गुगलने अखेर पिक्सेल 10 सिरीज लाँच करण्याची घोषणा केली आहे. गुगल त्यांच्या वार्षिक लाँच इव्हेंट मेड बाय गुगलमध्ये पिक्सेल सिरीजच्या नवीन स्मार्टफोनसह गुगल पिक्सेल वॉच ४ आणि गुगल पिक्सेल बड्स 2ए देखील लाँच करणार आहे. गुगलचा हा कार्यक्रम 20 ऑगस्ट रोजी होणार आहे. पिक्सेल 10 सिरीजमध्ये यावेळीही कंपनी चार स्मार्टफोन लाँच करणार आहे. ज्यामध्ये पिक्सेल 10 पिक्सेल 10 प्रो, पिक्सेल 10 प्रो एक्सएल आणि पिक्सेल 10प्रो फोल्ड हे आहेत. चला तर मग आजच्या लेखात आपण या इव्हेंट आणि आगामी डिव्हाइसबद्दल जाणून घेणार आहोत.
गुगलने कन्फर्म केलं आहे की Pixel 10 सिरीज 20 ऑगस्ट रोजी गुगलच्या इव्हेंटमध्ये लाँच केले जाणार आहे. हा कार्यक्रम न्यू यॉर्क शहरातील भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजता सुरू होईल. हा कार्यक्रम गुगलच्या अधिकृत वेबसाइट तसेच यूट्यूब चॅनेल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाईव्ह पाहता येईल.
तर या इव्हेंटमध्ये सर्वांचे लक्ष गुगल Pixel 10 सिरीजवर असणार आहे. दरवेळीप्रमाणे यंदाही गुगल अनेक मॉडेल्स लाँच करणार आहे. यावेळी गुगलचे लक्ष डिझाइनपेक्षा हार्डवेअर अपग्रेडवर असेल. Pixel 10 ही सिरीज नवीनतम Tensor G5 या चिपसह लाँच केली जाऊ शकते. ही चिप पूर्वीपेक्षा अधिक पॉवर एफिशिएंट असेल आणि हीट मॅनेजमेंटच्या बाबतीत चांगली असेल.
Google Pixel 10 सिरीजचे स्मार्टफोन कंपनीच्या नवीनतम अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉइड 16 सह लाँच केले जातील. यासोबतच कंपनी जनरेटिव्ह एआय फीचर्ससह हा फोन लाँच करणार आहे.
कंपनी पिक्सेल सीरीज स्मार्टफोन्ससोबत नवीन वेअरेबल डिव्हाइसेस देखील लाँच करणार आहे. कंपनी Google Pixel Watch 4 ला दोन वेगवेगळ्या साईजमध्ये लाँच करणार आहे. पिक्सेल वॉच ४ च्या अपग्रेडबद्दल बोलायचे झाले तर, कंपनी त्याची बॅटरी लाईफ आणि फिटनेस ट्रॅकिंग क्षमता सुधारेल.
Google Pixel Buds 2a देखील 20 ऑगस्ट रोजी लॉन्च होऊ शकतो. कंपनीच्या सध्याच्या प्रीमियम वायरलेस इअरबड्सचा हा एक बजेट पर्याय असेल. गुगल यावेळी त्यांच्या चार्जिंग अॅक्सेसरीज रिफ्रेश करू शकते. यासोबतच, त्यात एआय फीचर्स देखील मिळू शकतात.