AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवीन मोबाईल खरेदी करताय? मोबाईल खरेदी करताना गोंधळ उडालाय, मग ही माहिती वाचाच

बाजारात सध्या प्रत्येक प्राईस (Price) रेंजमध्ये मिळणारे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. एकदा का तुमचं बजेट आणि गरज ठरल्यांतर स्मार्टफोनची निवड करणं सोपं होणार आहे. आज आपण मोबाईलची निवड करताना काय काळजी घ्यावी याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

नवीन मोबाईल खरेदी करताय? मोबाईल खरेदी करताना गोंधळ उडालाय, मग ही माहिती वाचाच
| Updated on: Mar 06, 2022 | 5:30 AM
Share

नागपूरचा अभिषेक गेल्या काही दिवसांपासून स्मार्टफोनच्या (Smartphone) खरेदीवरून खूप गोंधळलेला आहे. बाजारात (market) विविध प्रकारचे फोन असल्यामुळे कोणता फोन घ्यावा याचा निर्णय अभिषेकला घेता येत नाही. त्यातच किती रुपयांचा फोन घ्यावा याचाही निर्णय त्याला घेता येत नाही. कमी पैशात चांगला फिचर्स असलेला फोन अभिषेकला खरेदी करायचाय. माफक दरात चांगला फोन कसा मिळेल? यामुळे अभिषेकचा गोंधळ वाढतच चाललाय. अभिषेकप्रमाणे तुम्हीही अशा गोंधळात असताल तर ही माहिती तुमचा गोंधळ दूर करण्यास नक्की मदत करू शकते. बाजारात सध्या प्रत्येक प्राईस (Price) रेंजमध्ये मिळणारे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. एकदा का तुमचं बजेट आणि गरज ठरल्यांतर स्मार्टफोनची निवड करणं सोपं होणार आहे. 91Mobiles, gsmarena.com आणि mysmartprice.com यासारख्या वेबसाईटवर तुम्हा स्मार्टफोनच्या विविध मॉडेलच्या किंमती आणि फिचर्सची तुलना करू शकता. तसेच तुम्ही विविध गॅझेट बेवसाईटवर स्मार्टफोनचे परीक्षणही वाचू शकता.

फोन खरेदी करताना या गोष्टी विचारात घ्या

सध्याच्या जमान्यात स्मार्टफोन्सच्या फीचर्समध्ये खूप लवकर बदल होत आहेत. म्हणजे कॅमेरा, RAM, प्रोसेसिंग पॉवर, बॅटरी, स्टोरेज खूप महत्वाचे आहेत. अशावेळी तुमच्यासाठी कॅमेरा क्वालिटी महत्वाची आहे की गेम खेळण्यासाठी मोबाईल खरेदी करायचा आहे ? हे ठरवावं लागेल. तुमच्यासाठी बॅटरी बॅकअप महत्वाचा आहे की मेमरी आणि स्पेस तुमची गरज निश्चित झाल्यानंतर फोनची निवड करू शकता. जर तुम्हाला फोटग्रॉफीची आवड आहे, सेल्फी काढण्याची आवड आहे तर चांगला कॅमेरा असणारा फोन घ्या. स्मार्टफोनमध्ये विविध कॅमेरे आणि लेन्स उपलब्ध आहेत. फ्रंट कॅमेरा, रियर कॅमेऱ्यात अनेक प्रकारचे लेन्स असतात. फोनमध्ये कॅमेरा किती मेगापिक्सचला आहे हे पहा. कॅमेराचा मेगापिक्सल जास्त आहे म्हणून फोटो चांगला येत नाही. चांगला फोटो काढण्यासाठी सेन्सरचा साईज चांगला असावा लागतो.

फोनची ऑपरेटिंग सिस्टिम कोणती आहे?

फोन खरेदी करताना तुम्हाला फोनच्या ऑपरेटिंग सिस्टिमचीही माहिती असायला हवी. तुम्हाला अ‍ॅड्राईड फोन हवा की iOS याचा विचार करा. फोन खरेदी करतेवेळी योग्य स्क्रीनसाईज कोणती ? सध्या स्मार्टफोनची स्क्रीन साईज साधारणपणे 6 इंचापेक्षा जास्त असते. तुम्हाला याच्यापेक्षा कमी साईजचा डिस्प्ले हवा असल्यास तोही पर्याय उपलब्ध आहे. एलसीडी,ओलेड, एमोलेड यासारखे डिस्प्लेचे प्रकार उपलब्ध आहेत. तुम्ही आवडीनुसार आणि गरजेनुसार योग्य डिस्प्ले असलेला फोन निवडा

फोनमध्ये किती स्टोरेज आहे ?

स्मार्टफोनमध्ये 8 GB ते 1 TB पर्यंत स्टोरेज कॅपेसिटी असणारे फोन आहेत. जर तुम्हाला बेसिक गरजेसाठी फोन हवा असल्यास 16 GB असलेला फोन घ्या. मात्र, तुम्ही खूप अॅपचा वापर करत असताल किंवा व्हिडीओ तयार करण्याची आवड असल्यास मग 128 जीबी स्टोरेज असलेला फोन तुमच्यासाठी योग्य राहील. सध्या एकदा फोन चार्ज केल्यानंतर पाच ते सहा तास वापर करू शकता. त्यामुळे चांगला बॅटरी बॅकअपचा फोन निवडा

प्रोसेसर आणि रॅमची माहिती घ्या.

फोन चांगल्या स्पीडनं चालण्यासाठी लेटेस्ट प्रोसेसर आणि चांगल्या रॅमचा फोन घ्या. बाजारात 4GB RAM ते 8GB RAM चे फोन सामान्यपणे आढळून येतात. याशिवाय मोबाईल फोन खरेदी करतेवेळी आणखी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात.फोनमध्ये वायरलेस चार्जिंग सुविधा वापरण्याची सोय आहे का? फोनमधील ब्लूटूथचं व्हर्जन कोणतं आहे ? गेमिंग मोड कोणत्या प्रकारचा आहे ? Dual sim ची सुविधा आहे की नाही? फोनमध्ये स्टीरिओ स्पीकर आहे का? Finger print sensor आणि face unlock यासारखे फीचर्स आहेत का? एकदा का तुमची गरज आणि बजेट याचं नियोजन साधण्यात यशं आलं की फोन खरेदी करणं सोपं होतं.

संबंधित बातम्या

स्टारलिंक सॅटेलाईट सिस्टमचा सावधानतेने वापर करा;स्पेसएक्सचा सीईओ एलन मास्कचे आवाहन; रशिया करु शकते गैरवापर

अ‍ॅमेझॉनवर Apple iPhone 12 मिळत आहे एकदम स्वस्तात, काय आहे कॅशबॅक आणि एक्सेंझ ऑफर जाणून घ्या…

Facebook : फेसबुकचा कारवाईचा बडगा; महिनाभरात एक कोटींहून अधिक तक्रारींची दखल

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.