AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BSNL ने आणला 365 दिवसांचा सर्वात बजेट प्लॅन, ‘या’ फायद्यांचा कोणाला मिळेल लाभ?

बीएसएनएलने (BSNL) आपल्या ग्राहकांसाठी केवळ 321 रुपयांची दीर्घ वैधता योजना आणली आहे. मोठ्या कालावधीनंतर बीएसएनएलने ग्राहकांसाठी एक मोठा प्लॅन आणला असल्याने ग्राहकांमध्ये याबाबत उत्सुकता वाढली आहे. बीएसएनएलच्या या अपकमिंग प्लॅनमध्ये कोणते नवीन फायदे ग्राहकांना मिळणार आहे, याची माहिती या लेखातून घेणार आहोत.

BSNL ने आणला 365 दिवसांचा सर्वात बजेट प्लॅन, ‘या’ फायद्यांचा कोणाला मिळेल लाभ?
BSNL ने आणला 365 दिवसांचा सर्वात बजेट प्लॅनImage Credit source: tv9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Aug 25, 2022 | 1:21 AM
Share

सरकारी दूरसंचार कंपनी म्हणजेच बीएसएनएलने (BSNL) आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन प्लॅन आणला आहे. बीएसएनएलचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक स्वस्त प्लॅन (cheapest plan) असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे यात दीर्घ वैधता उपलब्ध असल्याने ग्राहक याकडे अधिक आकर्षित होतील असे बोलले जात आहे. बीएसएनएलने स्वस्तात दीर्घ वैधता (long validity) ऑफर करणारा एक प्लॅन लॉंच केला आहे. 321 रुपयांच्या या बजेट प्लॅनची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्लॅनसह ग्राहकांना एक दीर्घ वैधता मिळते. या लेखाच्या माध्यमातून बीएसएनएलच्या या धमाकेदार प्लॅनची माहिती घेणार आहोत.

काय आहे 321 चा प्लॅन?

बीएसएनएलच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये कंपनी ग्राहकांना दर महिन्याला 250 एसएमएस देईल तसेच या प्लॅनमध्ये ग्राहकांना दर महिन्याला 15 जीबी फ्री डेटाची सुविधा मिळेल. कॉलिंगबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये लोकल कॉलसाठी 7 पैसे प्रतिमिनिट आणि एसटीडी कॉलिंगसाठी 15 पैसे प्रतिमिनिट शुल्क आकारले जाते.

दमदार प्लॅन

मार्केटमधील कोणत्याही टेलिकॉम कंपनीकडे इतका स्वस्त प्‍लॅन नाही जो 321 रुपयांत 365 दिवसांची वैधता ग्राहकांना देतो. पण या प्लॅनमध्ये एक ट्विस्ट आहे. हा प्लॅन सर्व यूजर्ससाठी उपलब्ध नाही. या प्लॅनचा लाभ कोणाला मिळणार आहे आणि कोणाला हा प्लॅन रिचार्ज करून मिळू शकतो याची माहिती कंपनीकडून सांगण्यात आली आहे. रोमिंगमध्‍ये इनकमिंग व्हॉईस कॉल या प्‍लॅनसह मोफत आहेत. अर्थात यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

योजना कोणासाठी?

ही योजना बीएसएनएलने तामिळनाडूमध्ये काम करणाऱ्या पोलिसांसाठी ऑफर केली आहे, म्हणजेच जे पोलिस अधिकारी तामिळनाडूमध्ये काम करतात तेच या योजनेचा लाभ घेऊ शकतील. हा प्लॅन बीएसएनएलच्या अधिकृत साइटवर तामिळनाडू सर्कलसाठी उपलब्ध आहे. ग्राहकांना ही योजना इतर कोणत्याही मंडळासाठी दिसणार नाही.

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी