तुमचं WhatsApp नव्या वर्षात किती बदलणार? 4 नवे फिचर्स कोणकोणते येणार? गुड मॉर्निंग मेसेज 90 दिवस रहाणार?

| Updated on: Dec 11, 2021 | 11:31 AM

आता नव्या वर्षात ही सात दिवसाची मर्यादा 90 दिवस केली जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच नव्या वर्षात Disappearing Mode ऑन केला तरी सात दिवसांऐवजी 90 दिवसानंतर मेसेज आपोआप डिलिट होतील.

तुमचं WhatsApp नव्या वर्षात किती बदलणार? 4 नवे फिचर्स कोणकोणते येणार? गुड मॉर्निंग मेसेज 90 दिवस रहाणार?
व्हॉटसअॅपमध्ये नव्या वर्षात नवे फिचर्स येण्याची शक्यता आहे
Follow us on

व्हॉटस अॅप न वापरणारा व्यक्ती आता कदाचित क्वचितच सापडेल. त्याचं कारण आहे ते WhatsApp ची वापरण्यातली सहजता, त्यात असलेले फिचर्स (WhatsApp new features in 2022) आणि त्यातही दर काही दिवसानंतर त्यात नव्या फिचर्सची पडत जाणारी भर. त्यामुळे व्हॉटस अॅप हे कायम नवनवं होत जातं आणि टेक्निकली ते कात टाकतं. त्याच कारणामुळे व्हॉटस अप हे आऊटडेटेड होताना दिसत नाही. चालू वर्षाचे आता शेवटचे काही दिवस शिल्लक आहे. सर्वांनाच नव्या वर्षाची चाहूल लागलीय आणि ह्या नव्या वर्षात व्हॉटस अपमध्ये नवं काय असेल तेही महत्वाचं आहे.

व्हॉटस अप कम्यूनिटीज ( WhatsApp Communities)
व्हॉटस अपमध्ये नव्या वर्षात हे नवं फिचर येण्याची शक्यता आहे. याबाबत WABBetaInfo ने माहिती दिलीय. ह्या एका फिचरमुळे तुम्हाला ग्रुपच्या आतही एक ग्रुप तयार करता येईल. त्याचा पर्याय उपलब्ध असेल. अर्थातच हा ग्रुपही एंड टू एंड एन्क्रिप्टेड असेल हे वेगळं सांगायला नको. कारण प्रायव्हसी हा संवदेनशिल मुद्दा आहे.

इमोजी (WhatsApp Emoji)
व्हॉटसअपचा वापर सध्या बिजनेससाठीही आहे आणि ज्योक्स फॉरवर्ड करण्यासाठीही. पण अनेक जण असे आहेत ज्यांना व्हॉटस अपवर चॅटींग करण्याचा कंटाळा येतो. पण त्यांच्यासाठी इमोजी आहेत ना. कम्यूनिटी फिचरमधल्या मेसेजवरही रिअॅक्ट होण्यासाठी इमोजी मेसेचा वापर करता येईल. हे फिचर फेसबूक, इन्स्टाग्रामवर जसं आहे तसेच असेल.

लास्ट सीन हाईड (Last seen)
व्हॉटस अपचं एक फिचर आहे लास्ट सीन. म्हणजेच आपण शेवटच्या वेळी नेमके कधी व्हॉटस अपवर अॅक्टीव्ह होतो ते त्यातून कळतं. हे फिचर बहुतांश लोकांचं आवडतं फिचर आहे. आपला मेसेज बघितला की नाही हे कळण्यासाठी जशा ब्लू लाईन्स येतात तसच लास्ट सिनचं फिचर आहे. सध्या हे फिचर सगळ्यांना उपलब्ध आहे. पण नव्या वर्षात म्हणजेच 2022 मध्ये यात बदल होण्याची चिन्ह आहेत. काही मोजक्या लोकांसाठीच हे फिचर उपलब्ध करण्याचा प्लॅन असल्याचे रिपोर्ट आहेत.

Disappearing मेसेजेसची टाईम लिमिट
गेल्या वर्षी व्हॉटसअॅपनं Disappearing मेसेजचं फिचर लाँच केलेलं आहे. म्हणजेच तुम्ही डिसअपेरींग मेसेजचं फिचर ऑन केलंत की सात दिवसानंतर त्या ग्रुपमधले मेसेज आपोआप डिलिट होतात. आता नव्या वर्षात ही सात दिवसाची मर्यादा 90 दिवस केली जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच नव्या वर्षात Disappearing Mode ऑन केला तरी सात दिवसांऐवजी 90 दिवसानंतर मेसेज आपोआप डिलिट होतील.

हे सुद्धा वाचा:

ST Strike: मेस्मा लावण्याची धमकी म्हणजे मुघलशाही, पडळकरांची परबांवर टीका; करोडोंच्या जमिनीवर डोळा असल्याचा आरोप

Samantha Ruth Prabhu | ‘आता पुन्हा पुन्हा तेच तेच किती वेळा?’, नागा चैतन्यसोबतच्या घटस्फोटावर समंथाचं मोठ भाष्य!

प्रत्येक बाजार समितीने अनुकरण करावे असा लातूर स्टेशनच्या ‘कृऊबा’ चा उपक्रम, शेतकऱ्यांनाही फायदा