2000 रुपयांहून कमी EMI मध्ये घरी न्या 108MP कॅमेरावाला लेटेस्ट 5G फोन, जाणून घ्या फीचर्स

Mi 11X Pro 5G हा स्मार्टफोन कंपनीने या वर्षी लाँच केला होता आणि त्यात अनेक चांगले फीचर्स देण्यात आले आहेत. हा फोन केवळ लेटेस्ट डिझाईनसह नव्हे तर चांगल्या स्पेसिफिकेशन्ससह येतो.

2000 रुपयांहून कमी EMI मध्ये घरी न्या 108MP कॅमेरावाला लेटेस्ट 5G फोन, जाणून घ्या फीचर्स
Mi 11X Pro 5G

मुंबई : Mi 11X Pro 5G हा स्मार्टफोन कंपनीने या वर्षी लाँच केला होता आणि त्यात अनेक चांगले फीचर्स देण्यात आले आहेत. हा फोन केवळ लेटेस्ट डिझाईनसह नव्हे तर चांगल्या स्पेसिफिकेशन्ससह येतो. या 5G फोनच्या बॅक पॅनलवर 108 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. हा फोन 2000 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या सुलभ हप्त्यांमध्ये खरेदी करता येईल. हा फोन 120hz रिफ्रेश रेट आणि अॅडव्हान्स्ड कूलिंग सिस्टमसह येतो. (Buy 108MP camera phone Xiaomi mi11X pro 5G under Rs 2000 installment, know features and Offer)

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवर मिळणाऱ्या या स्मार्टफोनची किंमत 39,999 रुपये आहे. पण स्टेट बँक ऑफ इंडियासह अनेक मोठ्या बँका अॅमेझॉनवर सुलभ हप्त्यांचा पर्याय देत आहेत. एसबीआय क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना स्टँडर्ड योजनेअंतर्गत हा फोन 1,939 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी मिळत आहे. हे हप्ते 24 महिने चालतील. यावर 15 टक्के दराने 6,547 रुपयांचे व्याज भरावे लागेल. अशा स्थितीत या फोनसाठी 46,546 रुपये द्यावे लागतील.

Mi 11X तसेच Mi 11X Pro मोबाईल्समध्ये रिव्हॉल्यूशनरी कॅमरा

शाओमीने Mi 11X तसेच Mi 11X Pro या आपल्या नव्या मोबाईल्समध्ये रिव्हॉल्यूशनरी कॅमरा, नवे फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगन 870 आणि 888 प्रोसेसर दिले आहे. त्यासोबतच या मोबाईल्सना पॉवरफुल डॉल्बी स्टीरिओ स्पीकर, 120 Hz E4 सुपर AMOLED डिस्प्ले तसेच फास्ट चार्जिंगची क्षमता असलेली बॅटरी दिलेली आहे.

Mi 11X आणि Mi 11X Pro ची विशेषता काय आहे ?

मिड-रेंज Mi 11X आणि Mi 11X Pro स्मार्टफोन तीन रंगांत उपलब्ध आहेत. कॉस्मिक ब्लॅक, लूनर व्हाईट तसेच मॅजिक सेलेस्टियल सिल्व्हर रंगामध्ये हे फोन उपलब्ध आहेत.

कसा आहे Mi 11X Pro?

Mi 11X Pro चे पहिले मॉडेल 8GB RAM तसेच 128GB स्टोअरेज क्षमतेचे असून त्याची मूळ किंमत 39,999 रुपये आहे. तर दुसरे मॉडेल हे 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज क्षमतेचे असून त्याची मूळ किंमत 41,999 रुपये आहे. या मोबाईलमध्ये 108 MP+ 8MP + 5MP ट्रिपल कॅमेरा सेन्सर प्रोव्हाईड करण्यात आले आहे. तसेच या मॉडेलची स्क्रीन 6.67 इंच असून चार्चिंगसाठी 4520 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

Mi 11X फोनमध्ये काय आहे खास?

Mi 11X सीरिजमध्ये 6GB RAM आणि 128GB स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची मूळ किंमत 29,999 रुपये आहे. तर 8GB RAM आणि 128GB स्टोअरेज क्षमता असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत 31,999 रुपये आहे. या मॉडेलमध्ये 48MP + 8MP + 5MP क्षमतेचा कॅमेरा देण्यात आला आहे. या मॉडेलमध्ये मोबईलची स्क्रीन ही 6.67 इंच एवढी असून बॅटरीची क्षमता 4520 mAh एवढी आहे.

इतर बातम्या

108 मेगापिक्सल कॅमेरासह Xiaomi Redmi K50 Pro+ लाँच होणार, जाणून घ्या फोनमध्ये काय असेल खास?

Samsung चा किफायतशीर 5G स्मार्टफोन लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

5000mAh बॅटरी, 4 कॅमरे असलेल्या Samsung च्या बजेट फ्रेंडली स्मार्टफोनच्या किंमतीत 2500 रुपयांची कपात

(Buy 108MP camera phone Xiaomi mi11X pro 5G under Rs 2000 installment, know features and Offer)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI