108 मेगापिक्सल कॅमेरासह Xiaomi Redmi K50 Pro+ लाँच होणार, जाणून घ्या फोनमध्ये काय असेल खास?

शाओमीचा सब-ब्रँड Redmi K50 सीरीजचा स्मार्टफोन लवकरच लॉन्च करू शकतो. या हँडसेटमध्ये पंच होल कटआउटसह फ्रंट कॅमेरा दिला जाईल.

108 मेगापिक्सल कॅमेरासह Xiaomi Redmi K50 Pro+ लाँच होणार, जाणून घ्या फोनमध्ये काय असेल खास?
Redmi K40 Pro+

मुंबई : शाओमीचा सब-ब्रँड Redmi K50 सीरीजचा स्मार्टफोन लवकरच लॉन्च करू शकतो. या हँडसेटमध्ये पंच होल कटआउटसह फ्रंट कॅमेरा दिला जाईल. GSM Arena च्या रिपोर्ट नुसार, आगामी स्मार्टफोन K50 मध्ये साइड माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर असण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 898 एसओसी चिपसेट दिला जाऊ शकतो. (Xiaomi Redmi K50 Pro+ to launch with periscope zoom and 108MP camera in 2022)

Redmi K50 Pro Plus च्या रियर कॅमेरा सेटअपमध्ये 108MP प्रायमरी कॅमेरा आणि झूम लेन्स असू शकतात आणि हा सेटअप ट्रिपल कॅमेरा युनिटसह सुसज्ज असू शकतो. या फोनमध्ये लेटेस्ट एमआययूआय इंटरफेससह अँड्रॉइड 12 आणि 67 वॉट किंवा 120 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000 एमएएच बॅटरी पॅक अपेक्षित आहे.

Redmi ने अलीकडेच भारतात Redmi 10 Prime लाँच केला आहे, ज्याची किंमत 4GB+64GB स्टोरेज मॉडेलसाठी 12,499 रुपये आणि 6GB+128GB मॉडेलसाठी 14,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन फुल-एचडी+ रिझोल्यूशन आणि 90 हर्ट्ज अॅडॅप्टिव्ह रिफ्रेश रेटसह 6.5 इंचांच्या आयपीएस एलसीडी स्क्रीनसह येईल.

या फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे ज्यात 50 एमपी प्रायमरी स्नॅपर, 8 एमपी अल्ट्रा-वाइड लेन्स, 2 एमपी मॅक्रो सेंसर आणि 2 एमपी डेप्थ लेन्स आहेत. यात 8MP चा सेल्फी कॅमेरा देखील आहे. फोनचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे त्याचा 108 मेगापिक्सलचा कॅमेरा जो पेरीस्कोप टेलिफोटो शूटर म्हणून काम करेल, जर सर्व स्पेक्स लीक्सनुसार असले तर या फोनचं प्रो + व्हर्जन एक संपूर्ण फ्लॅगशिप स्मार्टफोन असेल.

स्नॅपड्रॅगन 898 आपल्याला खात्री देतो की K50 Pro+ या सुट्टीच्या हंगामात येणार नाही कारण क्वालकॉमने अद्याप त्याच्या प्रमुख एसओसीची घोषणा केली नाही आणि या वर्षाच्या अखेरीस याची घोषणा होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, एक गोष्ट निश्चित आहे की, फोन 2022 च्या सुरुवातीला लॉन्च केला जाईल.

रेडमी सातत्याने दमदार स्मार्टफोन लाँच करत आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांना या फोनकडूनही मोठ्या अपेक्षा आहेत. सध्या, किंमत जाहीर केली गेली नाही परंतु फोन मिड-बजेट श्रेणीमध्ये समाविष्ट केला जाऊ शकतो.

इतर बातम्या

5000mAh बॅटरी, 4 कॅमरे असलेल्या Samsung च्या बजेट फ्रेंडली स्मार्टफोनच्या किंमतीत 2500 रुपयांची कपात

OnePlus च्या शानदार स्मार्टफोनवर 5000 रुपयांचा डिस्काऊंट, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

2500 रुपयांहून कमी किंमतीत 4G फोन, लिस्टमध्ये नोकियासह अनेक उत्कृष्ट पर्याय उपलब्ध

(Xiaomi Redmi K50 Pro+ to launch with periscope zoom and 108MP camera in 2022)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI