AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता WhatsApp वरील चॅट्स Telegram वर मूव्ह करा, नवं फिचर लाँच

अनेक युजर्स WhatsApp बंद करुन Signal किंवा Telegram शिफ्ट होत आहेत परंतु त्यापैकी काहींना त्यांचे चॅट्स गमावण्याची भीती आहे.

आता WhatsApp वरील चॅट्स Telegram वर मूव्ह करा, नवं फिचर लाँच
| Updated on: Jan 29, 2021 | 5:01 PM
Share

मुंबई : नेहमी युजर्ससाठी नवनवीन फिचर्स लाँच करणाऱ्या WhatsApp ने या वर्षांच्या सुरुवातीला नवीन फिचर आणण्याऐवजी नव्या अटी आणि शर्तींसह गोपनीयता धोरण (Privacy policy) सादर केलं आहे. जर तुम्ही या अटी-शर्ती अमान्य केल्या तर तुमचं अकाऊंट डिलीट केलं जाईल. या अटी मान्य करण्यासाठी कंपनीने युजर्सना 8 फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली होती. WhatsApp च्या या नव्या धोरणामुळे अनेक युजर्स नाराज आहेत. त्यामुळे अनेकांनी WhatsApp च्या या अटी मान्य करण्याऐवजी WhatsApp वापरणं बंद करण्यास प्राधान्य देण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे अशा युजर्सनी अन्य इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप्सकडे मोर्चा वळवला आहे. त्यातही बहुतांश युजर्स हे त्यांचं WhatsApp अकाऊंट डिलीट करुन Signal आणि Telegram सारख्या इतर मेसेजिंग अ‍ॅप्सवर शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला आहे. (WhatsApp users can now move chats to Telegram: know How its works)

युजर्स WhatsApp बंद करुन Signal किंवा Telegram शिफ्ट होत आहेत परंतु त्यापैकी काहींना त्यांचे चॅट्स गमावण्याची भीती आहे. अशा युजर्सना दिलासा देणारी बातमी आम्ही घेऊन आलो आहोत. कारण आता तुम्ही तुमचे WhatsApp चॅट्स Telegram वर मूव्ह करु शकता. Telegram ने नुकतंच एक नवं फिचर रोलआऊट केलं आहे, जे सध्या अँड्रॉयडवर उपलब्ध आहे. या फिचरच्या मदतीने WhatsApp युजर्स त्यांचे चॅट्स आणि मल्टीमीडिया फाईल्स आरामात टेलिग्रामवर शिफ्ट करु शकतात. हे चॅट एक्सपोर्ट फिचर आयफोन युजर्ससाठीदेखील रोलाऊट करण्यात आलं आहे, परंतु सध्या फाईल्स एक्सपोर्ट करण्यात युजर्सना काही अडचणी येत आहेत. जे युजर्स टेलिग्रामवर शिफ्ट होत आहेत, सध्या त्यांचे चॅट्स रिकामे आहेत, त्यामुळे हे फिचर त्यांच्यासाठी खूपच महत्त्वाचं आहे. टेलिग्रामने हे फिचर लाईन आणि kakaotalk युजर्ससाठीदेखील दिलं आहे.

टेलिग्रामवर चॅट एक्सपोर्ट कसं कराल?

1. तुम्ही जर अँड्रॉयड फोन वापरत असाल तर सर्वात आधी तुम्ही WhatsApp चॅट ओपन करा.

2. कोपऱ्यात तीन डॉट्स असलेला एक पर्याय आहे त्यावर क्लिक करा.

3. तीन डॉट्सवर क्लिक केल्यानंतर दिसणाऱ्या पर्यायांपैकी मोअर (More) या पर्यायावर क्लिक करा.

4. आता तुम्हाला एक्सपोर्ट चॅट असा एक पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

5. एक्सपोर्टवर क्लिक केल्यानंतर शेअर मेनू ओपन होईल. त्यामध्ये टेलिग्रामची निवड करा.

नव्या फिचरची वैशिष्ट्ये

1. या फिचरचा वापर करुन तुम्ही सर्व युजर्सचे चॅट एक्सपोर्ट करु शकता. तसेच तुम्ही ग्रुप मेसेजेसही अशाच प्रकारे एक्सपोर्ट करु शकता. जे मेसेज टेलिग्रामवर इम्पोर्ट होतील, त्यावर त्याच दिवसाची तारीख (ज्या दिवशी मेसेज पाठवला होता त्याच दिवसाची तारीख आणि वेळ) दिसेल. त्यामुळे तुम्हाला चुकीची वेळ दिसणार नाही.

2. टेलिग्रामवर सर्व मेंबर्स चॅट पाहू शकतील.

3. जेव्हा तुम्ही मीडिया फाईल्स WhatsApp वरुन Telegram वर मूव्ह कराल तेव्हा टेलिग्राम त्यासाठी एक्स्ट्रा स्पेस घेणार नाही. त्यामुळे याचा तुमच्या मोबाईलमधील स्टोरेज स्पेसवर काहीच परिणाम होणार नाही.

4. या फिचरमधील विशेष बाब म्हणजे हे चॅट्स दोन्ही युजर्ससाठी एक्सपोर्ट होतील. तुम्ही आणि तुम्ही ज्यांच्याशी बोलत आहात अशा दोघांनाही या फिचरचा वापर करता येईल.

हेही वाचा

‘या’ 5 तगड्या फिचर्समुळे Telegram अ‍ॅप WhatsApp हून दमदार

WhatsApp, Signal की Telegram, कोणतं अ‍ॅप आहे बेस्ट आणि सुरक्षित?

(WhatsApp users can now move chats to Telegram: know How its works)

महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.