
इन्स्टाग्राम हे जगभरातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. इथे रोज लाखो लोक फोटो, रील्स आणि स्टोरीज शेअर करतात, पण तुम्हाला माहीत आहे का की तुम्ही या प्लॅटफॉर्म पैसेही कमवू शकता? नाही तर मग हे ५ मार्ग वाचा जे तुम्हाला पैसे कमवण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकतात.
१. ब्रँड प्रमोशन आणि स्पॉन्सरशिप : इन्स्टाग्रामवर ब्रँड प्रमोशन हा पैसे कमवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. जर तुमच्याकडे ५,००० किंवा त्यापेक्षा जास्त फॉलोअर्स असतील आणि तुमचा कंटेंट काही विशिष्ट विषयावर असेल, तर ब्रँड्स तुम्हाला त्यांच्या उत्पादनांचा प्रचार करण्यासाठी पैसे देतील. यासाठी फक्त तुमच्या फॉलोअर्ससोबत चांगला संवाद आणि आकर्षक कंटेंट आवश्यक आहे.
२. अॅफिलिएट मार्केटिंग : अॅफिलिएट मार्केटिंग देखील पैसे कमवण्याचा एक चांगला मार्ग आहे. यामध्ये तुम्ही इन्स्टाग्रामवर उत्पादनांचे लिंक्स शेअर करता आणि त्या लिंक्सवरून विक्री झाल्यावर तुम्हाला कमीशन मिळते. Amazon, Flipkart, Meesho या प्लॅटफॉर्मवर तुम्ही अॅफिलिएट प्रोग्राम जॉइन करु शकता. कमिशन मिळवण्यासाठी तुमच्या फॉलोअर्ससाठी आकर्षक कंटेंट तयार करा.
३. स्वतःचे उत्पादन किंवा सेवा विकणे : तुम्ही हस्तकला, कपडे किंवा ज्वेलरी बनवता का? तुम्ही इन्स्टाग्रामवर तुमचे उत्पादन थेट विकू शकता. यासाठी तुम्हाला प्रोफेशनल अकाउंट तयार करावं लागेल आणि आकर्षक फोटो, रील्स पोस्ट कराव्या लागतील. इन्स्टाग्रामवरून तुमचे उत्पादन विकून तुम्ही उत्तम कमाई करू शकता.
४. डिजिटल प्रोडक्ट्स आणि कोर्सेस : तुम्ही एखाद्या विशिष्ट क्षेत्रात तज्ज्ञ असाल, तर डिजिटल प्रोडक्ट्स आणि कोर्सेस तयार करून इन्स्टाग्रामवरून पैसे कमवू शकता. फिटनेस गाइड्स, फोटोग्राफी टिप्स किंवा कुकिंग कोर्सेससारखे कोर्स तयार करा आणि Gumroad, Teachable सारख्या प्लॅटफॉर्मवर विक्री करा.
५. रील्स बोनस आणि क्रिएटर फंड : इन्स्टाग्रामचा रील्स बोनस आणि क्रिएटर फंड हा एक नवीन मार्ग आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या रील्सवरून पैसे कमवू शकता. तुमचं अकाउंट प्रोफेशनल मोडवर असावं लागेल, आणि रील्स ट्रेंडिंग असाव्यात. इन्स्टाग्राम कधी कधी क्रिएटर्सला त्यांच्या रील्सच्या व्ह्यूजवरून पैसे देतो, आणि यामुळे तुमची कमाई होऊ शकते.