तुमचा G-mail हॅक झाल्यास काय करावे? सुरक्षेची कशी काळजी घ्यावी? प्रोसेस जाणून घ्या

जीमेल अकाउंट हॅक होऊ शकते का? जर Gmail अकाउंट हॅक झाले तर काय होऊ शकते आणि ते कसे टाळता येईल? त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखात जाणून घेऊयात. तसेच यानंतर तुम्ही हॅकिंगचा बळी होण्यापासून कसे वाचू शकता, याची प्रोसेस जाणून घेऊयात...

तुमचा G-mail हॅक झाल्यास काय करावे? सुरक्षेची कशी काळजी घ्यावी? प्रोसेस जाणून घ्या
gmail 3
| Edited By: | Updated on: May 08, 2025 | 6:49 PM

आजकाल ऑनलाईनच्या जगात अनेक स्कॅम तसेच मोबाईल हॅकिंगचे प्रकरण मोठ्या प्रमाणात वाढत चालेले आहे. अशातच आता जीमेल हॅक करणे खूप सोपे आहे. जर तुम्ही तुमच्या गोपनीय माहितींकडे लक्ष दिले नाही, तर स्कॅमर्सकडून सहजपणे तुमचे जीमेल अकाउंट हॅक केले जाऊ शकते. जर असे झाले तर ते तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनासाठी धोकादायक ठरू शकते. आज, जीमेल फक्त ईमेलपुरते मर्यादित राहिलेले नाही. तुमचे YouTube, Google Drive, Photos, Docs आणि अगदी बँकिंग तपशील या सर्वांची माहिती आपल्या जीमेल अकाउंटशी जोडलेले असतात.

जर G-mail हॅक झाले तर काय नुकसान होऊ शकते?

  • जर तुमचे जीमेल हॅक झाला तर तुमचा वैयक्तिक डेटा चोरीला जाऊ शकतो. ईमेल, कागदपत्रे, फोटो किंवा कॉन्टॅक लीक होऊ शकतात.
  • बँक फसवणुकीचा धोका वाढतो. जीमेल किंवा बँक तपशीलांशी संबंधित ओटीपीद्वारे फसवणूक केली जाऊ शकते.
  • सोशल मीडिया अकाउंट हॅक होऊ शकतात. जर तुमचे सोशल मीडिया अकाउंट पासवर्ड तसेच आधिक माहिती Gmail शी जोडलेले असतील तर ते देखील धोक्यात येऊ शकतात.
  • फिशिंग किंवा स्पॅम पाठवले जाऊ शकते. हॅकर्स तुमच्या खात्यातून इतरांना बनावट ईमेल पाठवू शकतात.

तुमचे Gmail हॅक झाले आहे की नाही हे कसे ओळखावे?

  • जर तुम्हाला तुमचे जीमेल हॅक झाले आहे की नाही हे तपासायचे असेल तर तुम्ही ते सहजपणे तपासू शकता. यासाठी, प्रथम तुमच्या Last account activity तपासा. यासाठी, तुमचे जीमेल उघडा. सर्वात खाली उजव्या बाजूला दिलेल्या “Last account activity” पर्यायावर क्लिक करा. Details वर क्लिक केल्यावर लॉगिन हिस्ट्री पहा.
  • जर कोणतेही अज्ञात स्थान, उपकरण किंवा वेळ दिसली तर धोका असू शकतो. यासाठी,Google Account Activity पहा.
  • यासाठी https://myaccount.google.com/security-checkup या लिंकवर जा.
  • येथून, लॉगिन डिव्हाइसेस, अॅप्स, पासवर्ड आणि रिकव्हरी पर्याय तपासा. यामध्ये तुम्हाला Unusual activity अलर्ट दिसेल. जर संशयास्पद लॉगिन असेल तर गुगल सहसा तुम्हाला ईमेल पाठवते.

जीमेल हॅकिंग कसे टाळावे?

तुमच्या जीमेल आयडीवर एक मजबूत पासवर्ड ठेवा. असा पासवर्ड वापरा Aa45#x@z. Two-Step Verification (2FA)चालू करा. याशिवाय, बनावट मेल किंवा लिंक्सवर क्लिक करू नका. पब्लिक वाय-फाय वरून Gmail लॉग इन करू नका. Antivirus आणि मोबाईल सिक्युरिटी अ‍ॅप्स वापरा.

Have I Been Pwned

तुमचा जीमेल हॅक झाला आहे की नाही हे Have I Been Pwned वरून कसे तपासायचे? जर तुम्हाला शंका असेल की तुमचे जीमेल अकाउंट डेटा लीक किंवा हॅकिंगचा बळी पडले आहे, तर तुम्ही Have I Been Pwned या मोफत आणि विश्वासार्ह वेबसाइटच्या मदतीने ते सहजपणे तपासू शकता. ही वेबसाइट तुम्हाला सांगते की तुमचा ईमेल आयडी कोणत्याही डेटा उल्लंघनाचा भाग आहे की नाही.