TRUE CALLER: केंद्र सरकारची लवकरच ‘स्वदेशी ट्रू-कॉलर’ प्रणाली, खासगी कंपन्याना चाप?

| Updated on: May 20, 2022 | 11:43 PM

केंद्रीय दूरसंचार मंत्रालयानं (DOIT) प्रायोगिक तत्वावर उपक्रम हाती घेतला आहे. केंद्र सरकारचं धोरण प्रत्यक्षात आल्यास ट्रू-कॉलर सारख्या कंपन्यांच्या सेवांवर बंधन येणार आहे. ग्राहकांच्या माहितीचा दुरुपयोग टाळण्यासाठी केंद्र स्वतंत्र नियमावलीच निश्चित करणार आहे.

TRUE CALLER: केंद्र सरकारची लवकरच स्वदेशी ट्रू-कॉलर प्रणाली, खासगी कंपन्याना चाप?
ट्रू-कॉलर अॕप
Image Credit source: tv9
Follow us on

नवी दिल्ली-  संपर्क यादीत नसलेल्या अनोळखी व्यक्तीचं नाव फोन उचलण्यापूर्वीच मोबाईल स्क्रीनवर झळकण्यामुळे वापरकर्त्यांना मोठा फायदा झाला आहे. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन ट्रू-कॉलर (True Caller) सारख्या कंपन्यांनी विकसित केलेली प्रणाली चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान, केंद्र सरकार लवकरच या धर्तीवर समांतर यंत्रणा उभारण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्रालयानं (DOIT) प्रायोगिक तत्वावर उपक्रम हाती घेतला आहे. केंद्र सरकारचं धोरण प्रत्यक्षात आल्यास ट्रू-कॉलर सारख्या कंपन्यांच्या सेवांवर बंधन येणार आहे. ग्राहकांच्या माहितीचा दुरुपयोग टाळण्यासाठी केंद्र स्वतंत्र नियमावलीच निश्चित करणार आहे. केवळ केवायसी वेळी नोंदणीकृत नावचं (Registered Number) मोबाईल स्क्रीनवर झळकू शकणार आहे.  वापरकर्त्यांच्या गोपनीय माहितीचा दुरुपयोग टाळण्यासोबत आर्थिक नुकसानीच्या घटनांना थेट पायबंद घालता येणार आहे.

स्वदेशी ट्रू-कॉलर:

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे (ट्राय)चेअरमन पी.डी.वाघेला यांनी तंत्राविषयी सविस्तर माहिती दिली आहे. याद्वारे केवळ फोन करणाऱ्या व्यक्तीचे केवळ केवायसी आधारित नाव स्क्रीनवर दिसून येईल. तंत्र प्रत्यक्षात आणण्यासाठी आगामी दोन महिन्यात प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात केली जाणार आहे.

‘ट्रू कॉलर’चं प्रयोजन काय?

अनोळखी क्रमांक शोधण्यासाठी ट्रू-कॉलरचा महत्वाचा उपयोग होतो. या तंत्रज्ञानाद्वारे फेक कॉल किंवा धमकीचे फोन आल्यास किंवा अज्ञात क्रमांकावरुन त्रासाच्या हेतून फोन करत असल्यास अशा क्रमांकांचा छडा लावणं ट्रू-कॉलरच्या सहाय्यानं सहज शक्य ठरतं.

हे सुद्धा वाचा

ट्रू-कॉलरची विश्वासहार्यता:

ट्रू-कॉलर वापरकर्त्यांची संख्या कोटीच्या घरात आहे.  फसवणुकीच्या हेतून ओळख दडवून किंवा बनावट तपशीलांची नोंद करुन गैरव्यवहाराच्या हेतूने ट्रू-कॉलरचा वापराची प्रकरण समोर आली आहे. त्यामुळे ट्रू-कॉलरवरील नाव नोंदणीच्या कार्यपद्धतीवरच थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.

कॉल ब्लॉकिंग ते रेकॉर्डिंग:

ट्रू-कॉलर (TrueCaller) हे स्मार्टफोन अॅप्लिकेशन आहे. या तंत्रज्ञानात इंटरनेटचे सहाय्य घेतले जाते. कॉलरची ओळख, कॉल-ब्लॉकिंग, फ्लॅश-मेसेजिंग, कॉल-रेकॉर्डिंग, चॅट आणि व्हॉइस ही ट्रू-कॉलरची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.या सेवेमध्ये नोंदणी करण्यासाठी वापरकर्त्यांनी एक मानक सेल्युलर मोबाइल नंबर प्रदान करणे आवश्यक ठरते. ट्रू-कॉलर अॕप हे Android आणि iOS साठी उपलब्ध आहे.