Airtel चा Jio ला धोबीपछाड, नव्या ग्राहकांच्या संख्येत लक्षणीय वाढ

| Updated on: Dec 05, 2020 | 8:14 AM

नवीन मोबाईल सब्सक्रायबर्स जोडण्याच्या बाबतीत भारती एयरटेलने रिलायन्स जियोला मागे टाकले आहे.

Airtel चा Jio ला धोबीपछाड, नव्या ग्राहकांच्या संख्येत लक्षणीय वाढ
Follow us on

मुंबई : भारती एयरटेलने (Bharti Airtel) सप्टेंबर महिन्यात नवीन मोबाईल सब्सक्रायबर जोडण्याच्या बाबतीत रिलायन्स जियोला (Reliance Jio) मागे टाकले आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्यात एयरटेलने (Airtel) जियोपेक्षा अधिक ग्राहक जोडले आहेत. रिलायन्स जियो सुरु झाल्यानंतर ही कंपनी सातत्याने मार्केटवर वर्चस्व गाजवतेय. परंतु सप्टेंबर महिन्याध्ये पहिल्यांदाच जियो कंपनी नवे ग्राहक जोडण्यात मागे पडली आहे. (Bharti Airtel pips Reliance Jio in monthly customer additions after 4 years)

TRAI च्या आकडेवारीनुसार 2020 मध्ये भारती एयरटेलने 37.7 लाख नवीन कनेक्शन जोडले आहेत. रिलायन्स जियोने 14.6 लाख तर बीएसएनएल ने 78 हजार 454 नवी ग्राहक जोडले आहेत. तर दुसऱ्या बाजूला वोडाफोन आणि आयडिया दिवसेंदिवसे खूप मागे पडत आहे. तोट्यात असलेल्या दोन्ही कंपन्या एकत्र आल्या तरी त्यांच्या व्यापारावर फार चांगला परिणाम झाल्याचे दिसत नाही. ट्रायने पुनरावलोकन (month under review) केलेल्या महिन्यामध्ये वोडाफोन आणि आयडियाने 46.5 लाख ग्राहक गमावले आहेत. एमटीएनएलने 5,784 आणि रिलायंस कम्युनिकेशवन्सने 1 हजार 324 ग्राहक गमावले आहेत.

एकूण ग्राहकांच्या संख्येचा विचार केला तर रिलायन्स जियो देशात पहिल्या नंबरवर आहे. जियोचे देशभरात एकूण 40.41 कोटी ग्राहक आहेत. भारती एअरटेलचे देशभरात 32.66 कोटी ग्राहक असून ही कंपनी दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत वोडाफोन-आयडिया तिसऱ्या स्थानी आहे. त्यांच्याकडे देशभरात एकूण 29.54 कोटी ग्राहक आहेत. बीएसएनएल आणि एमटीएनएल या कंपन्या देशात अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. त्यांच्याकडे एकूण 11.88 कोटी आणि 33.3 लाख ग्राहक आहेत.

ऑगस्ट 2020 पर्यंत देशात 116.78 कोटी फोन ग्राहक होते. त्यामध्ये थोडी वाढ झाली आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत देशात 116.86 कोटी फोन ग्राहकांची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे मोबाईल कनेक्शनच्या संख्येतही थोडी वाढ झाली आहे. ऑगस्ट 2020 पर्यंत देशात 114.79 कनेक्शन्स होते. सप्टेंबरमध्ये त्यात 6 लाखांची वाढ होऊन एकूण संख्या 114.85 कोटींवर पोहोचली आहे.

मोबाइल डेटा स्पीडच्या बाबतीत भारत पाकिस्तान आणि नेपाळच्याही मागे

संपूर्ण जगाच्या तुलनेत भारतात सर्वात स्वस्त दरात मोबाईल डेटा मिळतो. परंतु या मोबाईल डेटाच्या स्पीडच्या बाबतीत भारत खूपच मागे असल्याचे काही रिपोर्ट्स समोर आले आहेत. मोबाईल डेटा स्पीड लिस्टमध्ये भारत जगात 131 व्या स्थानावर आहे. या लिस्टमध्ये श्रीलंका, नेपाळ आणि पाकिस्तान हे देश भारताच्या पुढे आहेत.

डेटा स्पीड ट्रॅक करणारी कंपनी Ookla च्या Speedtest Global Index सप्टेंबर 2020 च्या रिपोर्टनुसार भारतात सरासरी मोबाइल डाऊनलोड स्पीड हा 12.07Mbps इतका आहे आणि अपलोड स्पीड 4.32 Mbps आहे. तर लेटेन्सी रेट 52ms इतका आहे. जगभरातील सरासरी मोबाईल डेटा स्पीड हा 35.26 Mbps (डाऊनलोड स्पीड) इतका आहे, अपलोड स्पीड 11.22 Mbps आणि लेटेन्सी रेट 42ms इतका आहे.

ग्लोबल मोबाइल डेटा स्पीड चार्टमध्ये नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका हे देश भारताच्या खूप पुढे आहेत. नेपाल या चार्टमध्ये 117 व्या, पाकिस्तान 116 व्या, श्रीलंका 102 व्या स्थानावर आहेत. नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंकेतील सरासरी डेटा स्पीड 17Mbps पेक्षा जास्त आहे.

इतर बातम्या

Airtel कडून 3 महिन्यांचं फ्री YouTube प्रिमियम सब्सक्रिप्शन

525 आणि 600 रुपयांच्या प्लॅनमध्ये 400GB डेटा, BSNL ची जबरदस्त ऑफर

(Bharti Airtel pips Reliance Jio in monthly customer additions after 4 years)