
भारतीय ऑनलाईन गेमिंग कंपनी SuperGaming ने १५ दशलक्ष अमेरिकन डॉलरचा ( सुमारे १३२ कोटी रुपये ) फंड मिळवला आहे. ही रक्कम या कंपनीच्या १०० अमेरिकन डॉलरच्या व्हॅल्युएशनवर मिळाली आहे. पुणे स्थित ही कंपनी MaskGun आणि Indus Battle Royale सारखे गेम तयार करते. हे गेम्स भारतात खूपच प्रसिद्ध आहे.
लेटेस्ट राऊंडमध्ये मिळणारा हा फंड कंपनीच्या चार वर्षांपूर्वीच्या बाजारमुल्याच्या ५ पट जादा आहे. आता कंपनीची व्हॅल्युएशन १०० दशलक्ष डॉलर इतका आहे. ही माहीती कंपनीच्या टॉपच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Super Gaming चे CEO आणि को-फाऊंडर रोबी जॉन यांनी कंपनीने साल 2021मध्ये 21 दशलक्ष अमेरिकी डॉलर व्हॅल्यूशनवर 5 दशलक्ष अमेरिकन डॉलर रक्कम जमविली आहे.
या नव्या फंडींग राऊंडमध्ये Skycatcher आणि Steadview Capital सर्वात पुढे राहिले आहे. तसेच a16z Speedrun, Bandai Namco चा 021 Fund, Neowiz आणि Web3 क्षेत्रातील गुंतवणूकदार जसे Polygon Ventures देखील याचा भाग राहिले आहेत.
MaskGun आणि Indus Battle Royale सारखे भारतीय शूटिंग गेम्स बनवणारी कंपनी SuperGaming या फंडचा वापर आपल्या ग्लोबल एक्सपेंशनसाठी करणार आहे. कंपनी आता त्याय देशातील गेम डेव्हलपर्स आणि पब्लिशर्सना मदत करणार ज्यांच्याकडे स्वत: तंत्रज्ञान विकसित करण्याची सुविधा नाही.
कंपनीने ‘हायपर-लोकल’ स्ट्रेटजी फॉलो केली आहे. त्यानंतर ते स्थानीय संस्कृती दाखवणारे गेम तयार करणार आहेत. जे गेमिंगच्या जगात स्थानिक संस्कृती अभावाने आढळते. यात मध्य पूर्वचे देश आणि लॅटीन अमेरिका देखील सामील आहेत.
SuperGaming गेमिंग जागतिक विस्तार करताना सर्वात आधी लॅटीन अमेरिकेत लाँचिंग करणार आहे. यासाठी तिने LOUD.GG बरोबर भागीदारी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
रोबी जॉन यांनी सांगितले की Indus गेमने आम्हाला भारतात सुमारे ५ ते ७ दशलक्ष डॉलरचा बिझनस मिळाला आहे. परंतू ज्या देशात मार्केट वेगाने विस्तारत आहे तेथे जादा कमाई होऊ शकते. तेथे भारताच्या तुलनेत तीन पट कमाई होऊ शकते.
रोबी जॉन यानी पुढे सांगितले की ब्राझील वा युरोप सारख्या देशात आमची मॉनिटाझेशन कॅपबिलिटी ३ ते ५ पट चांगली आहे. Skycatcher चे फाऊंडर आणि फंड मॅनेजर सिया कमाली यांनी सांगितले की त्यांच्या फर्मने साल २०२१ मध्ये सुपरगेमिंगच्या सिरीज A फंडींगमध्ये गुंतवणूक केली होती आणि आता ती याचा विश्वासाला पुढे नेत आहे.