
आजकाल नवा फोन घेताना सर्वात जास्त लक्ष दिलं जातं ते कॅमेऱ्यावर पूर्वी जसे फक्त कॉलसाठी फोन वापरले जायचे, तसं आता राहिलेलं नाही. फोटो काढणं, व्हिडीओ बनवणं आणि आठवणी जपणं यासाठी फोनच महत्त्वाचा झाला आहे. पण भारी फोटो काढायचा म्हणजे महागडा फोन किंवा DSLR घ्यावा लागतो, ही समजूत आता बदलली आहे. ३० हजारांच्या आतही भन्नाट फोटो काढणारे स्मार्टफोन बाजारात आले आहेत.
२४,९९९ रुपयांना मिळणारा Poco X7 Pro 5G हा फोन त्याच्या कॅमेऱ्यासाठी खूप लोकप्रिय आहे. यात ५०MP चा Sony LYT-600 सेन्सर आहे आणि OIS-EIS सपोर्टही आहे, त्यामुळे हलत्या परिस्थितीतही फोटो स्थिर येतात. २० MP फ्रंट कॅमेरा आणि मोठी 6550mAh बॅटरी यामुळे हे एक दमदार पॅकेज ठरतं.
२६,९९९ रुपयांचा Realme P3 Ultra 5G फोनही उत्तम कॅमेऱ्यासह येतो. यात OIS सह ५० MP चा Sony IMX896 सेन्सर दिला आहे. ८MP चा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि १६MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. मोठी 6000mAh बॅटरी आणि Curved Display यामुळे हा फोन आणखी आकर्षक वाटतो.
२६,९९८ रुपयांचा iQOO Neo 10R खास गेमर्ससाठी आणि फोटोग्राफी प्रेमींसाठी आहे. यात Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसर, ५०MP OIS सेन्सर आणि ८MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. ३२MP फ्रंट कॅमेऱ्यामुळे सेल्फीप्रेमींनाही हा फोन आकर्षित करतो.
२७,९९९ रुपयांचा Oppo F29 Pro 5G हा फोन पाण्यापासून सुरक्षित असण्याबरोबरच चांगल्या कॅमेऱ्याने सज्ज आहे. ५०MP चा मुख्य कॅमेरा आणि १६MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. दुसरीकडे, २९,९९९ रुपयांचा OnePlus Nord 4 हा एक बॅलन्सड फोन आहे. Snapdragon 7 Plus Gen 3 प्रोसेसर आणि उत्तम AMOLED डिस्प्ले यामुळे याला चांगली मागणी आहे.