5 जी नेटसाठी सीम कार्ड बदलावं की बदलू नये?, प्रश्न तुमचा उत्तर सोपंय

| Updated on: Oct 01, 2022 | 7:39 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5G च्या सेवेला सुरवात तर झाली आहे. अद्याप सर्वत्र एकाच वेळी ही सेवा पुरवली जाणार नसली तरी त्याचा नेमक लाभ कसा घ्यायचा हे देखील पाहणे तेवढेच महत्वाचे आहे.

5 जी नेटसाठी सीम कार्ड बदलावं की बदलू नये?, प्रश्न तुमचा उत्तर सोपंय
5G च्या सेवेला प्रारंभ
Follow us on

मुंबई : अखेर 5G चे स्वप्न आता पूर्ण होत आहे. देशातील 135 कोटी जनता याची साक्षीदार झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते या सेवेला सुरवात झाली आहे. शनिवारी त्यांनी जिओ, एअरटेल आणि व्हीआयच्या 5G चा डेमोही ट्रायल (Demo Trial) केला. ही सेवा (5G) जरी देशामध्ये सुरु झाली असली तरी याला घेऊन प्रत्येकाच्या मनात आहे ते लाभ घ्यायचा कसा? त्याकरिता नेमके काय करावे लागणार आहे? हेच महत्वाचे असून ज्यांना या अत्याधुनिक सेवेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी ही बातमी वाचा.

  1. सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्याला आहे त्या फोनमध्ये या सेवेचा लाभ घेता येणार की नाही हा प्रश्न पडणे साहजिक आहे. पण जर तुमचा मोबाईल हा 4G आहे आणि 5G चा नाही तर तुम्हाला लाभ घेता येणार नाही. साधारणत: सर्वांकडेच स्पेक्ट्रम लिलावापूर्वीचे मोबाईल आहेत. यामध्ये 5G ची सेवा मिळेलच असे नाही. त्याकरिता लेटेस्ट सॉफ्टवेअर घेणे गरजेचे आहे. त्यासाठी फोनच्या ब्रॅंडच्या वेबसाईटवर जाऊन तुमच्या मोबाईलला 5G सपोर्ट करते की नाही हे पाहणे गरजेचे आहे.
  2. 5G सेवेचा लाभ घेण्यासाठी सीमकार्डपेक्षा महत्व आहे ते स्मार्टफोनला. एअरटेलचे सीमकार्ड असेल तर सध्या तरी आहे त्या सीमवर सेवेचा लाभ घेता येणार आहे. नव्या सीमकार्डची आवश्यकताच भासणार नाही. इतर कंपन्यांनी तसेच केले आहे. काही कालावधीनंतर संबंधिक कंपन्याच सीमकार्ड हे अपडेट करतील.
  3. सर्वात महत्वाचे म्हणजे देशातील 8 मोठ्या शहरांमध्ये एअरटेलच्या सेवेला सुरवात होणार आहे. यामध्ये दिल्ली, मुंबई, कोलकाता, बेंगळुरू, चेन्नई, वाराणसी, सिलिगुडी आणि हैदराबाद या शहरांचा समावेश आहे. मार्च 2024 पर्यंत एअरटेलची सेवा देशभर पोहचणार आहे. तर जिओ हे सेवा दिवाळीपर्यंत दिल्ली, मुंबई, कोलकत्ता आणि चेन्नई या ठिकाणी सुरु करणार आहे. व्हीआयने मात्र, याबाबतीत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, देशातील 13 शहरांमध्ये त्यांची सुरवातीला सेवा राहणार आहे.
  4. 5G साठी किती रिचार्ज करावे लागेल हे अद्याप कोणत्याही कंपनीने जाहिर केलेले नाही. त्यापूर्वी सेवा सुरळीत देता येईल का त्याचा अभ्यास केला जात आहे. मात्र, इतर देशांच्या तुलनेत भारतीयांना परवडेल असेच रिचार्ज असणार असे आश्वासन मुकेश अंबानी यांनी दिले आहे.
  5. 5G सेवेमुळे फोनकॉल अधिक फास्ट आणि कनेक्टिव्हिटीचा पर्यायही उपलब्ध असणार आहे. 5G सेवा सुरु झाल्यास नेटचा स्पीड अधिक असणार आहे. तर 4G चा डेटाही अधिक चांगल्या प्रकारे वापरता येणार आहे.