Google Maps वर Dark Theme रोलआऊट, अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी ‘या’ स्टेप्स फॉलो करा

| Updated on: Mar 25, 2021 | 8:56 AM

इंटरनेट वापरणारा भारत जगातील दुसरा सर्वात मोठा देश आहे आणि म्हणूनच येथे वापरकर्त्यांच्या (युजर्स) गरजा पूर्ण केल्या जातात.

Google Maps वर Dark Theme रोलआऊट, अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा
Google Map
Follow us on

मुंबई : इंटरनेट वापरणारा भारत जगातील दुसरा सर्वात मोठा देश आहे आणि म्हणूनच येथे वापरकर्त्यांच्या (युजर्स) गरजा पूर्ण केल्या जातात. रस्ता शोधण्यासाठी, कुठेही फिरायला गेल्यानंतर वेगवेगळी ठिकाणं एक्स्प्लोर करण्यासाठी, बस स्टॉप, रेल्वे-मेट्रो स्थानकं, दुकानं, हॉटेल्स, एटीएम शोधण्यासाठी आपण गुगल मॅप्सचा (Google Maps) वापर करतो. गुगल मॅप्स हे अ‍ॅप जगभरातील वाहनचालकांना रस्ता दाखवण्याचं काम करतं. त्यामुळे तुम्ही गुगल मॅपचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. (Dark Theme Rollout on Google Maps, Follow these steps to activate)

गुगल मॅप्सने जगातील सर्व अँड्रॉईड युजर्ससाठी डार्क थीम रोलआउट करणे सुरू केले आहे. गेल्या वर्षभरापासून कंपनी या फीचरची चाचणी करीत आहे. गुगलने आपल्या अँड्रॉयड हँडलवरून केलेल्या ट्विटमध्ये लिहिले की, “आपल्याला काय हवं आहे? डार्क थीम! आपल्याला ही थीम कुठे हवी आहे.? Google मॅप्स !” गेल्या वर्षी सप्टेंबरपासून गूगल कंपनी गुगल मॅपसाठी डार्क मोडची (डार्क थीम) चाचणी घेत आहे आणि आता ते फीचर अँड्रॉइड युजर्ससाठी जागतिक पातळीवर रोलआऊट करण्यात आलं आहे.

डार्क मोड/थीमचा फायदा काय?

नाईट मोड किंवा डार्क मोडचा वापर आपल्या डोळ्यांना आवश्यक असलेला ब्रेक किंवा आराम देणे तसेच बॅटरी लाईफ वाचवण्यासाठी केला जाईल. दरम्यान, तुमच्या अॅपमध्ये डार्क थीम अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी, आपल्याला फक्त Google मॅप्समधील वरच्या उजव्या कोपर्‍यात मॅप आयकॉनवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर कॉन्फिगरेशन पर्यायांच्या सूचीतील थीम सेटिंग्ज शोधणे आणि नंतर डार्क मोड सक्रिय करणाऱ्या पर्यायाची निवड करावी लागेल.

फीचरचा अ‍ॅक्सेस कसा मिळणार?

या फीचरचा अ‍ॅक्सेस मिळवण्यासाठी युजर्सना अँड्रॉयड ओएसचं लेटेस्ट व्हर्जन 10.61.2 डाउनलोड करावं लागेल. डार्क मोड फीचर्ससह गुगल मॅप्समध्ये बॅकग्राउंडसाठी ग्रे कलरमध्ये सुपर-डार्क शेड देण्यात आली आहे. रस्त्यांची नवं ग्रे कलरच्या हलक्या शेडमध्ये दिसतील. ज्यामुळे युजर्स महत्त्वपूर्ण ठिकाण आणि रस्ते नीट पाहू शकतील.

डार्क मोड अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा

1. गुगल मॅप्स अ‍ॅपवर वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात आपल्या प्रोफाईल आयकॉनवर क्लिक करा
2. ऑप्शन्सच्या लिस्टमधील थीम्स सेटिंग्स हा पर्याय निवडा
3. ‘ऑलवेज इन डार्क थीम’ मोड वर क्लिक करा.
4. तुम्हाला जर ओरिजनल व्हाईट मोड (Original white mode) वर परत जायचे असेल तर वर दिलेल्या स्टेप्स फॉलो करा आणि ‘ऑलवेज इन डार्क थीम’ ऑप्शन निवडण्याऐवजी ‘ऑलवेज इन लाइट थीम’ या ऑप्शनवर क्लिक करा

संबंधित बातम्या

Google चे नवे नियम ऐकले नाहीत तर खरंच Gmail अकाउंट बंद होणार?

Take Right Turn नव्हे, ‘आता उजवीकडे वळा!’ Google Maps आता मराठीत मार्ग दाखवणार

(Dark Theme Rollout on Google Maps, Follow these steps to activate)