300 रुपयांपेक्षा कमीचा रिचार्ज करा, 100 जीबी डेटा मिळवा, BSNL ची आकर्षक ऑफर काय?

बीएसएनएलचा 251 रूपयांमध्ये 30 दिवसांसाठी सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये डेटा आणि कॉलिंगसह अनेक उत्तम फायदे मिळतात. चला जाणून घेऊया या प्लॅनमध्ये आणखीन कोणते फायदे आहेत.

300 रुपयांपेक्षा कमीचा रिचार्ज करा, 100 जीबी डेटा मिळवा, BSNL ची आकर्षक ऑफर काय?
BSNL
| Edited By: | Updated on: Dec 26, 2025 | 3:59 PM

येत्या नवीन वर्षात मोबाईल फोनचे रिचार्ज प्लॅन हे 20 टक्क्यांनी महाग होणार आहेत. त्यामुळे अनेक ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार आहे. पण अशातच तुम्हीही कमी किमतीचा संपूर्ण महिना चालणारा रिचार्ज प्लॅन शोधत असाल, तर BSNL कंपनीकडे एक परवडणारा प्रीपेड रिचार्ज प्लॅन आहे जो तुम्हाला आवडू शकतो. या प्लॅनची ​​किंमत फक्त 251 रूपये आहे. जर तुमच्याकडे BSNL सिम असेल, तर तुम्हाला हा प्लॅन देखील आवडू शकतो. आजच्या लेखात आपण कंपनी प्रीपेड वापरकर्त्यांना 251 रूपयांमध्ये कोणते फायदे देत आहे. शिवाय Jio कडे या BSNL प्लॅनवर काही उपाय आहे का? याबद्दल जाणून घेऊयात.

बीएसएनएलच्या 251 रूपयांच्या प्लॅनची ​​माहिती

बीएसएनएलने मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्स वर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये 251 रुपयांच्या प्लॅनची ​​माहिती देण्यात आली आहे . या प्लॅनमध्ये 100 जीबी हाय-स्पीड डेटा आणि अमर्यादित कॉलिंग मिळते. या प्लॅनमध्ये एसएमएस सपोर्ट आहे की नाही हे पोस्टमध्ये स्पष्ट केलेले नाही.

बीएसएनएल 251 रूपयांच्या प्लॅनची ​​वैधता

तर या प्लॅनच्या वैधतेबद्दल बोलायचे झाले तर कंपनी तुम्हाला 251 रूपये खर्च केल्यास 30 दिवसांची वैधता देईल. या योजनेत अतिरिक्त फायदे आहेत, जसे की BiTV चा मोफत प्रवेश. कंपनीने सांगितले की ही ऑफर 24 डिसेंबर 2025 पासून ते 31 जानेवारी 2026 पर्यंत वैध असणार आहे. जर तुम्ही हा प्लॅन 31 जानेवारीपर्यंत खरेदी केला तर तुम्हाला या प्लॅनमध्ये समाविष्ट असलेले सर्व फायदे मिळतील.

रिलायन्स जिओकडे 251 रुपयांचा प्लॅन आहे का?

जर तुम्ही प्रीपेड जिओ वापरकर्ता असाल, तर हे लक्षात घेण्यासारखे आहे की जिओ सध्या 251 रुपयांचा प्लॅन देत नाही जो डेटा, कॉलिंग किंवा अतिरिक्त फायदे देतो. जिओकडे 289 रुपयांचा डेटा पॅक देते, परंतु या प्लॅनमध्ये 30 दिवसांसाठी 40 जीबी डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये इतर कोणतेही फायदे मिळत नाहीत.