AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतात 1GB डेटा 18.5 रुपयांना, अमेरिकेत तब्बल 869 रुपये

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रिजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी सप्टेंबर 2016 मध्ये जिओ लाँच केल्यापासून भारतीय दूरसंचार क्षेत्रात डेटा क्रांती घडली आहे. अनेक कंपन्यांना इच्छा नसतानाही डेटाचे दर कमी करावे लागले. त्यामुळे भारतात पूर्वीच्या तुलनेत डेटा अत्यंत स्वस्त झालाय. Cable.co.uk च्या रिपोर्टनुसार, भारतात 1GB डेटाची किंमत सरासरी 18.5 रुपये आहे, तर जागतिक स्तरावर ही सरासरी किंमत […]

भारतात 1GB डेटा 18.5 रुपयांना, अमेरिकेत तब्बल 869 रुपये
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM
Share

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रिजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी सप्टेंबर 2016 मध्ये जिओ लाँच केल्यापासून भारतीय दूरसंचार क्षेत्रात डेटा क्रांती घडली आहे. अनेक कंपन्यांना इच्छा नसतानाही डेटाचे दर कमी करावे लागले. त्यामुळे भारतात पूर्वीच्या तुलनेत डेटा अत्यंत स्वस्त झालाय. Cable.co.uk च्या रिपोर्टनुसार, भारतात 1GB डेटाची किंमत सरासरी 18.5 रुपये आहे, तर जागतिक स्तरावर ही सरासरी किंमत 600 रुपये आहे.

कंपनीकडून 230 देशांमधील डेटा दरांचं विश्लेषण करण्यात आल्यानंतर हा रिपोर्ट जारी करण्यात आलाय. भारतात 1GB डेटाची किंमत 0.26 डॉलर असल्याचा निष्कर्ष या रिपोर्टमधून काढण्यात आला. ब्रिटनमध्ये ग्राहकांना 1GB डेटासाठी 6.66 डॉलर म्हणजेच 468 रुपये मोजावे लागतात, तर अमेरिकेत 1GB डेटासाठी ग्राहकांचे 12.37 डॉलर म्हणजे तब्बल 869 रुपये खर्च होतात.

जागतिक स्तरावर 1GB डेटाची सरासरी किंमत 8.53 डॉलर म्हणजे 600 रुपये आहे. तरुण वर्ग जास्त असणाऱ्या देशांमध्ये तंत्रज्ञानाबद्दल जागरुकता अधिक आहे. भारत हे एक जिवंत मोबाईल मार्केट असल्याचा निष्कर्षही या अभ्यासातून नोंदवण्यात आलाय. भारत जगातला सर्वात तरुण देश म्हणून ओळखला जातो. कारण, भारतात तरुणांची संख्या सर्वाधिक आहे.

भारतात 43 कोटींपेक्षा अधिक स्मार्टफोन युझर्स आहेत. चीननंतर भारत स्मार्टफोनसाठी सर्वात मोठं मार्केट आहे. मुकेश अंबानी यांनी सप्टेंबर 2016 मध्ये जिओ लाँच करत दूरसंचार कंपन्यांची झोप उडवली होती. भारतातही 1GB डेटासाठी 300 ते 400 रुपये मोजावे लागत होते. पण जिओनंतर यामध्ये मोठा बदल घडून आला. डेटासोबतच व्हॉईस कॉलिंगसाठीही कंपन्यांकडून आकर्षक ऑफर देणं सुरु झालं.

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?