AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना कोणतेही ॲप इन्स्टॉल करण्याची आवश्यकता, ‘या’ ट्रिक्सच्या मदतीने इंस्टाग्रामवर खेळा मोफत गेम

तुम्हालाही तुमच्या आवडत्या ॲप इंस्टाग्रामवर रील्स पाहण्याचा कंटाळा येत असेल तर ही ट्रिक तुमच्यासाठी आहे. आता तुम्ही इंस्टाग्रामवर फक्त रील्सच नाही तर गेम देखील खेळू शकता. यासाठी इतर कोणतेही ॲप चार्ज करण्याची किंवा इन्स्टॉल करण्याची आवश्यकता नाही. चला तर मग या ट्रिक्स बद्दल जाणून घेऊयात...

ना कोणतेही ॲप इन्स्टॉल करण्याची आवश्यकता, 'या' ट्रिक्सच्या मदतीने इंस्टाग्रामवर खेळा मोफत गेम
| Edited By: | Updated on: Jul 22, 2025 | 10:39 PM
Share

आजकाल प्रत्येकजण मनोरंजनासाठी सोशल मिडियावर खूप सक्रिय असतात. अशात इंस्टाग्राम हे खूप लोकप्रिय अॅप आहे. कारण इंस्टाग्राम हे केवळ रील्ससाठीच नाही तर इतर अनेक कारणांमुळे लोकांची पसंती आहे. 2025 मध्ये जगभरात इंस्टाग्रामचे 2 अब्जाहून अधिक सक्रिय वापरकर्ते आहेत. त्याच वेळी भारतात इन्स्टाग्रामचे 414 दशलक्ष वापरकर्ते आहेत. अर्थात लाखो वापरकर्ते केवळ रील्स किंवा पोस्टसाठीच नव्हे तर इतर अनेक कारणांसाठी देखील त्याच्याशी जोडलेले आहेत. प्लॅटफॉर्मवर, तुम्ही जगभरातील लोकांशी कनेक्ट होऊ शकता, तुमच्या मित्रांशी आणि कुटुंबाशी कनेक्ट राहू शकता, इतकेच नाही तर कंटाळा आल्यावर तुम्ही मोफत गेम देखील खेळू शकता.

हो, तुम्हाला आता इंस्टाग्रामवर मोफत गेम खेळता येणार आहे. चला तर मग आजच्या या लेखात तुम्ही इंस्टाग्रामवर गेम कसा खेळायचा याबद्दल जाणून घेऊयात…

इंस्टाग्रामवर गेम कसे खेळायचे?

इंस्टाग्रामवर गेम खेळण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागणार नाही. तसेच तुम्हाला फोनमध्ये कोणताही थर्ड पार्टी अॅप इन्स्टॉल करावा लागणार नाही. तुम्ही घरी किंवा फोनवर कुठेही हवे तेव्हा खेळायला सुरुवात करू शकता. येथे आम्ही तुम्हाला हा गेम कसा खेळायचा हे सांगणार आहोत.

खेळ सुरू करण्याची प्रक्रिया

इंस्टाग्रामवर गेम खेळण्यासाठी तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही. फक्त इंस्टाग्राम ॲप उघडा. यानंतर कोणत्याही व्यक्तीच्या चॅट सेक्शनमध्ये जा. तुम्ही तुमच्या स्वतःच्या चॅटमध्ये देखील जाऊ शकता.

यानंतर चॅट सेक्शन उघडेल. आता कोणताही एक इमोजी निवडा आणि तो पाठवा. पाठवल्यानंतर तो इमोजी काही सेकंदांसाठी दाबा. असे केल्याने तुम्ही गेममध्ये पोहोचाल.

तुमचा खेळ सुरू होईल. तुम्ही निवडलेला इमोजी मैदानात उड्या मारताना दिसेल. तुम्हाला फक्त खात्री करावी लागेल की तो जमिनीला स्पर्श झाला नाही पाहिजे. यासाठी तुम्ही तळाशी दिलेल्या स्लायडरने इमोजी मुव्ह करू शकता आणि अशारितीने हा गेम खेळू शकता . तुम्ही तो स्लायडर उजवीकडे-डावीकडे मुव्ह करू शकता.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.