1 नोव्हेंबरपासून नवा नियम लागू! कॉल आल्यावर मोबाईल स्क्रीनवर या गोष्टी दिसणार…वाचा निर्णय काय?

ही सेवा एकदा सुरू झाली की सिमकार्ड ज्या नावावर आहे, तेच नाव कॉल केल्यावर दिसेल. तसेच कॉल संपल्यावर डेटा बेसमधून ते नाव लगेच उडवले जाईल. प्रत्येक मोबाईल वापरकर्त्याच्या सुरक्षिततेसाठी हा नियम पाळला जाईल.

1 नोव्हेंबरपासून नवा नियम लागू! कॉल आल्यावर मोबाईल स्क्रीनवर या गोष्टी दिसणार...वाचा निर्णय काय?
caller id and telecom companies rules
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 15, 2026 | 4:04 PM

Telecom Company Caller ID : फारतात मोबाईल कॉल करून अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्यात आलेला आहे. दुसरीकडे अनोळखी लोकांकडून केले जाणारे कॉल हादेखील डोकेदुखी वाडवणारा त्रास आहे. दरम्यान, आता हाच त्रास कमी व्हाव तसेच नेमका कुणाचा कॉल येतोय, हे लगेच समजावे यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. येत्या 1 नोव्हेंबर रोजीपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. हा निर्णय लागू केल्यानंतर सामान्यांवर नेमका काय परिणाम पडणार, हेदेखील विचारले जात आहे. त्यामुळे हा निर्णय नेमका काय आहे? सामान्यांवर नेमका काय परिणाम पडणार ते जाणून घेऊ या…

नेमका नवा निर्णय काय? काम कसं करणार?

नको असणारे तस स्पॅम कॉल्सपासून सुटका व्हावी यासाठी सरकारने निर्णय घेतला आहे. देशाच्या टेलिकॉम विभागाने सर्व टेलिकॉम कंपन्यांना येत्या एक नोव्हेंबर रोजीपासून Calling Name Presentation (CNAP) सेवा शुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. ही सेवा भारताची स्वत:ची ऑफिशियल व्हेरिफाईड कॉलर आयडेंटिफिकेशन सिस्टीम असेल. या सेवेअंतर्गत तुम्हाला कॉल आला की कॉल करणाऱ्या व्यक्तीचा नंबर तसेच त्याचे संपूर्ण नाव दिसेल. ही सेवा सर्वच 4जी आणि 5जी मोबाईल नेटवर्कवर सक्रीय होईल. ही सेवा सक्रिय करण्यासाठी कोणतीही सेटिंग सुरू करण्याची गरज नाही. आपोआपच ही सेवा तुमच्या मोबाईल फोनवर सुरू होईल. 2जी तसेच 3 जी फोनवर ही सेवा कशी सुरू करायची यावर नंतर सरकार वेगळा विचार करणार आहे.

Loading...

आंतरराष्ट्रीय कॉल आला की…

ही सेवा एकदा सुरू झाली की सिमकार्ड ज्या नावावर आहे, तेच नाव कॉल केल्यावर दिसेल. तसेच कॉल संपल्यावर डेटा बेसमधून ते नाव लगेच उडवले जाईल. प्रत्येक मोबाईल वापरकर्त्याच्या सुरक्षिततेसाठी हा नियम पाळला जाईल. तुम्हाला एखादा आंतरराष्ट्रीय कॉल आल्यावर तुमच्या मोबाईल स्क्रीनवर आंतरराष्ट्रीय कॉल म्हणून दाखवले जाईल. एखाद्या कंपनीचा किंवा व्यावसायीक उद्देशाने मोबाईल नंबर वापरला जात असेल तर तसा पर्याय निवडण्याची मुभा असेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us