोलही नाही; सुप्रीम कोर्टाचा केंद्राला प्रस्ताव
मोठी बातमी! इन्शुरन्स नाही? मग पेट्रोलही नाही; सुप्रीम कोर्टाचा केंद्राला मोठा प्रस्ताव!
मोठी बातमी! मुंबई हायकोर्टाकडून तातडीचे निर्देश; केंद्रीय मंत्री नितीन
मोठी बातमी! मुंबई हायकोर्टाकडून तातडीचे निर्देश; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संबंधित...
राष्ट्रावादीतील हालचाली वाढल्या ! लवकरच होणार मोठा फेरबदल, पुढे...
राष्ट्रावादीतील हालचाली वाढल्या ! लवकरच  होणार मोठा फेरबदल, पुढे काय घडणार ?
मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा दावा; व्हायरल पोस्टमध्ये नेमकं काय?
मोठी बातमी! मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा दावा; व्हायरल पोस्टमध्ये नेमकं काय?