
तुम्ही जर कमी किमतीत फ्लॅगशिप स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही Nothing Phone 3 30,000 पर्यंत कमी किमतीत खरेदी करू शकता. गेल्या वर्षी लाँच झालेला हा फोन त्याच्या अनोख्या डिझाइन पॉवरफुल स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि फ्लॅगशिप कॅमेरा सेटअपसह लाँच झाला होता.तर विजय सेल्सने या फोनच्या किमतीत लक्षणीय घट केली आहे, ज्यामुळे त्याची किंमत 50,000 हजार पेक्षा कमी झाली आहे. ही डील विशेषतः कमी किमतीत प्रीमियम स्मार्टफोन हवा असलेल्या वापरकर्त्यांसाठी योग्य आहे.
नथिंग फोन 3 चा 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट असलेला हा फोन विजय सेल्सच्या वेबसाइटवर 59 हजार 999 रुपयांना लिस्टेड केला आहे, जो त्याच्या लाँच किमती 79 हजार 999 रूपयांपेक्षा कमी आहे. याव्यतिरिक्त, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक आणि काही निवडक बँक कार्डवर 10 हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट उपलब्ध आहे. यामुळे फोनची प्रभावी किंमत फक्त 49 हजार 999 रुपये झाली आहे.
नथिंग फोन 3 मध्ये 6.68 इंचाचा मोठा ओएलईडी डिस्प्ले आहे जो 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 4500 निट्सच्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो.हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एस जेन 4 प्रोसेसरने सुसज्ज आहे, जो अॅड्रेनो 825 जीपीयूसह येतो. हे संयोजन गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी उत्कृष्ट कामगिरी देते.
या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये OIS सपोर्टसह 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. 3x ऑप्टिकल झूमसह 50 मेगापिक्सेलचा पेरिस्कोप टेलिफोटो कॅमेरा आणि 114-डिग्री फील्ड ऑफ व्ह्यूसह 50 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा देखील आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, फोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.
नथिंग फोन 3 मध्ये 5500 एमएएचची मोठी बॅटरी आहे जी 65 वॅट फास्ट वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन अँड्रॉइड 15 वर आधारित नथिंग ओएसवर चालतो आणि कंपनीने या फोनमध्ये पाच प्रमुख अँड्रॉइड अपडेट्सचे आश्वासन दिले आहे.