
Kim Kardashian Failed due to AI : AI ची (कृत्रिम बुद्धिमत्ता) जगभरात मोठी क्रेझ आहे. आता तर हा प्लॅटफॉर्म एक वर्षासाठी मोफत वापरता येणार आहे. कार्यालयीन कामापासून ते अभ्यासापर्यंत प्रत्येक जण एआयची मदत घेतो. पण हॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री किम कार्दशियनला एआयने चांगलाच झटका दिला आहे. तिने चॅटजीपीटीचा (ChatGPT) वापर करून कायदा पदवीची परीक्षा दिली आणि ती गारद झाली. मग तिने एआयची पोलखोल केली.
किम कार्दशियन ने ‘वॅनिटी फेअर’ च्या एका नवीन व्हिडिओत याविषयीचा खुलासा केला आहे. या व्हिडिओत ती एक लाय डिटेक्टर टेस्ट देत होती. गायिका आणि अभिनेत्री टेयाना टेलर हिने किमला AI विषयी विचारणा केली की ती त्याला तिचा मित्र मानते का? तेव्हा किमने सांगितले की ती एआयला तिचा मित्र मानत नाही. कारण AI मुळे ती परीक्षेत नापास झाली.
chatGPT चा केला वापर
किमने सांगितले की, कायदेशीर सल्ल्यासाठी तिने OpenAI च्या चॅटबॉट ChatGPT चा वापर करते. ती नेहमी कायदेशीर प्रश्नांच्या उत्तरासाठी त्याचे फोटो काढून ChatGPT वर अपलोड करते. इतके असून चॅटजीपीटी तिच्यासाठी विश्वासू अभ्यास मित्र ठरला नाही. किम हिने सांगितले की, चॅटजीपीटीने तिला नेहमी चुकीची उत्तरं दिली. त्यामुळे ती विधीच्या परीक्षेत वारंवार नापास झाली. त्यामुळे मी चॅटजीपीटीवर माझा राग काढते. यामुळेच मी परीक्षेत नापास झाले असे मी आरडते, असे किमने सांगितले.
चॅटबॉटसोबत झगडा
किम हिने गंमतीने सांगितले की, ती चॅटबॉटसोबत एखाद्या माणसासारखं भांडते. त्याच्याशी झगडते. त्याच्यावर राग काढते. त्यावर चॅटबॉट तिला उत्तर देतो की, तिला तिच्यावर विश्वास ठेवावा लागेल. हे उत्तर तर तुम्हाला अगोदरच माहिती असते. सध्या किम कार्दशियन आणि टेयाना टेलर या दोघीही Hulu लीगल ड्रामा ऑल फेअरचे प्रमोशन करत आहेत.
एआयने केले लोकांना निराश
किम सारखा इतरांचाही जनरेटिव्ह AI टूल्सविषयी अनुभव आहे. या प्लॅटफॉर्मचा वापर केल्यावर अनेकजण निराश होतात अथवा हसतात. ChatGPT सारखे चॅटबॉट चांगले वाटत असले तरी तुम्ही दिलेला प्रॉम्ट अनेकदा त्याला कळत नसल्याचे समोर येते.