Recharge : बाजारात ‘या’ कंपनीने आणला 22 रूपयांचा सर्वात स्वस्त रिचार्ज, 90 दिवसांची राहणार वैधता!

| Updated on: Jun 06, 2023 | 11:54 PM

आता एक महिन्याचा कोणत्याही कंपनीचा सर्वात कमीत कमी 200 रूपयांच्या आसपास किंवा जास्त आहे. मात्र अशातच एका कंपनीने सर्वात स्वस्त प्लॅन बाजारात आणला आहे.

Recharge : बाजारात या कंपनीने आणला 22 रूपयांचा सर्वात स्वस्त रिचार्ज, 90 दिवसांची राहणार वैधता!
स्मार्टफोन अॅप
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : आता कोणीही विना मोबाईलचं फार वेळ बसू शकत नाही, जिओने रिचार्ज स्वस्त करण्याआधी 1 जीबीचा रिचार्ज सगळे महिनाभर पुरवत होते. मात्र आता एक दिवसालाही 1.5 जीबी डेटा पुरत नाही. इन्स्टाग्रामवर रील्स पाहत बसलं की कधी नेट संपून जातं लक्षातसुद्धा नाही येत. आता एक महिन्याचा कोणत्याही कंपनीचा सर्वात कमीत कमी 200 रूपयांच्या आसपास किंवा जास्त आहे. मात्र अशातच एका कंपनीने सर्वात स्वस्त प्लॅन बाजारात आणला आहे.

या मोठ्या प्लॅनमुळे ज्यांना जास्त नेट वापरायचं नाही आणि कॉलिंगसुद्धा मोजकच असतं असे लोक या भरडले जातात.  या प्लॅनमध्ये अशा कमी वापरणाऱ्या ग्राहकांसाठी हा प्लॅन फायदेशीरा आहे. कारण मोठा प्लॅन रिचार्ज करून त्याचं नेट आणि कॉलिंग वाया जातं. त्यामुळे अशा ग्राहकांसाठी हा प्लॅन खास आहे.

BSNL हा देशातील सरकारी ब्रँड आहे जो भारतीय ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन रिचार्ज ठेवतात. BSNL ने आता अवघ्या 22 रूपयांचा प्लॅन आणला आहे. जे लोक इंटरनेट वापरत नाहीत त्यांच्यासाठा हा खास प्लॅन आहे. BSNL च्या ₹ 22 च्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनच्या फायद्यांबद्दल जाणून घ्यायचे असेल तर सांगा की त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यात उपलब्ध वैधता 90 दिवसांसाठी म्हणजेच 3 महिन्यांसाठी आहे.

या स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये आणखी एक मोठा फायदा आहे आणि तो म्हणजे स्थानिक आणि STD कॉलसाठी 30 पैसे प्रति मिनिट कॉल दर आहे. तुम्हालाही तुमचे पैसे वाचवायचे असतील, तर हा रिचार्ज प्लान तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.