बीएसएनएलचा 30 दिवसांचा वैधता असलेला सर्वात स्वस्त नवीन प्लॅन लाँच, जाणून घ्या किंमत
बीएसएनएलच्या या कमी किंमतीच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 30 दिवसांसाठी दररोज 3 जीबी हाय-स्पीड डेटा, अनलिमिटेड कॉलिंग मिळत आहे. ज्या ग्राहकांना जास्त डेटा आणि दीर्घ वैधतेची आवश्यकता आहे, त्यांच्यासाठी हा प्लॅन एक किफायतशीर पर्याय आहे. चला तर मग या प्लॅनची किंमत आणि फायदे जाणून घेऊयात.

सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी बीएसएनएल त्यांचा लाखो ग्राहकांसाठी अनेक परवडणारे प्रीपेड प्लॅन्स सादर करत असते. तर त्यातील काही प्लॅन्स कमी किमतीत अधिक फायदे देतात. त्यामुळे तुम्ही जर दररोज वारंवार इंटरनेट वापरत असाल आणि जास्त वैधतेचा प्लॅन शोधत असाल तर कंपनीचा 299 रूपयांचा प्रीपेड प्लॅन एक चांगला पर्याय आहे. या प्लॅनमध्ये डेटा, कॉलिंग आणि एसएमएस यांसारख्या सर्व आवश्यक सुविधा मिळतात. चला तर मग आजच्या लेखात आपण बीएसएनएलच्या या प्लॅनचे फायदे जाणून घेऊयात.
बीएसएनएलच्या 299 रूपयांच्या प्लॅनचे फायदे
बीएसएनएलच्या 299 रूपयांच्या प्लॅनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा डेली डेटा. कंपनी या प्लॅनसोबत दररोज 3 जीबी हाय-स्पीड डेटा देत आहे. या प्लॅनची वैधता 30 दिवसांची असून, या कालावधीत वापरकर्त्यांना एकूण 90 जीबी डेटा मिळतो. ज्यांचे काम प्रामुख्याने ऑनलाइन मीटिंग, व्हिडिओ स्ट्रीमिंग, सोशल मीडिया किंवा गेमिंगवर अवलंबून असते, त्यांच्यासाठी हा प्लॅन खूप उपयुक्त ठरू शकतो.
अमर्याद व्हॉइस कॉलिंगची सुविधा सुद्धा
डेटासोबतच या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधाही मिळते. ग्राहक देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय कॉल करू शकतात. याव्यतिरिक्त त्यांना दररोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा देखील मिळते, ज्यामुळे मेसेजिंगची कामे अगदी सोपी होतात.
या प्लॅनची वैधता पूर्ण एक महिन्याची आहे. तसेच दैनंदिन 3 जीबी डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेटचा वेग 40 केबीपीएस पर्यंत कमी होईल. यामुळे महत्त्वाची ऑनलाइन कामे सुरू ठेवणे सोपे होईल, परंतु तुमच्या हाय-स्पीड ब्राउझिंग आणि व्हिडिओ स्ट्रीमिंगच्या अनुभवावर परिणाम होऊ शकतो.
वारंवार रिचार्ज करण्याची चिंता नाही
जर तुमचा रोजचा डेटा वापर जास्त असेल आणि तुम्हाला वारंवार रिचार्ज करणे टाळायचे असेल, तर BSNL चा 299 रूपयांचा प्लॅन एक किफायतशीर पर्याय ठरू शकतो. हा प्लॅन विशेषतः अशा ग्राहकांसाठी योग्य आहे, ज्यांना एकाच रिचार्जमध्ये डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि SMS चा समावेश हवा आहे.