OnePlus Nord 2T 5G लवकरच होणार लाँच, 80W चार्जिंगसह 50MP दमदार कॅमेराचा समावेश

OnePlus लवकरच Nord सीरिजचा फ्लॅगशिप फोन OnePlus Nord 2T 5G भारतात लाँच करणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. हा फोन याआधीच अनेक मार्केटमध्ये रिलीज झाला आहे. या लेखातून या स्मार्टफोनबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत

OnePlus Nord 2T 5G लवकरच होणार लाँच, 80W चार्जिंगसह 50MP दमदार कॅमेराचा समावेश
Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jun 28, 2022 | 3:24 PM

वनप्लसने (OnePlus) भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये आपला आधीपासूनच दबदबा निर्माण केलेला आहे. कंपनी विविध फ्लॅगशिप फोनची निर्मिती करुन ग्राहकांसमोर नवनवीन पर्याय उपलब्ध करुन देत आहे. सध्या कंपनीच्या एका फ्लॅगशिप फोनची जगभर चर्चा सुरु आहे. हा फोन भारतीय बाजारपेठेत कधी दाखल होणार याचीही ग्राहकांना उत्सूकता होती. कंपनीने आता अधिकृतपणे याची माहिती आपल्या ग्राहकांना दिली आहे. यासोबतच कंपनीने आपल्या मार्केटींग (Marketing) धोरणात अनेक बदल केले आहेत. कंपनीचे पहिल्याच वर्षी दोन फोन लाँच असताना आता कंपनीकडून वर्षभरात अनेक फोन लाँच केले जात आहेत. अलीकडेच कंपनीने वनप्लस 10 आर (OnePlus 10R) आणि Nord 2 CE Lite 5G असे दोन स्मार्टफोन लाँच करणार असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, कंपनी भारतात आणखी एक फोन लाँच करणार असून तो स्मार्टफोन नॉर्ड सीरीजचा एक प्रीमियम डिव्हाइस असल्याची चर्चा रंगत आहे. OnePlus Nord 2T अनेक मार्केटमध्ये लाँच झाला आहे. ब्रँडने हा फोन भारतातही लाँच केल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. मात्र, त्याच्या लाँचिंगची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. रिपोर्ट्सनुसार, हा फोन 1 जुलै रोजी लाँच केला जाऊ शकतो. कंपनी ते Nord 2 मध्ये अपग्रेड म्हणून आणेल. भारतात या स्मार्टफोनची थेट स्पर्धा Poco F4, iQOO Neo 6 5G सारख्या फोनशी असेल. OnePlus Nord 2T च्या खास गोष्टींबाबत जाणून घेणार आहोत.

OnePlus Nord 2T ची फीचर्स

कंपनीने हा फोन युरोप आणि नेपाळसारख्या बाजारांत लाँच केला आहे. यामध्ये MediaTek Dimensity 1300 प्रोसेसर देण्यात आला आहे. डिव्हाइस 6.43 इंच फुल HD+ AMOLED स्क्रीनसह येते. डिसप्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हँडसेटमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे, याची मुख्य लेंस 50MP आहे. याशिवाय 8MP अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP मोनोक्रोम सेन्सर देण्यात आला आहे. समोर, 32MP सेल्फी कॅमेरा असेल. OnePlus Nord 2T ला 4500mAh बॅटरी मिळते, जी 80W चार्जिंगला सपोर्ट करेल. डिव्हाइसमध्ये ड्युअल स्पीकर, इन डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर, यूएसबी टाइप-सी पोर्ट यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. यात Android 12 वर आधारित Oxygen OS 12 मिळेल.

हे सुद्धा वाचा

किंमत किती असेल?

एका रिपोर्ट्सनुसार, OnePlus Nord 2T 5G दोन स्टोरेज कॉन्फिगरेशनमध्ये येईल. त्याच्या 8GB रॅम + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 28,999 रुपये असेल. त्याच वेळी, 12GB रॅम + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 33,999 रुपये असेल. हा फोन शॅडो ग्रे आणि जेड फॉग या दोन रंगांमध्ये उपलब्ध केला जाऊ शकतो. जुलैच्या पहिल्या आठवड्यात हा हँडसेट अॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.