BSNL Recharge Plan : सरकारी म्हणता म्हणता BSNLचे प्लॅनही महागले! काय बदल केलाय? जाणून घ्या…

| Updated on: Jul 04, 2022 | 10:49 AM

बीएसएनएलचा 319 रुपयांचा प्लान 75 दिवसांच्या वैधतेसह येत असे. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगसह रोज 300 एसएमएस आणि 10 जीबी डेटा उपलब्ध आहे. आता या प्लानची वैधता 65 दिवसांची झाली आहे. म्हणजेच हा प्लॅनही जवळपास 4.25 रुपयांनी महाग झाला आहे. प्लॅन्सचे दर वाढवल्यानं पुन्हा एकदा यामाध्यमातून महागाईचा फटका बसला आहे. दरम्यान, बीएसएनएलनं त्यांच्या प्लॅन्समध्ये काय बदल केले आहेत. ते जाणून घ्या…

BSNL Recharge Plan : सरकारी म्हणता म्हणता BSNLचे प्लॅनही महागले! काय बदल केलाय? जाणून घ्या...
BSNL
Image Credit source: social
Follow us on

नवी दिल्ली : भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने अलीकडेच तीन नवीन प्री-पेड प्लॅन (Prepaid Plans) लाँच केले आहेत. आता कंपनीनं आपल्या अनेक प्री-पेड प्लॅन्स (Plans) एकाच वेळी महाग केले आहेत. टेलिकॉम टॉकनं सर्वप्रथम ही माहिती दिली आहे. आता BSNLनं एकाच वेळी आपल्या तीन प्री-पेड प्लॅनमध्ये उपलब्ध वैशिष्ट्ये कमी केली आहेत. यामुळे हा पुन्हा एकदा महागाईचा फटका लोकांना बसलाय. कारण, आधीच महागाई वाढत आहे. पेट्रोल, घरगुती गॅसचे दर वाढतायत. त्यात आता टेलिकॉम कंपन्या आपल्या प्लॅन्समध्ये बदल करत असल्यानं, प्लॅन्सचे दर वाढवल्यानं पुन्हा एकदा यामाध्यमातून महागाईचा फटका बसला आहे. दरम्यान, बीएसएनएलनं त्यांच्या प्लॅन्समध्ये काय बदल केले आहेत. ते जाणून घ्या…

BSNLच्या 99 रुपयांच्या प्लॅन

BSNL च्या 99 रुपयांच्या प्री-पेड प्लॅनमध्ये पूर्वी अमर्यादित कॉलिंगसह 22 दिवसांची वैधता मिळायची. पण, आता या प्लॅनची ​​वैधता 18 दिवसांची झाली आहे म्हणजेच तुम्ही वैधतेच्या बाबतीत 4 दिवस गमावाल. इतर सर्व सुविधा पूर्वीप्रमाणेच मिळत राहतील.

BSNLचा 118 रुपयांचा प्लॅन

BSNL च्या 118 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 500 MB डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग देखील उपलब्ध आहे. आता नवीन बदलामध्ये या प्लानची वैधता 20 दिवसांची झाली आहे. यापूर्वी 26 दिवसांची होती. सोप्या भाषेत सांगायचे तर या प्लॅनची ​​किंमत देखील सुमारे 4.53 रुपयांनी वाढली आहे.

हे सुद्धा वाचा

BSNL चा 319 रुपयांचा प्लॅन

बीएसएनएलचा 319 रुपयांचा प्लान 75 दिवसांच्या वैधतेसह येत असे. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगसह रोज 300 एसएमएस आणि 10 जीबी डेटा उपलब्ध आहे. आता या प्लानची वैधता 65 दिवसांची झाली आहे. म्हणजेच हा प्लॅनही जवळपास 4.25 रुपयांनी महाग झाला आहे.

118 रुपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 20 दिवसांपर्यंतच्या वैधतेसह रोज 0.5GB डेटा ऍक्सेस मिळतो. दैनिक डेटा कोटा संपल्यानंतर इंटरनेटचा वेग 40 Kbp पर्यंत घसरतो. इतकेच नाही तर या प्लॅनमध्ये 99 रुपयांच्या प्लॅनप्रमाणे अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि मोफत PRBT ची सुविधा देखील आहे.

नवीन रु. 319 प्लॅन वापरकर्त्यांसाठी 10GB डेटा उपलब्ध करून देतो. याशिवाय या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंगसह 300 मोफत एसएमएस सुविधाही उपलब्ध आहे. कंपनीचा हा प्लान वापरकर्त्यांना 65 दिवसांपर्यंत वैधता देतो.

महत्वाचे बदल

  1. BSNL कंपनीने अलीकडेच दोन नवीन मासिक प्रीपेड रिचार्ज प्लॅन लाँच केले
  2. ज्यांची किंमत 228 रुपये आणि 239 रुपये आहे
  3. या योजनांची वैधता 1 महिन्यापर्यंत आहे
  4. 228 रुपयांच्या रिचार्जमध्ये वापरकर्त्यांना अमर्यादित व्हॉइस कॉलिंग
  5. दररोज 2GB डेटा आणि दररोज 100 मोफत एसएमएस मिळतात
  6. BSNL च्या 239 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि 10 रुपयांचा अतिरिक्त टॉकटाइम दिला जातो
  7. याशिवाय या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा आणि दररोज 100 मोफत एसएमएस सारखे फायदेही मिळतात.