PAYTM | पेटीएम युजर्सना धक्का, गुगल प्ले स्टोअरवरुन पेटीएम अ‍ॅप हटवले

| Updated on: Sep 18, 2020 | 3:46 PM

डिजीटल व्यवहारातील अग्रगण्य समजलं जाणारे पेटीएम अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवरुन हटवण्यात आले आहे. (Google Play Store Remove Paytm App) 

PAYTM | पेटीएम युजर्सना धक्का, गुगल प्ले स्टोअरवरुन पेटीएम अ‍ॅप हटवले
Follow us on

मुंबई : डिजीटल व्यवहारातील अग्रगण्य समजलं जाणारे पेटीएम अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवरुन हटवण्यात आले आहे. यामुळे आता गुगल प्ले स्टोअरवरुन पेटीएम डाऊनलोड करता येणार नाही. यामुळे लाखो पेटीएम युजर्सना धक्का बसला आहे. पेटीएमने गुगलच्या मार्गदर्शक तत्वाचे उल्लंघन केल्याने हे अ‍ॅप्लिकेशन हटवण्यात आल्याचे सांगितलं जात आहे.  (Google Play Store Remove Paytm App)

गुगल प्ले स्टोअरने दिलेल्या माहितीनुसार, पेटीएमने गुगलच्या मार्गदर्शक तत्वाचे उल्लंघन केले आहे, त्यामुळे पेटीएमचे अ‍ॅप्लिकेशन हटवण्यात आले आहे. ऑनलाईन जुगार किंवा विविध खेळांवरील सट्टेबाजीला प्रोत्साहन देणाऱ्या कोणत्याही अ‍ॅपची आम्ही जाहिरात किंवा प्रमोशन करु शकत नाही. त्याव्यतिरिक्त इतर कोणतेही अ‍ॅप जे रोख बक्षिसे किंवा पैसे जिंकण्याबाबतची आश्वासन देतात, त्यांची जाहिरात आम्ही करत नाही, असे निवेदन गुगलने जारी केले आहे.

त्यामुळे पेटीएमचे अ‍ॅप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरवरुन हटवण्यात आले आहे. सद्यस्थितीत गुगलच्या प्लेस्टोअरमध्ये पेटीएमचे अ‍ॅप्लिकेशन पाहायला मिळत नाही. त्यामुळे ते डाऊनलोडही करता येणार नाही. मात्र पेटीएमशी संबंधित इतर पेटीएम बिझनेस, पेटीएम मनी, पेटीएम मॉल हे अ‍ॅप प्ले स्टोअरवर अद्याप कायम आहेत. ते हटवण्यात आलेले नाही. (Google Play Store Remove Paytm App)

संबंधित बातम्या : 

चीनच्या 59 अ‍ॅप्सवर बंदी, Paytm चे संस्थापक विजय शेखर शर्मा म्हणतात…

Chinese Apps Ban | भारताचा चीनला पुन्हा दणका, PubG सह 118 अ‍ॅप्सवर बंदी, वाचा संपूर्ण यादी