बोटाने स्क्रोल न करताही आता पाहा तासंतास इन्स्टाग्राम रिल्स, करा फक्त ही छोटी सेटिग्स

तुम्ही इन्स्टाग्राम चालवत असाल तर ही ट्रिक तुमच्यासाठी उपयोगी पडू शकते. यानंतर तासंतास रिल्स स्क्रोल करण्यासाठी बोटाचा वापर करावा लागणार नाही. स्क्रीनला स्पर्श न करता तुम्ही रील्समधून स्क्रोल करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त फोनमध्ये एक छोटी सेटिंग करावी लागेल.

बोटाने स्क्रोल न करताही आता पाहा तासंतास इन्स्टाग्राम रिल्स, करा फक्त ही छोटी सेटिग्स
| Edited By: | Updated on: Feb 21, 2025 | 7:51 PM

तुम्ही इन्स्टाग्राम युजर्स असाल तर ही बातमी नक्की वाचा. अनेकदा इन्स्टाग्रामवर रिल्स स्क्रोल करताना हात थकतात. मग स्पर्श न करता रील्स बघता यावे अशी इच्छा प्रत्येकाची असते. तसे तर तुमचीही इच्छा पूर्ण होऊ शकते. तुम्हाला तुमच्या आयफोनवर एक छोटी सेटिंग बनवावी लागेल. यानंतर तुम्ही स्पर्श न करता रील्स पाहू शकता. यासाठी तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही, फक्त तुमच्या फोनमधील सेटिंग्जमध्ये जा. येथे तुम्हाला संपूर्ण सेटअप मिळेल. जाणून घ्या.

‘ही’ सेटिंग करा

स्पर्श न करता इन्स्टाग्राम रील्सवर कसे स्क्रोल करू शकतो? असा च विचार तुम्ही करत आहात, नाही का? त्यामुळे ही प्रक्रिया त्वरीत करा. यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या फोनच्या सेटिंगमध्ये जावे लागेल.

यानंतर थोडं स्क्रोल केल्यास तुम्हाला अ‍ॅक्सेसिबिलिटीचा पर्याय दाखवला जाईल. त्यावर क्लिक करा. अ‍ॅक्सेसिबिलिटीवर क्लिक केल्यानंतर सेटअप व्हॉईस कंट्रोलच्या पर्यायावर जा.

येथे क्रिएट न्यू कमांडवर क्लिक करा. आता इथे तुमच्या आवाजात नेक्स्ट म्हणा आणि आता रन कस्टमवर क्लिक करा. न्यू कमांडवर जा आणि इन्स्टाग्राम रील ज्या दिशेला स्क्रोल करते त्या दिशेने बोट सरकवा.
यानंतर उजव्या कोपऱ्यात दाखवलेल्या सेव्ह ऑप्शनवर क्लिक करा. आता इन्स्टाग्रामवर जा आणि त्याला हात न लावता तोंडाने नेक्स्ट म्हणत रील्स बघा.

इन्स्टाग्राम स्टोरी लपून पाहण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल, जाणून घेऊया.

‘या’ सोप्या स्टेप्स फॉलो करा

इन्स्टाग्राम स्टोरी लपून पाहण्यासाठी तुम्हाला फार काही करावे लागत नाही. यासाठी तुम्हाला ज्या व्यक्तीची स्टोरी बघायची आहे, त्याचं प्रोफाईल ओपन करावं लागेल.

प्रोफाईल उघडल्यानंतर स्टोरी पाहू नका, पेज रिफ्रेश करा. यानंतर प्रोफाईल ओपन ठेवून डायरेक्ट मेन्यूवर जा आणि एअरप्लेन मोड ऑन करा.

एअरप्लेन मोडनंतर त्या व्यक्तीच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवर परत येऊन इन्स्टाग्राम स्टोरीवर क्लिक करा. स्टोरी तुमच्यासमोर दिसेल.

स्टोरी पाहिल्यानंतर बॅकग्राऊंडमधून ते अ‍ॅप काढून फोन रिफ्रेश करा. असे केल्यानंतर फोन एअरप्लेन मोडवरून काढून टाका.

हे ट्रिक्स यासाठी महत्त्वाची आहे कारण, आयुष्यात असे काही लोक असतात ज्यांना प्रत्येक अपडेटवर लक्ष ठेवायचे असते, पण जर ते त्यांची इन्स्टाग्राम स्टोरी बघायला गेले तर कळू शकते. अशा वेळी पुन्हा पुन्हा बनावट अकाऊंट तयार करावे लागतात. त्यासाठी आम्ही वर दिलेली ट्रिक्स तुम्हाला उपयोगी पडू शकते.

आता तुमचं काम होईल. तुमचं स्टोरी व्ह्यू समोरच्याला दाखवलं जाणार नाही. याशिवाय जर तुम्हाला तुमची स्टोरी अधिक लाईव्ह लपवायची असेल तर तुम्ही हे देखील करू शकता.