Blue Fest : सणासाठी घराला करा सुशोभित, रोज जाणून घ्या आकर्षक ऑफर्ससह कॅशबॅकही…

मोफत सॅमसंग गॅलॅक्‍सी एस22 सह बीस्‍पोक फॅमिली हब™ रेफ्रिजरेटर, 30 टक्‍के त्‍वरित सूट, जवळपास 20 टक्‍के अ‍तिरिक्‍त कॅशबॅक आणि झीरो डाऊन पेमेंटसह सुलभ EMI. ऑफर्स 15 जुलै ते 21 ऑगस्‍ट 22 पर्यंत.

Blue Fest : सणासाठी घराला करा सुशोभित, रोज जाणून घ्या आकर्षक ऑफर्ससह कॅशबॅकही...
खास ऑफर्स
Image Credit source: social
शुभम कुलकर्णी

|

Jul 19, 2022 | 8:20 AM

मुंबई : सॅमसंग (samsung) या भारताच्‍या (India) सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रॅण्‍डने प्रिमिअम टेलिव्हिजन्‍स, रेफ्रिजरेटर्स, डिशवॉशर्स, मायक्रोवेव्‍ह, ओव्‍हन्‍स व साऊंडबार्सच्‍या निवडक मॉडेल्‍सवर उत्‍साहवर्धक ‘ब्‍ल्‍यू फेस्‍ट’ ऑफर्स (offers) परत आणली आहे. ब्‍ल्‍यू फेस्‍ट 2.0 ऑफर्स सॅमसंगचे ऑफिशियल ऑनलाइन स्‍टोअर, सॅमसंग शॉप आणि देशभरातील सर्व आघाडीच्‍या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स रिटेल स्‍टोअर्समध्‍ये 15 जुलै ते 21 ऑगस्‍ट 2022 पर्यंत वैध असतील. या ऑफर कालावधीदरम्‍यान ग्राहक त्‍यांच्‍या आवडत्‍या सॅमसंग ग्राहकोपयोगी वस्‍तूंवर आकर्षक डिल्‍स व लिमिटेड पीरियड ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात. ग्राहकांना मोफत सॅमसंग गॅलॅक्‍सी एस२२ सह बीस्‍पोक फॅमिली हब™ रेफ्रिजरेटर, जवळपास 30 टक्‍के त्‍वरित सूट, जवळपास 20 टक्‍के अ‍तिरिक्‍त कॅशबॅक आणि झीरो डाऊन पेमेंटसह सुलभ ईएमआयसोबत इतर आकर्षक बंडल डिल्‍स मिळू शकतात.

”सणासुदीचा काळ जवळ आला असताना ग्राहकांनी त्‍यांच्‍या प्रियजनांसोबत उत्‍साहात सण साजरा करण्‍यासाठी त्‍यांच्‍या घरांचे नूतनीकरण व अपग्रेड करण्‍याची सुरूवात केली आहे. कंझ्युमर ड्यूरेबल उत्‍पादनांच्‍या श्रेणीवर आमच्‍या ब्‍ल्‍यू फेस्‍ट 2.0 ऑफर्स ग्राहकांना वैयक्तिकृत लिव्हिंग स्‍पेसेस् तयार करण्‍याची सुविधा देतात, ज्‍यामधून त्‍यांच्‍या वैयक्तिक स्‍टाइल्‍स दिसून येण्‍यासोबत त्‍यांना अद्वितीय तंत्रज्ञान, सुधारित सोयीसुविधा व ऊर्जा कार्यक्षमता मिळते,” असे सॅमसंग इंडियाच्‍या कंझ्युमर इलेक्‍ट्रॉनिक्‍स बिझनेसचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष मोहनदीप सिंग म्‍हणाले.

ब्‍ल्‍यू फेस्‍ट 2.0 ऑफर्स:

टेलिव्हिजन्‍स

सॅमसंग ब्‍ल्‍यू फेस्‍ट 2.0 दरम्‍यान ग्राहक निवडक प्रिमिअम टीव्‍ही मॉडेल्‍सवर जवळपास 25 टक्‍के त्‍वरित सूट आणि जवळपास 20 टक्‍के कॅशबॅकचा लाभ घेऊ शकतात. ब्‍ल्‍यू फेस्‍ट 2,0 ऑफर्समध्‍ये निओ क्‍यूएलईडी व क्‍यूएलईडी टीव्‍हींच्‍या निवडक मॉडेल्‍सवर 3 वर्षांची वॉरंटी आणि 10-वर्षे नो स्क्रिन बर्न-इन वॉरंटीचा देखील समावेश आहे.

