AI चं पहिलं महासंकट… या कंपनीने एक दोन नव्हे 4000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं

Twitter को-फाऊंडर जॅक डोर्सी यांच्या एका पावलाने संपूर्ण सिलीकॉन व्हॅलीत खळबळ उडविली आहे. त्यांनी त्यांची फिनटेक कंपनी Block Inc मधून चार हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे.

AI चं पहिलं महासंकट... या कंपनीने एक दोन नव्हे 4000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
Jack Doresey
| Updated on: Feb 27, 2026 | 3:29 PM

एआयच्या संकटाने जगासमोर काय वाढू ठेवलंय याची चुणूक मिळाली आहे. Twitter सह संस्थापक जॅक डॉर्सी यांच्या कंपनी Block Inc.ने सुमारे ४००० कर्मचाऱ्यांनी नोकरीवरुन काढून टाकले आहे. ही संख्या कंपनीच्या एकूण संख्येच्या सुमारे ४० टक्के असल्याचे म्हटले जात आहे. कंपनीने या पावलामागे आर्टीफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयला जबाबदार ठरवले आहे.

आतापर्यंत कंपन्या कर्मचाऱ्यांची कपात करताना स्पष्टपणे एआयमुळे कपात केल्याचे सांगत नव्हत्या, परंतू Jack Doresey ने स्पष्ट केले की त्यांनी त्यांच्या कामगारांना एआयमुळे काढले आहे.

Block एक फिनटेक कंपनी ज्या Cash App आणि Square सारख्या सेवा चालवत आहे. कंपनीचे म्हणणे आहे की आता AI वर जास्त फोकस करत आहे. आणि काम करण्याची पद्धत बदलत आहे. डोर्सी यांनी म्हटले आहे की टेक्नॉलॉजी ज्या वेगाने बदलत आहे ते पाहाता कंपन्यांना वेळेत त्यांच्या बदल करावा लागेल. त्यांच्या मते कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्वीकारण्यास उशीर करत आहेत.

Block ने एक साथ मोठा निर्णय घेऊन आपल्या टीमचा आकार छोटा केला आहे, म्हणजे पुढील रणनिती साफ होईल. या बातमीनंतर शेअर बाजारात Block च्या शेअरमध्ये उसळी पाहायला मिळाली आहे. बातम्यानुसार कंपनीचे शेअर सुमारे २० ते २५ टक्के चढले आहेत. गुंतवणूकदारांना वाटत आहे की एआयच्या वापराने कंपनीचा खर्च कमी होईल आणि नफा वाढेल.

कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने मात्र हा सर्वात मोठा झटका मानला जात आहे. एवढ्या मोठ्या संख्येने नोकरी गेल्याने टेक सेक्टरमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही वर्षांपासून टेक कंपन्या त्यांचा स्टाफ कमी करत आहेत. मात्र, यंदा थेट एआयमुळे आम्ही तुम्हाला नोकरीवरुन काढत आहोत असे स्पष्ट सांगितल्याने आता आणखी पुढे काय वाढून ठेवलेय याची भीती सतावत आहे.

कर्मचाऱ्यांना मिळणार भरपाई आणि सपोर्ट

जॅक डॉर्सी यांनी हे स्पष्ट केले आहे की ज्या कर्मचाऱ्यांची नोकरी गेली आहे. त्यांना नियमांनुसार नुकसान भरपाईची रक्कम दिली जाईल आणि काही काल सपोर्ट केला जाईल. वेगवेगळ्या देशात नियम वेगवेगळे असल्याने हा पॅकेज देखील वेगवेगळे असण्याची शक्यता आहे.

येथे पोस्ट पाहा –

या निर्णयाने एक प्रश्न निर्माण झाला आहे की एआय खरेच माणसांच्या नोकरी घालवत आहे. टेक एक्सपर्टच्या मते एआय संपूर्णपणे नोकरी घालवणार नाही तर कामाची स्वरुप बदलेल. Block चा हे पाऊल संकेत देत आहे की येत्या काळात अनेक कंपन्या यात दिशेने जाऊ शकतात. एआयमुळे कमी स्टाफमध्ये जास्त काम होऊ शकते. त्यामुळे कंपन्या खर्च कमी करण्यासाठी असे निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे आता येणाऱ्या काळात कंपन्या आता नेमक्या काय निर्णय घेतात हे पाहणे रंजक ठरणार आहे.

 

Follow Us