Mukesh Ambani : ऐकलेही नसतील हे 5G चे फायदे, मुकेश अंबानींनी काही मिनिटांतच दाखविले विश्वरुप..

Mukesh Ambani : 5G चे दोन-चार वैयक्तिक फायदे वगळता आपल्याला त्यापालिकडचं जग माहिती नाही, पण 5G खऱ्या अर्थानं कुठे उपयोगी पडेल ते पाहुयात..

Mukesh Ambani : ऐकलेही नसतील हे 5G चे फायदे, मुकेश अंबानींनी काही मिनिटांतच दाखविले विश्वरुप..
5G चे फायदे असे की....
Image Credit source: सोशल मीडिया
कल्याण माणिकराव देशमुख

|

Oct 01, 2022 | 6:41 PM

नवी दिल्ली : अखेर देशात वेगवान इंटरनेट सेवेचे (Internet Services) अधिकृत उद्धघाटन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते उद्धघाटन केले. 5G चं वारं लवकरच देशभरात पोहचेल. सध्या काही शहरांमध्येच हा प्रयोग आजपासून राबविण्यात येत आहे. आता 5G आलं म्हणजे, फक्त सिनेमा डाऊनलोड करणे, एखादी फाईल झटपट पाठविणे एवढाचा त्याचा उपयोग राहणार नाही. त्याहूनही त्याचा फायदा अधिक आहे.

भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी 5G सेवेचं महत्व अधोरेखीत केले आहे. त्यांनी 5G सेवेचे विश्वरुपच जणू सर्वांसमोर ठेवले. व्यापक सामाजिक उद्दिष्ठांसाठी या सेवेचा फायदा होणार आहे.

5G ची सेवा देशात सध्या 13 शहरांसाठी सुरु करण्यात येत आहे. यामध्ये दिल्ली, अहमदाबाद, बेंगळुरु, चेन्नई, चंदिगढ, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकत्ता, लखनऊ, मुंबई आणि पुणे या शहरांचा समावेश आहे.

मुकेश अंबानी यांनी 5G चे जे फायदे सांगितले. ते तुमच्या आमच्या कल्पने पलिकडील आहे. केवळ चित्रपट, गाणी डाऊनलोड करता येतात. व्हिडिओ कॉलिंगचा दर्जा सुधारणा अशा साध्या फायद्यांचा यामध्ये समावेश नाही. इंटरनेटमुळे किती अमुलाग्र बदल होऊ शकतो, याचं उदाहरण त्यांनी यामाध्यमातून दिले आहे.

अंबानी यांच्या मते लोकांना स्वस्त आणि चांगल्या दर्जाच्या शैक्षणिक सुविधा आता मिळतील. त्यांना ऑललाईन क्लासेस दरम्यान गतिमान इंटरनेटमुळे विविध विषय चांगल्यारित्या समजून घेता येतील. कुशल मनुष्यबळ घडविण्यासाठी या सेवेचा फायदा होईल.

5G च्या मदतीमुळे सर्वसामान्य लोकांना स्वस्त आणि दर्जेदार आरोग्य सुविधा मिळण्यासाठी मदत मिळेल. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील लोकांना याचा सर्वाधिक फायदा होईल.

5G तंत्रज्ञान हे ग्रामीण आणि शहरातील लोकांमध्ये संवादाचं माध्यम ठरेल. तो संवाद सेतू ठरणार आहे. त्यामुळे खेड्यातील आणि शहरातील अंतर कमी होईल. शेतीकडे लक्ष्य देण्यासाठी लोक या सेवेचा लिलया वापर करतील. त्यामुळे व्यापार-उद्दीम वाढेल.

हे सुद्धा वाचा

5G तंत्रज्ञानामुळे भारत जगातील बुद्धीजीवी हब बनेल. ही सेवा उद्योगपती, नव उद्योगांसाठी मोठी मदत करणारी ठरेल. यामुळे नवीन रोजगार निर्मितीही होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें