AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Facebook : फेसबूकवर 3 वेळा Like बटण दाबल्यास काय होतं ? तो दावा खरा की खोटा ?

फेसबूकचा वापर तर आजकाल लहान मोठे, तरूण सर्वच लोक करतात. मात्र त्याच्या वापराबद्दल अनेक दावे केले जातात. सध्या एक नवी माहिती सगळीकडे व्हायरल होत्ये की फेसबुकवर लाईक बटण तीन वेळा दाबले तर स्क्रीनशॉट घेतला जातो. फेसबुकवर असे फीचर खरोखर उपलब्ध आहे की ते फक्त अफवा आहे? चला जाणून घेऊया.

| Updated on: Sep 09, 2025 | 2:32 PM
Share
सोशल मीडियावर दररोज काहीतरी विचित्र दिसतं. फेसबुकवरील एक विचित्र पोस्ट सध्या अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यात असा दावा केला आहे की जर एखाद्या पोस्टवरील लाईक बटण तीन वेळा दाबले तर फेसबुक अॅपवर स्क्रीनशॉट घेतला जातो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे लोक अशा पोस्ट अनियंत्रितपणे पोस्ट करतात. पण फेसबुकवर खरोखरच असं फीचर आहे  की ही फक्त एक अफवा आहे? फेसबुक पोस्टच्या अशा दाव्यांमागील सत्य जाणून घेऊया.

1 / 6
अनेक लोकांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे की, लाईक बटणावर तीन वेळा टॅप केल्याने स्क्रीनशॉट येतो. एका यूजरने हे फेसबुकवरही शेअर केलं होतं. खरं तर, याच कारणामुळे अनेक लोकांनी मोठ्या संख्येने हे वापरून पहायला सुरूवात केली आणि तो एक ट्रेंड बनला. व्हायरलही झाला. पण सोशल मीडियावर अशा फीचरचे बनावट दावे व्हायरल होणे हे नवीन नाही.

2 / 6
सर्वप्रथम हे समजून घ्या की  फेसबुकने असे कोणतेही फीचर जारी केलेले नाही. आम्ही फेसबुकच्या धोरणांची देखील तपासणी केली असता असं आढळलं की लाईक बटण दाबून स्क्रीनशॉट घेण्यासारखे कोणतेही फीचर उपलब्ध नाही.

3 / 6
खरं तर, स्क्रीनशॉट घेणे हे डिव्हाइसचे एक वैशिष्ट्य आहे. जोपर्यंत डिव्हाइसवर यासाठी बटण किंवा फंक्शन सेट केले जात नाही तोपर्यंत ते करणे शक्य नाही. फेसबुक सारखी अ‍ॅप्स फक्त एक इंटरफेस देतात, ते तुमच्या फोनच्या सिस्टम कमांड नियंत्रित करू शकत नाहीत. याचा अर्थ असा की लाईक बटण तीन वेळा दाबून स्क्रीनशॉट घेणे शक्य नाही.

4 / 6
पण लोकं तर काहीही न पहाता सोशल मीडियावरील ट्रेंड फॉलो करतात हे खूप सामान्य आहे. याव्यतिरिक्त, फीचरबद्दल उत्सुकता आणि तंत्रज्ञानाचे मर्यादित ज्ञान यामुळे   कधीकधी गोंधळ निर्माण होतो.   शिवाय, जर एखादी पोस्ट वारंवार पोस्ट होऊ लागली तर लोक विचार न करता अशा पोस्ट त्यांच्या भिंतीवर पुन्हा पोस्ट करू लागतात त्यामुळे त्या व्हायरल होतात.

5 / 6
 याशिवाय, काही लोकं ही  विनोद करण्याच्या किंवा ट्रोलिंग करण्याच्या उद्देशाने अशा पोस्ट फॉरवर्ड करतात. अशा प्रकरणांमध्ये युजर्सनी सावधगिरी बाळगणे खूप महत्वाचे आहे. आता फेसबुकवर तीन वेळा लाईक करून स्क्रीनशॉट घेतल्याचा दावा पूर्णपणे खोटा आहे यात शंका नाही. बऱ्याच वेळा अशा पोस्ट फसवणुकीच्या उद्देशाने देखील केल्या जातात.( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेले आहेत. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही.)

6 / 6
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.