
टेस्लाचे मालक अब्जाधीश इलॉन मस्क यांनी व्हॉट्सअॅप संदर्भात केलेल्या पोस्ट खळबळ उडाली आहे.त्या जगभरात WhatsApp वापरणाऱ्या युजर्सच्या टेन्शनमध्ये वाढ झाली आहे. त्याचे झाले काय इलॉन मस्क यांनी एक्सवर पोस्ट करीत व्हॉट्सअप हे सुरक्षित नसल्याचा दावा केला आहे. त्यांनी या पोस्टमध्ये Signal वर देखील टीका केली आहे. तसेच आपल्या या पोस्टमध्ये इलॉन मस्क यांनी युजर्सना म्हटले आहे की तु्म्ही X Chat या सेवेचा वापर करा. मस्क यांची ही पोस्ट व्हॉट्सअपचा अमेरिकन कोर्टात सुरु असलेल्या कायदेशीर खटल्याच्या पार्श्वभूमीवर आली आहे.
ब्लूमबर्गच्या एका बातमीनुसार हा खटला ऑस्ट्रेलिया, मॅक्सिको आणि दक्षिण आफ्रीका सारख्या देशात राहणाऱ्या युजर्सच्या एका गटाने दाखल केला होता. या युजर्सने दावा केला आहे की हा प्लॅटफॉर्मची सुरक्षा लगभग नसल्याच्या बरोबर आहे. आणि मेटाचे कर्मचारी जेव्हा हवे तेव्हा प्रायव्हेट मॅसेजना एक्सेस करु शकतात.
या खटल्याचा मुख्य आधार एका साक्षीदाराची ती साक्ष आहे, ज्यात दावा केला आहे की मेटाचा इंटर्नल सिस्टीम कर्मचाऱ्यांना एका इंटर्नल रिक्वेस्ट प्रोसेसद्वारे एन्क्रिप्शनला बायपास करण्याची परवानगी देतो. 51 पानांच्या या तकारीनुसार मेटाचे कर्मचारी कथितपणे कंपनीच्या इंटर्नल सिस्टीमच्या मदतीने टास्क पाठवून एन्क्रिप्शनला बायपास करु शकतात. खटल्यात दावा केला आहे की एकदा इंजिनिअरद्वारे रिक्वेस्ट अप्रुव्ह झाल्यानंतर कर्मचाऱ्या स्टेशनवर एक व्हीजिट उपलब्ध होते.ज्याद्वारे ते युजरच्या युनिक आयडीचा वापर करुन रिअर टाईममध्ये युजर्सचे मॅसेजला वाचता येऊ शकते.
या खटल्यात या दाव्यांना सिद्ध करण्यासाठी आता पर्यंत कोणताही तांत्रिक पुरावा सादर केला गेलेला नाही. वॉट्सऐप नेहमीच सांगत आला आहे की एन्क्रिप्शन की (encryption key) केवळ सेंडर आणि रिसिव्हरच्या डीव्हाईसवर स्टोअर होत असते, जिला कंपनीसाठी मधल्या रस्त्यात मॅसेजेसना डीक्रिप्ट करणे आणि वाचणे अशक्य नाही.
येथे पोस्ट पाहा –
WhatsApp is not secure. Even Signal is questionable.
Use 𝕏 Chat. https://t.co/MWXCOmkbTD
— Elon Musk (@elonmusk) January 27, 2026
मेटाने या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. कंपनीचे एक प्रवक्त्याने PCMag ला सांगितले की हे दावे खोटे आणि खोडसाळ आहेत. मेटाने पुढे म्हटले आहे की व्हॉट्सऐप गेल्या एक दशकापासून Signal प्रोटोकॉलचा युज करुन एण्ड-टू-एन्क्रिप्टेड आहे. हा खटला एक निराधार रचलेली कहानी आहे आणि प्रतिवाद्याच्या वकीला विरोधात कायदेशीर कारवाई केले आहे.