‘या’ 5 तगड्या फिचर्समुळे Telegram अ‍ॅप WhatsApp हून दमदार

आज आम्ही तुम्हाला Telegram वरील अशा काही फिचर्सबाबत माहिती देणार आहोत, ज्याच्या बाबतीत WhatsApp सध्या तरी Telegram अ‍ॅपशी बरोबरी करु शकणार नाही.

'या' 5 तगड्या फिचर्समुळे Telegram अ‍ॅप WhatsApp हून दमदार

मुंबई : नेहमी युजर्ससाठी नवनवीन फिचर्स लाँच करणाऱ्या WhatsApp ने या वर्षांच्या सुरुवातीला नवीन गोपनीयता धोरण (Privacy Policy) लागू केलं आहे. कंपनीने युजर्ससाठी एखादं नवं फिचर आणण्याऐवजी नव्या अटी आणि शर्ती आणल्या आहेत. जर तुम्ही या अटी-शर्ती अमान्य केल्या तर तुमचं अकाऊंट डिलीट केलं जाईल. या अटी मान्य करण्यासाठी कंपनीने युजर्सना 8 फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली आहे. दरम्यान, WhatsApp च्या या नवीन गोपनीयता धोरणामुळे अनेकजण WhatsApp वर आणि कंपनीच्या नवीन धोरणांवर टीका करत आहे. अनेकांनी तर WhatsApp ऐवजी Signal आणि Telegram सारख्या इतर मेसेजिंग अ‍ॅप्सवर शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला आहे. (Whatsapp Vs Telegram)

दरम्यान तिन्ही अ‍ॅप कंपन्या त्यांचंच अ‍ॅप कसं बेस्ट आणि अधिक सुरक्षित आहे, याचा प्रचार करत आहेत. तर इतर अॅप्स कसे आणि कुठे कमी पडतात याबाबतही मोठ्या प्रमाणात मार्केटिंग करत आहेत, अशा परिस्थितीत युजर्समध्ये गोंधळाचे वातावरण आहे. त्यातही प्रामुख्याने Telegram आणि WhatsApp मध्ये चढाओढ सुरु आहे. तसेच युजर्सनाही प्रश्न पडला आहे की, कोणतं अ‍ॅप सर्वात चांगले फिचर्स देतं. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला Telegram वरील अशा काही फिचर्सबाबत माहिती देणार आहोत, ज्याच्या बाबतीत WhatsApp सध्या तरी Telegram अ‍ॅपशी बरोबरी करु शकणार नाही. (Whatsapp Vs Telegram | WhatsApp cannot combat Telegram in these 5 cases)

फाईल शेअरिंग लिमिट

WhatsApp वर डेटा ट्रान्सफर करताना कोणताही युजर 100 एमबी पेक्षा अधिक साईज असलेली फाईल ट्रान्सफर करु शकत नाही. परंतु याबाबतीत टेलिग्राम भारी आहे. कारण टेलिग्रामवर 1.5 जीबी पर्यंतच्या फाईल्स शेअर करता येतात. सुरुवातीला अनेकांनी केवळ मोठ्या फाईल्स शेअर करण्यासाठी टेलिग्राम वापरणं सुरु केलं होतं.

सिक्रेट चॅट फिचर

टेलिग्राम अॅपवर चॅटिंगसाठी एंड-टू-एंड इनक्रिप्शन फिचर दिलं जातं. या फिचरचा वापर करण्यासाठी युजर एंड-टू-एंड इनक्रिप्टेड ऑप्शन अॅक्टिव्हेट करु शकतो. सोबतच टेलिग्रामवर युजर्सना सिक्रेट चॅटचा ऑप्शनही देण्यात आला आहे. सिक्रेट चॅट फॉरवर्ड करता येत नाही आणि जर कोणत्याही युजरने या चॅटचा स्क्रीनशॉट घेतला तर समोरच्या युजरला त्याचं नोटिफिकेशन जातं.

टेलीग्राम क्लाऊड स्टोरेज

युजर्सना टेलिग्रामवर डेटा स्टोर करण्यासाठी क्लाऊड स्टोरेजचा पर्याय देण्यात आला आहे. या क्लाऊड स्टोरेजवर युजर्स टेक्स्ट मेसेज, फोटो, व्हिडीओ आणि डॉक्यूमेंट्स सेव्ह करु शकतात. यामध्ये खास गोष्ट ही आहे की, यामध्ये कोणत्याही प्रकारचा डेटा लिमिट नाही. युजर्स टेलिग्रामवर अनलिमिटेड फाईल्स सेव्ह करु शकतात. तसेच या स्टोरेजचा कधीही कुठूहनी अॅक्सेस मिळवता येतो.

एकाच वेळी मल्टी-प्लॅटफॉर्म लॉग इन

टेलिग्राम हे अॅप मल्टी-प्लॅटफॉर्मला सपोर्ट करतं. कोणताही युजर त्याचं युजर नेम आणि पासवर्डद्वारे कोणत्याही डिव्हाईसवर लॉग इन करु शकतात आणि टेलिग्राम मेसेजिंग फिचरचा वापरही करु शकतात. या फिचरद्वारे एकाचवेळी अनेक डिव्हाईसेसवरुन टेलिग्राम अॅप वापरता येतं.

ग्रुपमध्ये 2 लाख लोकांना सहभागी होता येतं

WhatsApp वरील एका ग्रुपमध्ये जास्तीत जास्त 256 लोकांना सहभागी होता येतं. परंतु टेलिग्रामवर ही मर्यादा 2 लाखांची आहे. टेलिग्राम ग्रुप्समध्ये जास्तीत जास्त दोन लाख युजर्स सहभागी होऊ शकतात. टेलिग्राम युजर्सना ग्रुप चॅटसाठी तीन पर्याय देतं. यामध्ये ग्रुप, सुपरग्रुप आणि चॅनेल असे तीन प्रकार आहेत. तसेच ब्रॉडकास्टिंगसाठी चॅनेल क्रिएट करता येतात. आणि त्याद्वारे लाखो लोकांना मेसेज पाठवता येतो.

संबंधित बातम्या

तुमचा डेटा फेसबुकसोबत शेअर केला जात नाही, नव्या Privacy policy बाबत Whatsapp चं स्पष्टीकरण

व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेस ग्रुप लिंक Goggle Search वर लीक, WhatsApp कडून भूमिका जाहीर

सावधान! गुगलच्या एका क्लिकवर तुमच्या WhatsApp ग्रुपमध्ये कोणीही होऊ शकतं सहभागी

(Whatsapp Vs Telegram | WhatsApp cannot combat Telegram in these 5 cases)

Published On - 7:41 am, Wed, 13 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI