‘या’ किंमतीच्या जिओ प्लॅनमध्ये मिळवा 90 दिवसांची वैधता आणि 20GB अतिरिक्त डेटा

जिओच्या या किंमतीच्या प्रीपेड प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 20 जीबी अतिरिक्त डेटा मिळतो. चला जाणून घेऊयात की दररोज किती जीबी डेटा फायदा तुम्हाला मिळणार आहे आणि या प्लॅनमध्ये कोणते अतिरिक्त फायदे मिळतात.

या किंमतीच्या जिओ प्लॅनमध्ये मिळवा 90 दिवसांची वैधता आणि 20GB अतिरिक्त डेटा
| Edited By: | Updated on: Apr 10, 2026 | 4:55 PM

तुम्ही जर रिलायन्स जिओचे प्रीपेड सिम कार्ड वापरत असाल आणि तुम्हाला कंपनीचे स्वस्त प्रीपेड प्लॅन्स माहीत नसतील, तर आजची बातमी खास तुमच्यासाठी आहे. यामध्ये अशा एक प्लॅन जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये 20 जीबी अतिरिक्त डेटा मिळतो. विशेष गोष्ट म्हणजे, कंपनी या अतिरिक्त डेटासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारत नाही. या प्लॅनची ​​किंमत 899 रूपये इतकी आहे. चला तर मग जाणून घेऊया की अतिरिक्त डेटा व्यतिरिक्त या प्लॅनमध्ये आणखी कोणते फायदे मिळतात.

जिओ 899 रूपयांच्या प्लॅनची माहिती

899 रुपयांच्या जिओ प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी हाय-स्पीड डेटा मिळतो. डेटा व्यतिरिक्त या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतात. या प्लॅनमध्ये 20 जीबी अतिरिक्त डेटासोबत काही अतिरिक्त फायदेही मिळतात.

जिओ 899 रूपयांच्या प्लॅनची ​​वैधता

90 दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या या रिचार्ज प्लॅनमध्ये तीन महिन्यांसाठी जिओ हॉटस्टार आणि 50 जीबी मोफत एआय क्लाउड स्टोरेजसारखे काही अतिरिक्त फायदेही मिळतात. एवढेच नाही तर कंपनी 35,100 रुपये किमतीचा गूगल जेमिनी प्रो, 5000 जीबी क्लाउड स्टोरेज आणि नॅनो बनानाचा ॲक्सेसही देते. कंपनीचे म्हणणे आहे की या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5जी डेटा मिळतो, म्हणजेच प्लॅनमध्ये दिलेला डेटा संपला तरीही तुम्हाला 5 जी स्पीडने वेगवान इंटरनेट मिळत राहील.

एअरटेल प्लॅन्स

एअरटेल 859 रुपये आणि 929 रुपयांचे प्लॅन्स सादर करते, परंतु 899 रुपयांचा प्लॅन सध्या उपलब्ध नाही. 859 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 1.5 जीबी डेटा आणि 84 दिवसांची वैधता मिळते. 929 रुपयांच्या प्लॅनमध्ये 90 दिवसांची वैधता आणि दररोज 1.5 जीबी डेटा मिळतो. यामध्ये कॉलिंग, एसएमएस आणि अतिरिक्त फायदे देखील मिळतात.

यासह जिओच्या प्रीपेड प्लॅनची ​​किंमत 189 रुपये आहे.  189 रूपयांमध्ये कंपनी तुम्हाला एकूण 2GB हाय-स्पीड डेटा देईल. 28 दिवसांच्या वैधतेसह तुम्हाला मिळणारा 2 जीबी डेटा तुम्ही एकाच वेळी वापरू शकता किंवा 28 दिवसांच्या कालावधीत थोड्या-थोड्या प्रमाणात वापरू शकता. येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की 2 जीबी डेटा मर्यादा संपल्यानंतर वेग 64 केबीपीएस पर्यंत कमी होईल.

Follow Us