
तुम्ही जर YouTube क्रिएटर असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. YouTube मध्ये एक नवीन आणि अतिशय उपयुक्त फीचर आहे. त्याचे नाव YouTube Title A/B Testing फीचर आहे. हे फीचर आल्यानंतर, YouTubers हे जाणून घेऊ शकतील की कोणत्या व्हिडिओ टायटलला जास्त क्लिक मिळत आहेत आणि कोणत्या टायटलमुळे व्यूव्हर्स वाढत आहे. अशातच तुम्हाला जर हे फीचर काय आहे आणि ते कसे काम करेल असा प्रश्न पडत असेल, तर आजच्या या लेखात आपण याबद्दल जाणून घेऊयात..
YouTube Title A/B Testing म्हणजे काय?
A/B Testing ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये एकाच गोष्टीचे दोन किंवा अधिक प्रकार दाखवले जातात जेणेकरून कोणते वर्जन चांगली कामगिरी करते हे पाहता येईल.
YouTube आता हे फिचर व्हिडिओ टायटल्समध्ये आणत आहे. याचा अर्थ असा की क्रिएटर आता एकाच व्हिडिओसाठी 3 वेगवेगळे टायटल अपलोड करू शकतात आणि कोणते टायटल सर्वोत्तम रिझल्ट देत आहे हे निर्धारित करण्यासाठी YouTube त्यांच्या सिस्टमचा वापर करेल.
हे फिचर कसे काम करेल?
जेव्हा एखादा क्रिएटर व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा तो 3 वेगवेगळे टायटल त्यात टाकू शकतो. YouTube हे टायटल वेगवेगळ्या लोकांना दाखवेल. प्रत्येक टायटलवरील इंप्रेशन, क्लिक आणि व्ह्यूज ट्रॅक केले जातील. काही दिवसांनी, YouTube कोणत्या टायटला सर्वाधिक क्लिक्स आणि लक्ष वेधून घेत आहे हे सांगेल. सर्वोत्तम परफॉर्म करणारे टायटल फायनल टायटल असेल.
याचा क्रिएटरला काय फायदा होईल?
याचा क्रिएटर्सला खूप फायदा होईल, CTR (Click Through Rate) वाढेल. अधिक संबंधित प्रेक्षकांना लक्ष्य करता येईल. क्रिएटरला कमी वेळेत अधिक ग्रोथ होईल. टायटल लिहिण्यात कंटेंट स्ट्रेटेजी मध्ये सुधार होतील. याशिवाय भविष्यातील व्हिडिओंवर कोणत्या प्रकारचे टायटल ठेवता येईल हे डेटाच्या आधारे ठरवणे सोपे होईल.
YouTube Title A/B Testing
एका वेळी जास्तीत जास्त 3 टायटल जोडता येतील. फक्त टायटल्स बदलतील, थंबनेल किंवा डिस्क्रिप्शन बदलणार नाहीत. टेस्टिंग काही दिवसांसाठी चालेल. याशिवाय, तुम्हाला YouTube स्टुडिओमध्ये यासाठी एक वेगळा सेक्शन मिळेल.
YouTube चे टायटल A/B टेस्टिंग फीचर गेम चेंजर ठरू शकते. विशेषतः अशा क्रिएटर्ससाठी जे प्रत्येक व्हिडिओच्या टायटलबद्दल गोंधळात असतात. आता, अंदाज लावण्याऐवजी टायटल निवडण्यासाठी डेटा-आधारित निर्णय घेतले जाऊ शकतात.