Take Right Turn नव्हे, ‘आता उजवीकडे वळा!’ Google Maps आता मराठीत मार्ग दाखवणार

इंटरनेट वापरणारा भारत जगातील दुसरा सर्वात मोठा देश आहे आणि म्हणूनच येथे वापरकर्त्यांच्या (युजर्स) गरजा पूर्ण केल्या जातात.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 20:43 PM, 29 Jan 2021
Take Right Turn नव्हे, 'आता उजवीकडे वळा!' Google Maps आता मराठीत मार्ग दाखवणार

मुंबई : इंटरनेट वापरणारा भारत जगातील दुसरा सर्वात मोठा देश आहे आणि म्हणूनच येथे वापरकर्त्यांच्या (युजर्स) गरजा पूर्ण केल्या जातात. रस्ता शोधण्यासाठी, कुठेही फिरायला गेल्यानंतर वेगवेगळी ठिकाणं एक्स्प्लोर करण्यासाठी, बस स्टॉप, रेल्वे-मेट्रो स्थानकं, दुकानं, हॉटेल्स, एटीएम शोधण्यासाठी आपण गुगल मॅप्सचा (Google Maps) वापर करतो. गुगल मॅप्स हे अ‍ॅप जगभरातील वाहनचालकांना रस्ता दाखवण्याचं काम करतं. त्यामुळे तुम्ही गुगल मॅपचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. कारण Google मॅप्सची सुविधा आता 10 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. त्या 10 भाषांमध्ये मराठीचाही समावेश असणार आहे. (Google Maps improves support for 10 Indian languages with Marathi)

गुगल मॅप्समध्ये 10 भारतीय भाषांना सपोर्ट करणारी ऑटोमेटिक ट्रान्सलिट्रेशन सिस्टिम सुरू करण्यात येणार आहे. स्थानिक भाषेत गुगल मॅप्सची सेवा सुरू होत असल्यामुळे इंग्रजी न समजणाऱ्या युझर्सना एखादा पत्ता शोधणे सोपे होणार आहे. एका ब्लॉगपोस्टद्वारे गुगलने याबाबतची माहिती दिली आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की गुगल मॅप्सची सुविधा आता मराठीसह हिंदी, गुजराती, बंगाली, मल्याळम, कन्नड, पंजाबी, उडिया, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे.

केवळ इंग्रजी भाषेत उपलब्ध असूनही कोट्यवधी भारतीय युजर्स गुगल मॅप्सचा वापर करतात. दरम्यान आता 10 प्रादेशिक भाषांमध्ये गुगल मॅप्स सेवा देणार असल्याने गुगल मॅप्सच्या भारतीय वापरकर्त्यांची संख्या अजून वाढणार आहे. त्यामुळे आता रस्ता शोधण्यासाठी, कुठेही फिरायला गेल्यानंतर वेगवेगळी ठिकाणं एक्स्प्लोर करताना, बस स्टॉप, रेल्वे-मेट्रो स्थानकं, दुकानं, हॉटेल्स-रेस्टॉरंट्स, मॉल्स बँका-एटीएम शोधण्यासाठी तुम्ही मराठी भाषेचा वापर करु शकता.

गुगल मॅप्सचं अजून एक फिचर

हेही वाचा

Google चे नवे नियम ऐकले नाहीत तर खरंच Gmail अकाउंट बंद होणार?

आता WhatsApp वरील चॅट्स Telegram वर मूव्ह करा, नवं फिचर लाँच

WhatsApp, Signal की Telegram, कोणतं अ‍ॅप आहे बेस्ट आणि सुरक्षित?

‘या’ 5 तगड्या फिचर्समुळे Telegram अ‍ॅप WhatsApp हून दमदार

(Google Maps improves support for 10 Indian languages with Marathi)