BSNL चा 365 दिवसांसाठी फक्त ‘या’ किमतीत मिळतो दररोज 3 जीबी डेटा असलेला नवीन प्लॅन

सरकारी मालकीची टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने प्रीपेड वापरकर्त्यांसाठी या किमतीत नवीन प्लॅन लाँच केला आहे. हा रिचार्ज प्लॅन जास्त वैधतेसह येतो आणि जिओपेक्षा खूपच स्वस्त आहे. बीएसएनएल प्रीपेड वापरकर्त्यांना कोणते फायदे देते ते आजच्या या लेखात जाणून घेऊयात.

BSNL चा 365 दिवसांसाठी फक्त या किमतीत मिळतो दररोज 3 जीबी डेटा असलेला नवीन प्लॅन
BSNL
Image Credit source: TV9 Bharatvarsh
| Edited By: | Updated on: Dec 28, 2025 | 12:37 AM

आजच्या आधुनिक युगात प्रत्येकजण मोबाईलचा वापर करत आहे. आणि हा फोन आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. तर या मोबाईल फोनमध्ये आपल्याला दर महिन्याला रिचार्ज करावा लागतो. पण दर महिन्याला रिचार्ज करण्यापासून तुम्हाला मुक्ती हवी असेल तर नवीन वर्ष 2026 सुरू होण्याआधी सरकारी मालकीची टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने प्रीपेड वापरकर्त्यांसाठी एक नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. हा नवीन प्लॅन 26 डिसेंबरपासून रिचार्जसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. या नवीन प्लॅनची ​ किंमत 2,799 रूपये आहे. या प्लॅनमध्ये 365 दिवसांची वैधता आहे. कंपनीने मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X वर या नवीन प्लॅनबद्दल माहिती शेअर केली आहे. चला जाणून घेऊया की हा प्लॅन दररोज किती जीबी डेटा देतो आणि त्याचे काय फायदे आहेत.

बीएसएनएलच्या 2799 रूपयांच्या प्लॅनची ​​माहिती

बीएसएनएलच्या 2799 रुपयांच्या प्लॅनमध्ये कंपनी तुम्हाला दररोज 3 जीबी हाय-स्पीड डेटा देते. अमर्यादित कॉलिंगसह या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस देखील मिळतात. तर या 365 दिवसांच्या वैधतेसह आणि दररोज 3 जीबी डेटासह या प्लॅनमध्ये एकूण 1095 जीबी हाय-स्पीड डेटा मिळतो. 2799 रुपयांच्या दैनंदिन किमती आणि 365 दिवसांच्या वैधतेनुसार या प्लॅनची ​​दैनिक किंमत अंदाजे 7.67 रुपये आहे.

जिओचा 365 दिवसांचा प्लॅनची किंमत आणि फायदे

रिलायन्स जिओचा सर्वात स्वस्त प्लॅन ज्याची वैधता 365 दिवसांची आहे, त्याची किंमत 3,599 रुपये आहे. याचा अर्थ तो बीएसएनएलपेक्षा अंदाजे 800 रुपयांनी महाग आहे.

किंमतीव्यतिरिक्त, दोन्ही कंपन्यांच्या प्लॅनमधील फरक पाहूया

जिओचा 3,599 रुपयांच्या या प्लॅन मध्ये दररोज 2.5 जीबी हाय-स्पीड डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस सुविधा मिळते. या प्लॅनमध्ये काही अतिरिक्त फायदे देखील आहेत, जसे की 35,100 रूपये किमतीचा जेमिनी प्रो प्लॅन. ओटीटी उत्साही लोकांसाठी, हा प्लॅन तीन महिन्यांचा जिओ हॉटस्टार आणि 50 जीबी क्लाउड स्टोरेज देखील देतो. दैनंदिन खर्चाच्या बाबतीत, या 3599 रूपयांच्या प्लॅनची ​​दैनिक किंमत अंदाजे 9.86 आहे.