सॅमसंगची प्रिमिअम निओ क्‍यूएलईडी टीव्‍ही श्रेणी टीव्‍हीपेक्षा अधिक असण्‍याच्‍या रूपात डिझाइन करण्‍यात आली आहे. ही श्रेणी गेम कंसोल, व्‍हर्च्‍युअल प्‍लेग्राऊण्‍ड बनू शकते आणि या श्रेणीमध्‍ये स्‍मार्ट हब आहे, जे कार्यक्षमता सुधारण्‍यासाठी तुमच्‍या घरावर उत्तम नियंत्रण ठेवण्‍याची व परिपूर्ण सोबतीची खात्री देते. या श्रेणीमध्‍ये नियमित एलईडींपेक्षा 40 पट लहान असलेल्‍या क्‍वॉन्‍टम मिनी एलईडीद्वारे समर्थित क्‍वॉन्‍टम मॅट्रिक्‍स टेक्‍नोलॉजी आहे. हे तंत्रज्ञान डिस्‍प्‍लेच्‍या ब्राइटनेससह सखोल ब्‍लॅक्‍स व सर्वोत्तम कॉन्‍ट्रास्‍टच्‍या अचूक नियंत्रणासाठी सुधारित ल्‍युमिनन्‍स स्‍केल देते.

रेफ्रिजरेटर्स

सॅमसंग ब्‍ल्‍यू फेस्‍ट 2.0 दरम्‍यान ग्राहक निवडक रेफ्रिजरेटर मॉडेल्‍सवर जवळपास 20 टक्‍के कॅशबॅक आणि झीरो डाऊन पेमेंटसह सुलभ ईएमआय पर्याय, तसेच इतर आकर्षक बंडल डिल्‍सचा लाभ घेऊ शकतात.

ग्राहकांना सॅमसंगचा फ्लॅगशिप गॅलॅक्‍सी एस22 (8 जीबी/128 जीबी) सोबत बीस्‍पोक फॅमिली हब™ रेफ्रिजरेटर्स मिळेल. बीस्‍पोक रेफ्रिजरेटर्स तुमच्‍या वैयक्तिक स्‍वादाशी अनुकूल असलेल्‍या आधुनिक किचनसाठी सानुकूल डिझाइन पर्याय देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत. या 934 लिटर क्षमतेचे फ्रेंच डोअर रेफ्रिजरेटरमध्‍ये सर्वांगीण मनोरंजनासाठी 21.5-इंच फॅमिली हब™ स्क्रिन आणि 25 वॅट स्‍पीकर्स आहेत. या रेफ्रिजरेटरमध्‍ये बीवरेज सेंटर™ आहे, जे जलदपणे वॉटर डिस्‍पेन्‍सर, ऑटोमॅटिकली-फिलिंग वॉटर पिचर आणि फ्लेवर्ड पाण्‍यासाठी इन्‍फ्यूजर देते.

सॅमसंगचा कर्ड माएस्‍ट्रो™ हा जगातील पहिला रेफ्रिजरेटर आहे, जो दही बनवू शकतो आणि दही बनवण्‍याच्‍या जटिल वेळ-खाऊ व त्रासदायक समस्‍यांना दूर करू शकतो. हा रेफ्रिजरेटर 192 लिटर ते 612 लिटर क्षमतांपर्यंतच्‍या स्‍टा‍यलिश डिझाइन्‍समध्‍ये 20,990 रूपये या सुरूवातीच्‍या किंमतीपासून उपलब्‍ध असेल.

डिजि-टच कूल™ 5-इन-1 सिंगल-डोअर रेफ्रिजरेटर्स ग्राहकांना रेफ्रिजरेटरचा दरवाजा न उघडता सुलभ टचमध्‍ये त्‍यांच्‍या रेफ्रिजरेटर सेटिंग्‍जवर नियंत्रण ठेवण्‍याची सुविधा देतात आणि कूलिंग राखत वीजबचत करण्‍यास मदत करतात. हे रेफ्रिजरेटर्स 198 लिटर ते 225 लिटर क्षमतांपर्यंतच्‍या आकर्षक डिझाइन्‍समध्‍ये 19,990 रूपये या सुरूवातीच्‍या किंमतीपासून उपलब्‍ध असतील.

डिशवॉशर

सॅमसंग डिशवॉशर्सची इंटेन्सिव्‍हवॉश™ श्रेणी कूकर व कढई असे भारतीय कूकवेअर प्रभावीपणे स्‍वच्‍छ करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली. ही श्रेणी 36,990 रूपये इतक्‍या कमी सुरूवातीच्‍या किंमतीपासून उपलब्‍ध असेल. तसेच ग्राहक जवळपास 20 टक्‍के कॅशबॅकसोबत झीरो डाऊन पेमेंट पर्यायांसह सुलभ ईएमआयचा लाभ घेऊ शकतात.

