Asus Zenfone 9 : हाय-टेक फीचरचा Asus Zenfone 9 आज लाँच होणार, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या…

| Updated on: Jul 28, 2022 | 6:07 AM

लीक्सनुसार फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर उपलब्ध होणार आहे. फोनमध्ये 5.92-इंचाचा AMOLED डिस्प्ले आणि ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. त्यामुळे विचार कसला करताय. लाँचिंगआधी अधिक जाणून घ्या... 

Asus Zenfone 9 : हाय-टेक फीचरचा Asus Zenfone 9 आज लाँच होणार, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या...
Asus Zenfone 9
Image Credit source: social
Follow us on

मुंबई : स्मार्टफोन (Smartphone) ब्रँड Asus आपला नवीन स्मार्टफोन Asus Zenfone 9 आज लाँच करण्यात येणार आहे. मात्र, याआधी या फोनचे (Phone) फीचर्स आणि किंमतीचा (Rate) तपशील लीक झाले आहेत. हा Asus कडून येणारा एक छोटा डिस्प्ले फोन असणार आहे. हा दमदार प्रोसेसर आणि दमदार फीचर्सनं सुसज्ज असा मोबाईल फोन असणार आहे. लीक्स झालेल्या माहितीनुसार फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर उपलब्ध होणार आहे. फोनमध्ये 5.92-इंचाचा AMOLED डिस्प्ले आणि ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. या फोनमध्ये तुम्हाला आणखी कोणते फीचर्स मिळणार आहेत. त्यामुळे नव्या फोनविषयी अधिक जाणून घ्या. तुम्हाला मोबाईल घ्यायचा असल्याच किमान नव्या मोबाईलविषयी माहिती असल्यास तुम्हाला चांगलं प्रोडक्ट घरी नेता येऊ शकतं.

किंमत किती?

Asus Zenfone 9 च्या 8 GB RAM सह 128 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत सुमारे 64,500 रुपये आहे. 256 GB स्टोरेज वेरिएंटसह 8 GB RAM ची किंमत सुमारे 70,000 रुपये आहे. आणि स्टोरेजसह 16 GB RAM ची किंमत आहे. व्हेरिएंटची किंमत सुमारे 70,000 रुपये आहे. स्टोरेजची किंमत सुमारे 77,000 रुपये असू शकते. Asus हा फोन गुरुवारी लाँच करणार आहे. हा लॉचिंग इव्हेंट भारतात आज संध्याकाळी 6:30 वाजता सुरू होईल.

हे देखील जाणून घ्या…

Asus Zenfone 9 ला 5.92-इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळेल, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि गोरिल्ला ग्लास संरक्षणासह येईल. फोन Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर आणि Android 12 आधारित ZenUI सह येऊ शकतो.

हे सुद्धा वाचा

हायलाईट्स

  1. Asus Zenfone 9 च्या 8 GB RAM सह 128 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत सुमारे 64,500 रुपये
  2. 256 GB स्टोरेज वेरिएंटसह 8 GB RAM ची किंमत सुमारे 70,000 रुपये
  3. व्हेरिएंटची किंमत सुमारे 70,000 रुपये आहे
  4. Asus हा फोन आज लाँच करणार आहे
  5. हा लॉचिंग इव्हेंट भारतात आज संध्याकाळी 6:30 वाजता सुरू होईल.

ड्युअल कॅमेरा सेटअप

फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल. हा 50 मेगापिक्सेल सोनी IMX766 प्राथमिक सेन्सर आणि 12 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड IMX368 सेन्सरसह येऊ शकतो. सेल्फीसाठी, या फोनमध्ये 12 मेगापिक्सलचा Sony IMX663 सेंसर मिळेल. फोनमध्ये 8K पर्यंत व्हिडिओ रेकॉर्डचा पर्यायही उपलब्ध होऊ शकतो. Asus Zenfone 9 मध्ये 4,300mAh बॅटरी आणि जलद चार्जिंगसाठी सपोर्ट मिळू शकतो.

फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी, 5G, Wi-Fi 6E, ब्लूटूथ v5.2, NFC आणि GNSS, 3.5mm हेडफोन जॅक आणि USB 3.0 टाइप-सी पोर्ट दिले जातील.