कोणाचाही कितीही सुंदर फोटो असला तरी तुम्ही लाइक करू शकणार नाही…Facebook चा मोठा निर्णय; ते बटन आता …

आज जवळपास प्रत्येकजण फेसबूकवर आहे.  कोणाचीही एखादी पोस्ट किंवा फोटो आवडला की लगेच लाईक, कमेंट्स करतात. पण आता फेसबुकने घेतलेल्या एका निर्णयामुळे मात्र अनेक युजर्संना धक्का बसणार आहे. फेसबुकने काही नवीन नियम लागू केले आहेत, ते काय आहेत आणि कधीपासून लागू होणार आहेत हे जाणून घेऊयात. 

कोणाचाही कितीही सुंदर फोटो असला तरी तुम्ही लाइक करू शकणार नाही...Facebook चा मोठा निर्णय; ते बटन आता ...
Facebook removed external like and comment buttons
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 12, 2025 | 5:13 PM

आजच्या डिजिटल युगात, फेसबुक वापर न करणारा असा क्वचितच कोणी असू शकेल. आज सर्वांच्या फोन मध्ये फेसबुकपासून अनेक इतरही सोशल मीडियाचे अॅप असतात. तसं फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या खूप आहे. लाखो वापरकर्ते दररोज प्लॅटफॉर्मवर सक्रिय असतात. मात्र आता फेसबुकने मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय म्हणजे फेसबुकचे लाईक आणि कमेंट बटण काढून टाकलं जाणार आहे. खरं तर, 10 फेब्रुवारी 2026 पासून हा नियम लागू होणार आहे. पण हा नियम फक्त Facebook अॅप किंवा वेबसाइटपुरतातच असणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा की ज्या ब्लॉग, शॉपिंग पोर्टल आणि वेबपेजमध्ये फेसबुक पोस्ट एम्बेड ,कमेंट आणि लाईक करण्याचं जे बटण असेल ते नसणार आहे. तुम्ही न्यूज वेबसाइट किंवा ब्लॉगवर बसून पोस्टला लाईक किंवा कमेंट करू शकणार नाही.

लाईक बटण 2009 मध्ये सादर करण्यात आले

फेसबुकने 2009 मध्ये लाईक बटण लाँच केले. त्यावेळी ते एक लहान वैशिष्ट्य म्हणून पाहिले जात होते, परंतु काही वर्षांतच ते सोशल मीडियाचे एक वैशिष्ट्य बनले. नंतर मेटाने हे बटण बाह्य वेबसाइट्स, न्यूज पोर्टल्स आणि ब्लॉगमध्ये जोडले, ज्यामुळे लोक त्यांच्या फेसबुक अकाऊंटचा वापर करून तिथून पोस्टवर लाईक किंवा कमेंट करू शकतील. हळूहळू, हे बटण लाखो वेबसाइट्सवर दिसू लागले आणि वापरकर्त्यांसाठी पोस्टची लोकप्रियता व्यक्त करण्याचा हा एक सोपा मार्ग बनला. लाईक बटण ब्रँड आणि मीडिया हाऊसेससाठी देखील एक आवश्यक साधन बनले, ज्यामुळे त्यांना त्यांच्या सामग्रीची पोचपावती आणि प्रेक्षकांच्या पसंती समजून घेण्यास मदत झाली.

काय होणार आता बदल

आता, मेटाने हे बटण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 10 फेब्रुवारी 2026 नंतर, फेसबुकचे लाईक किंवा कमेंट बटण कोणत्याही बाह्य वेबसाइटवर दिसणार नाही. याचा अर्थ असा नाही की लाईक बटण फेसबुकवरून गायब होईल, तर ते आता फेसबुक अॅप आणि वेबसाइटपुरते मर्यादित असेल. जर तुम्ही एखाद्या बातम्यांच्या वेबसाइटवर लेख वाचत असाल आणि फेसबुकचा छोटासा निळा अंगठ्याचं चिन्ह दिसलं तर ते येत्या काही दिवसांत गायब होणार आहे. याचा अर्थ युजर्सना आता कोणत्याही कंटेंटवर त्यांचा अभिप्राय, मतं देण्यासाठी थेट फेसबुकवरच जावं लागणार.

मेटाने हा निर्णय का घेतला?

मेटाने हा बदलाची करण्याची दोन प्रमुख कारणे सांगितली आहेत. तांत्रिक अपडेट आणि प्रायवेसी ही दोन कारणे आहेत. कंपनीने म्हटले आहे की हे एम्बेडेड फेसबुक प्लगइन्स खूप जुने झाले आहेत आणि तसेच युजर्सकडून त्यांचा वापरही फार कमी झाला आहे. लोक पूर्वी बातम्यांच्या वेबसाइट्सना भेट देत असत आणि तिथल्या पोस्ट लाईक करत असत, परंतु आता बहुतेक संवाद थेट फेसबुक अॅपमध्ये होतात. शिवाय, इंटरनेटवरील गोपनीयता नियम कठोर झाल्यामुळे, या जुन्या बटणांच्या डेटा ट्रॅकिंग यंत्रणा आता तितक्या प्रभावी राहिल्या नाहीत. मेटा आता जुनी साधने टप्प्याटप्प्याने काढून टाकू इच्छिते आणि एक नवीन फ्रेंडली सिस्टम लाँच करणार असल्याचं बोललं जातं.

वापरकर्त्यांवर आणि वेबसाइटवर काय परिणाम होईल?

या बदलामुळे वापरकर्त्यांना कोणताही त्रास होणार नाही. फेसबुक अॅप आणि वेबसाइटवरील लाईक आणि कमेंट फीचर्स तसेच राहतील. फरक एवढाच आहे की तुम्ही न्यूज साइट किंवा ब्लॉगवरील लाईक बटणावर क्लिक करून “लाईक” वर क्लिक करू शकणार नाही. तथापि, वेबसाइटच्या मालकांनीही काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. मेटाने स्पष्टपणे सांगितले आहे की डेव्हलपर्सना कोणतेही तात्काळ तांत्रिक बदल करण्याची आवश्यकता नाही. वेबसाइट्स नेहमीप्रमाणे काम करत राहतील. फक्त जुना कोड काढून टाकल्याने त्या थोड्या जलद होतील.