सॅमसंगचे डिशवॉशर्स 13 प्‍लेस सेटिंग्‍जसह येतात, जे एकाच वॉश चक्रामध्‍ये विविध व मोठ्या आकाराच्‍या डिश सामावून घेऊ शकतात. इंटेन्सिव्‍हवॉश™ सह ट्रिपल रिंस वैशिष्‍ट्यामध्‍ये तीन रिंस चक्र आहेत, जे डिशेसवरील गडद डाग प्रभावीपूणे दूर करण्‍यासोबत त्‍यावर असलेले फूड बॅक्‍टेरिया 99.99 टक्‍के दूर करते (इंटरटेकद्वारे प्रमाणित) आणि तुम्‍हाला चमकदार व स्‍वच्‍छ डिश मिळण्‍याची खात्री देतात.

मायक्रोवेव्‍ह सॅमसंग ब्‍ल्‍यू फेस्‍ट 2.0 कूकिंगप्रेमींना देखील आकर्षक डिल्‍स देतो. या ऑफर कालावधीदरम्‍यान ग्राहक मायक्रोवेव्‍ह ओव्‍हन्‍सच्‍या मसाला अॅण्‍ड सन-ड्राय™ श्रेणीच्‍या खरेदीवर आकर्षक ऑफर्सचा लाभ घेऊ शकतील. 18,990 रूपये या आकर्षक किंमतीपासून उपलब्‍ध मायक्रोवेव्‍ह्ज सिरॅमिक कॅव्हिटीवर 10-वर्ष वॉरंटीसह येतील. तसेच मॅग्‍नेट्रॉन व बोरोसिल ग्‍लास बाऊल सेट्सवर चार-वर्षांची अतिरिक्‍त वॉरंटी देखील येते. ग्राहकांना झीरो डाऊन पेमेंट पर्यायासह सुलभ ईएमआय, तसेच कॅशबॅक ऑफर्सचा देखील अतिरिक्‍त लाभ मिळेल.

साऊंडबार्स

सॅमसंग साऊंडबार्सच्‍या खरेदीवर ग्राहक जवळपास 30 टक्‍क्‍यांच्‍या त्‍वरित सूटचा लाभ घेऊ शकतील. या ऑफरमध्‍ये अधिक उत्‍साहाची भर म्‍हणून ग्राहकांना सुलभ ईएमआय पर्यायासह जवळपास 10 टक्‍के कॅशबॅक देखील मिळेल.

नुकतेच लाँच करण्‍यात आलेल्‍या सॅमसंगच्‍या 2022 साऊंडबार श्रेणीमध्‍ये फ्लॅगशिप क्‍यू सिरीज आणि लाइफस्‍टाइल एस सिरीजचा समावेश असण्‍यासोबत एकसंधी सॅमसंग टीव्‍ही–टू-साऊंडबार कनेक्‍शनसाठी जगातील पहिले बिल्‍ट-इन वायरलेस डॉल्‍बी अॅटमॉस, क्‍यू-सिम्‍फोनी, डीटीएसएक्‍स, स्‍पेसफिट साऊंड अ‍ॅडवान्‍स आणि जगातील स्लिमेस्‍ट साऊंडबार आहे.

वॉशिंग मशिन्‍स

ब्‍ल्‍यू फेस्‍ट 2,0 दरम्‍यान लॉण्‍ड्री केअर अधिक उत्‍साहवर्धक झाले आहे, जेथे सॅमसंग ग्राहकांना भव्‍य बचती देईल जसे जवळपास 25 टक्‍के त्‍वरित सूट, जवळपास 20 टक्‍के कॅशबॅक आणि किफायतशीर प्रोग्राम्‍स जसे झीरो डाऊन पेमेंट पर्यायासह 990 रूपये इतका सुलभ ईएमआय.

सॅमसंगची एआय इकोबबल™ वॉशिंग मशिन इंटेलिजण्‍ट एआय कंट्रोलच्‍या माध्‍यमातून कपड्यांची उच्‍चस्‍तरीय केअर सुविधा देते. इकोबबल™ तंत्रज्ञान तुमच्‍या उत्‍सवी पोशाखांना सौम्‍यपणे स्‍वच्‍छ करते आणि त्‍यांना दीर्घकाळानंतर नवीन ठेवते. एआय कंट्रोल तुमच्‍या वापरण्‍याच्‍या पद्धतीनुसार वॉश सायकल्‍स वैयक्तिकृत करते, ज्‍यामुळे तुम्‍ही खूप व्‍यस्‍त असताना देखील कपडे स्‍वच्‍छपणे धुवून येऊ शकतात.

(हेडलाईन व्यतिरीक्त सदर वृत्तातील मजकूर tv9marathi ने संपादीत केलेला नसून उपरोक्त माहिती ही सिंडीकेटेड फीडमधून प्रकाशित करण्यात आली आहे.)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें