AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Google Pixel 10a ला टक्कर देणारे आहेत हे 5 अनोखे स्मार्टफोन, एकदा यादी पाहा

Pixel 10a च्या लाँचिंगनंतर प्रीमियम मिड-रेंज सेगमेंटमध्ये एक स्पर्धा सुरू झालेली आहे. जर तुम्ही Google च्या AI फिचर्स व्यतिरिक्त काहीतरी शोधत असाल तर बाजारपेठेत असे अनेक फोन आहेत जे उत्तम प्रोसेसर आणि उत्कृष्ट कॅमेरे देऊ शकतात. चला कोण कोणते फोन आहेत ते जाणून घेऊयात.

Google Pixel 10a ला टक्कर देणारे आहेत हे 5 अनोखे स्मार्टफोन, एकदा यादी पाहा
Google Pixel 10a
| Edited By: | Updated on: Feb 20, 2026 | 3:39 PM
Share

गुगलने भारतात त्यांचा नवीन Google Pixel 10a लाँच केला आहे. हा फोन 49 हजार 999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये 48MP मेगापिक्सेल कॅमेरा आणि 5100 एमएएच बॅटरी आहे. अशातच तुम्ही जर फोटोग्राफीचे चाहते असाल आणि दमदार परफॉर्मेंसचा आनंद घेत असाल, तर बाजारात असे काही फोनचे पर्याय उपलब्ध आहेत जे Pixel 10a ला जोरदार टक्कर देतात, तर आजच्या लेखात आपण याबद्दल जाणून घेऊयात.

सॅमसंग गॅलेक्सी एस24

हा फोन तुम्हाला 42,000 रूपयांमध्ये खरेदी करता येईल. यात स्नॅपड्रॅगन 8 जनरल 3 प्रोसेसर आणि 50MP + 12MP + 10MP चा पॉवरफूल रिअर कॅमेरा आहे. याशिवाय फोनमध्ये 6.2-इंचाचा डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले आहे. हा सॅमसंग फोन गॅलेक्सी एआयला देखील सपोर्ट करतो.

वनप्लस 15आर

तुम्हाला जर पॉवरफूल कॅमेरा आणि मोठी बॅटरी हवी असेल, तर वनप्लसचा हा फोन तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतो. यात 7400mAh बॅटरी आहे आणि 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनमध्ये 6.83-इंच 165Hz 1.5K AMOLED डिस्प्ले, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन 5 प्रोसेसर आणि 12GB पर्यंत LPDDR5X रॅम देखील आहे. यात OIS सह 50MP Sony IMX903 मुख्य कॅमेरा आणि 32MP सेल्फी कॅमेरा आहे. त्याची किंमत 47 हजार 999 रुपये आहे.

आयफोन 16ई

Apple iPhone 16e हा iPhone 16 सिरीजमधील सर्वात परवडणारा मॉडेल आहे. यात 6.1-इंचाचा OLED स्क्रीन, A18 चिप आणि 48-मेगापिक्सेल सिंगल कॅमेरा आहे. जर तुम्हाला कमी बजेटमध्ये iPhone घ्यायचा असेल, तर हा फोन सर्वोत्तम पर्याय असू शकतो. त्याची किंमत 52,999 रूपये आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एस25 एफई

Samsung Galaxy S25 FE मध्ये 6.7-इंचाचा FHD+ 120Hz डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले आहे. हा Exynos 2400 चिपसेटने सुसज्ज आहे आणि 45W वायर्ड चार्जिंग सपोर्टसह 4900mAh बॅटरी पॅक आहे. कॅमेरा सेटअपमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 12MP चा अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्स आणि 8MP चा 3x टेलिफोटो लेन्स समाविष्ट आहे. हा फोन फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी दोन्हीमध्ये उत्कृष्ट आहे.

विवो एक्स200 एफई

Vivo X200 FE हा स्मार्टफोन या वर्षाच्या सुरुवातीला भारतात लाँच झाला. यात 6.31 इंचाचा 1.5K 120Hz AMOLED डिस्प्ले आहे. तसेच 3.4GHz मीडियाटेक डायमेन्सिटी 9300 प्लस प्रोसेसर आणि 90W चार्जिंगसह मोठी 6,500mAh बॅटरी आहे. यात 50MP ट्रिपल रिअर कॅमेरा सिस्टम आणि 50MP फ्रंट कॅमेरा आहे आणि तो Funtouch OS 15वर चालतो. या फोनची किंमत 54 हजार 999 रुपये आहे.

एकनाथ शिंदे- राज ठाकरे भेटीवर, राज ठाकरे स्पष्टच बोलले...
एकनाथ शिंदे- राज ठाकरे भेटीवर, राज ठाकरे स्पष्टच बोलले....
संदीप देशपांडेंचं व्हॉट्सअप स्टेट्स अन् किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान
संदीप देशपांडेंचं व्हॉट्सअप स्टेट्स अन् किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान.
आधार-राशन कार्ड देणारी माणसं आपलीच; कारवाई कोण करणार?
आधार-राशन कार्ड देणारी माणसं आपलीच; कारवाई कोण करणार?.
मंत्रालयाच्या कंट्रोलरुममध्ये एसीबीचं पथक दाखल!
मंत्रालयाच्या कंट्रोलरुममध्ये एसीबीचं पथक दाखल!.
अमोल कोल्हे यांच्या शिवरायांवरील व्याख्यानावरून पुणे विद्यापीठात वाद
अमोल कोल्हे यांच्या शिवरायांवरील व्याख्यानावरून पुणे विद्यापीठात वाद.
सोलापूर मनपा सभेत स्वीकृत सदस्यनिवडीवरून भाजप आणि विरोधकांमध्ये गोंधळ
सोलापूर मनपा सभेत स्वीकृत सदस्यनिवडीवरून भाजप आणि विरोधकांमध्ये गोंधळ.
ठाकरे बंधूंच्या युतीत मिठाचा खडा? मनसेला स्वीकृत नगरसेवक पद देणं टाळलं
ठाकरे बंधूंच्या युतीत मिठाचा खडा? मनसेला स्वीकृत नगरसेवक पद देणं टाळलं.
संजय राऊतांच्या राज्यसभा रणनीतीवर नवनाथ बन यांच्याकडून प्रश्नचिन्ह
संजय राऊतांच्या राज्यसभा रणनीतीवर नवनाथ बन यांच्याकडून प्रश्नचिन्ह.
राज्यसभा निवडणुकीवर संजय राऊत यांचे विधान
राज्यसभा निवडणुकीवर संजय राऊत यांचे विधान.
महाराष्ट्राने शेतीसाठी सर्वोत्तम एआय मंच तयार केला! फडणवीसांची माहिती
महाराष्ट्राने शेतीसाठी सर्वोत्तम एआय मंच तयार केला! फडणवीसांची माहिती.