तुमचा जुना फोन विकताय? तर ‘या’ 5 चुका टाळा, अन्यथा पश्चात्ताप करण्याची येईल वेळ
आजच्या युगात स्मार्टफोन हे फक्त बोलण्याचे साधन राहिलेलं नाही, तर तो आपल्या वैयक्तिक आयुष्याशी आणि पैशांशी संबंधित माहितीचा एक भाग बनला आहे. तुम्ही जर तुमचा जुना फोन विकत आहात तर या 5 चुका टाळा अन्यथा पश्चात्ताप करण्याची वेळ येईल. चला तर मग कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत ते जाणून घेऊयात.

आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन प्रत्येकाकडे आहेत. तर हे स्मार्टफोन फक्त बोलण्याचे साधन राहिलेले नाही तर ते आपल्या वैयक्तिक जीवनाशी आणि आर्थिक बाबींशी संबंधित माहितीचा एक अविभाज्य भाग बनलेला आहे. चॅटिंग, सोशल मीडिया, ईमेलपासून ते UPI पेमेंट आणि बँकिंग ॲप्सपर्यंत सर्व काही फोनवर अगदी सहज रित्या करता येतात. पण कालांतराने आपल्यापैकी अनेकजण फोन अपग्रेड करण्यासाठी जुना फोन विकण्याचा निर्णय घेतात आणि नवीन फोन घेतात. आता तुम्ही जेव्हा तुमचा जुना फोन विकता तेव्हा एका छोट्याशा दुर्लक्षामुळेही तुमचं मोठं नुकसान होण्याची शक्यता असते. चला तर मग आजच्या लेखात आपण जुना फोन विकताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे महत्वाचे आहे ज्यामुळे तुमचं नुकसान होणार नाही, याबद्दल जाणून घेऊयात.
बऱ्याचदा लोकं फक्त सिम आणि मेमरी कार्ड काढून टाकतात आणि फोन देऊन टाकतात. पण तुम्हाला महितीये का फक्त सिम आणि मेमरी काढून चालत नाही, तर खरा धोका डिजिटल डेटामध्ये असतो.
डेटाचा बॅकअप घेणे ही सर्वात महत्वाची पहिली स्टेप
फोन विकण्यापूर्वी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या सर्व डेटाचा बॅकअप घेणे. आजकाल फोन केवळ फोटो आणि व्हिडिओच नाही तर महत्त्वाचे संपर्क, कागदपत्रे आणि ॲप माहिती देखील साठवतात. जर फोन बॅकअपशिवाय फॅक्टरी रीसेट केला तर हा सर्व डेटा कायमचा गमावू शकतो. तुमचा डेटा गुगल ड्राइव्ह, क्लाउड स्टोरेज किंवा तुमच्या लॅपटॉप वर बॅकअप घेऊन ठेवा. तुम्ही नवीन फोन खरेदी करता तेव्हा सर्व माहिती सहजपणे ट्रान्सफर केली जाऊ शकते.
लॉग-इन केलेले अकाउंट्स फोनमध्ये असल्यास पडू शकते महागात
बहुतेक स्मार्टफोन्स गुगल अकाउंट्स, सोशल मीडिया, शॉपिंग ॲप्स आणि बँकिंग ॲप्समध्ये आधीच लॉग इन केलेले असतात. जर तुम्ही तुमचा फोन विकण्यापूर्वी या अकाउंट्समधून लॉग आउट केले नाही तर नवीन वापरकर्ता तुमची वैयक्तिक माहिती अॅक्सेस करू शकतो. तुमच्या गुगल अकाउंट किंवा अॅपल आयडीमधून लॉग आउट न केल्यास अकाउंट रिकव्हरी होऊ शकते आणि तुमच्या नवीन फोनमध्ये लॉग इन होऊ शकते. तुमच्या अकाउंट्समधून योग्यरित्या साइन आउट करणे तुमच्या डिजिटल सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे आहे.
तुमचा बायोमेट्रिक डेटा डिलीट करायला विसरू नका
बरेच लोकं स्क्रीन लॉक काढून टाकतात पण फिंगरप्रिंट आणि फेस अनलॉक काढायला विसरतात. ही एक गंभीर सुरक्षा चूक असू शकते. तुमच्या फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन सर्व बायोमेट्रिक डेटा, पासवर्ड आणि पॅटर्न पूर्णपणे काढून टाकणे महत्वाचे आहे जेणेकरून फोनवर कोणतीही ओळख माहिती सेव्ह होणार नाही.
फॅक्टरी रीसेट आणि फोनची स्थिती देखील महत्त्वाची असते.
बॅकअप आणि लॉगआउट पूर्ण झाल्यानंतर सर्वात महत्वाची स्टेप म्हणजे फोन फॅक्टरी रीसेट करणे. यामुळे फोन नवीन असल्यासारखा दिसतो आणि यामुळे कोणताही वैयक्तिक डेटा काढून टाकला जातो. फोन स्वच्छ करणे देखील आवश्यक आहे. स्क्रीन, बॉडी आणि चार्जिंग पोर्ट स्वच्छ केल्याने चांगली किंमत मिळू शकते आणि खरेदीदारावर सकारात्मक प्रभाव पडू शकतो.
थोडेसे शहाणपण खूप त्रास वाचवते
तुमचा जुना फोन विकताना या गोष्टी लक्षात ठेवल्याने डेटा चोरी, अकाउंट हॅकिंग आणि आर्थिक नुकसान सहजपणे टाळता येते. लक्षात ठेवा तुमचा स्मार्टफोन बदलणे सोपे आहे, परंतु एक छोटीशी चूक दीर्घकालीन पश्चात्तापाचे कारण बनू शकते.
