Samsung Galaxy S21 FE 5G : सॅमसंग गॅलेक्सी S21 FEच्या किमतीत 5 हजारांची कपात, फीचर्सही दमदार, जाणून घ्या…

तुम्हाला दमदार फीचर्स असलेला नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल तर सॅमसंग गॅलेक्सी S21 FE च्या किमतीत 5000 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. फोन कोणत्या किमतीत खरेदी करता येईल, पाहा....

Samsung Galaxy S21 FE 5G : सॅमसंग गॅलेक्सी S21 FEच्या किमतीत 5 हजारांची कपात, फीचर्सही दमदार, जाणून घ्या...
फास्ट चार्जिंग, स्ट्रॉंग बॅटरी आणि मोठी स्क्रीन, Samsungच्या नव्या 5G फोनची फीचर्स झाली लीकImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 27, 2022 | 1:30 PM

मुंबई : Samsung Galaxy S21 FE 5G या स्मार्टफोनविषयी (Smarphone) आपण आज बोलणार आहोत. हँडसेट निर्माता कंपनी सॅमसंगनं या वर्षाच्या सुरुवातीला ग्राहकांसाठी आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन Galaxy S21 फॅन एडिशन लाँच केला. कंपनीच्या इतर फ्लॅगशिप फॅन एडिशन स्मार्टफोन्सप्रमाणे, Galaxy S21 FE मध्ये देखील Samsung Galaxy S21 पेक्षा अधिक दमदार फीचर्स आहेत. जर तुम्हालाही नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन घ्यायचा असेल. तर तुम्हाला हा फोन स्वस्तात खरेदी करण्याची उत्तम संधी आहेय. या हँडसेटच्या किमतीत 5000 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. या सॅमसंग (Samsung) मोबाईल (Mobile) फोनचे दोन प्रकार आहेत. एक 8 GB RAM सह 128 GB स्टोरेज आणि दुसरा 8 GB RAM सह 256 GB स्टोरेज. या वर्षी जानेवारीमध्ये 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 54,999 रुपयांना लाँच करण्यात आले होते. तर 256 जीबी मॉडेल 58,999 रुपयांना लाँच करण्यात आले होते. पण, आता 5000 रुपयांच्या कपातीनंतर, 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 49,999 रुपये आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 58,999 रुपये आहे.

तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगत आहोत की, हा फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर नवीन किंमतीसह लिस्ट करण्यात आला आहे, तसेच Galaxy S21 FE देखील नवीन किंमतीसह Amazon वर उपलब्ध आहे.

हे सुद्धा वाचा

Samsung Galaxy S21 FEविषयी…

  • डिस्प्ले: फोनमध्ये 6.4-इंचाचा फुल-एचडी+ डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले आहे. ही 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेट ऑफर करते. ग्राहकांना या डिव्हाइसमध्ये आय कन्फर्म शील्डसह AI-आधारित ब्लू लाइट कंट्रोल देखील मिळेल.
  • प्रोसेसर: स्नॅपड्रॅगन 888 ऑक्टा-कोर चिपसेट Galaxy A21 FE मध्ये वेग आणि मल्टीटास्किंगसाठी वापरला गेला आहे.
  • बॅटरी: फोनमध्ये 25 वॉट फास्ट चार्ज सपोर्टसह 4500 mAh बॅटरी देण्यात आली आहे, हा फोन 15 वॉट वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो.
  • कॅमेरा: 12-मेगापिक्सलचा वाइड-एंगल कॅमेरा आणि 8-मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा सेन्सर फोनच्या मागील पॅनलवर 12-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे.
  • इतर वैशिष्ट्ये: फोनला IP68 रेटिंग मिळाले आहे आणि या डिव्हाइसमध्ये सुरक्षिततेसाठी, ग्राहकांना ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. असे अनके फीचर्स यात दिसतात.

कोणताही मोबाईल घ्यायचा असला की त्याचे फीचर्स आणि किंमत आधी पाहिले पाहिजे. त्यामुळे तुम्हला तुमच्या बजेटचाही अंदाज येतो आणि फीचर्स देखील अधिक मिळू शकतात.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.