
तुम्हाला जर तुमचे आवडते शो आणि चित्रपट नेटफ्लिक्सवर अतिरिक्त पैसे न देता पहायचे असतील, तर रिलायन्स जिओ तुमच्यासाठी एक उत्तम संधी घेऊन आला आहे. काही खास जिओ प्रीपेड प्लॅनसह, तुम्हाला आता मोफत नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन मिळणार आहे. ना कोणतेही वेगळे रिचार्ज फक्त रिचार्ज करा आणि लगेच स्ट्रीमिंग सुरू करा. चला तर या धमाकेदार प्लॅनबद्दल जाणून घेऊयात…
सहसा नेटफ्लिक्सचा मासिक प्लॅन शंभर रुपयांपासून सुरू होतो, परंतु जिओच्या या खास रिचार्ज पॅकमध्ये तुम्हाला मोबाईल रिचार्ज आणि नेटफ्लिक्स दोन्हीचा एकत्रित फायदा मिळेल. यासोबतच तुम्हाला जिओ टीव्ही आणि जिओ क्लाउडची सुविधा देखील मिळेल, म्हणजेच मनोरंजन आणि डेटा स्टोरेज दोन्हीचा ताण एकाच रिचार्जमध्ये कमी होणार आहे. जिओच्या 1,299 व 1,799 रूपयांच्या या धमाकेदार प्लॅनमध्ये तुम्हाला नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शनचा फायदा घेता येणार आहे.
हा प्लॅन अशा लोकांसाठी परिपूर्ण आहे जे दररोज स्ट्रीमिंग करतात परंतु त्यांना जास्त डेटाची आवश्यकता नाही.
जर तुम्ही खूप व्हिडिओ स्ट्रीमिंग, ऑनलाइन गेमिंग, व्हिडिओ कॉलिंग किंवा मोठ्या फाइल्स डाउनलोड करत असाल तर हा प्लॅन तुमच्यासाठी चांगला आहे.
MyJio अॅप, Jio वेबसाइट किंवा कोणत्याही पेमेंट ॲपवरून 1,299 किंवा 1,799 रुपयांचे रिचार्ज करा. रिचार्ज सक्रिय झाल्यानंतर, तुमचे Netflix खाते लिंक करा किंवा एक नवीन तयार करा आणि तुमच्या आवडत्या कंटेंटचा त्वरित आनंद घ्या. काही इतर Jio प्लॅनमध्ये JioHotstar आणि Amazon Prime सारखे सबस्क्रिप्शन देखील येतात.
181 रुपयांचा प्लॅन: 30 दिवसांची वैधता, 15 जीबी डेटा आणि एअरटेल एक्सस्ट्रीम प्ले मेंबरशिपसह Sony Liv, Hoichoi, Lionsgate Play, Sun NXT, Chaupal यासह 22+ ओटीटी प्लॅटफॉर्मवर मोफत प्रवेश करता येणार आहे.
451 रुपयांचा प्लॅन: 30 दिवसांची वैधता, 50 जीबी डेटा आणि जिओ सिनेमा (हॉटस्टार) चे मोफत सबस्क्रिप्शन, ज्यामुळे तुम्ही क्रिकेट, बॉलिवूड आणि वेब सिरीज पाहू शकता.