ऐन दिवीळीत नेटकरी हैराण, इंटरनेट पडलं बंद, Amazon, Google ठप्प

Internet Outage: ऐन दिवाळीत नेटकऱ्यांना त्रासाचा सामना करावा लागत असल्याचे समोर आले आहे. जगातील बड्या वेबसाइट्स आणि अॅप्सना इंटरनेट सेवा खंडित झाल्यामुळे मोठा फटका बसल्या आहेत. जगभरातील युजर्सना Amazon, Google, Snapchat, Roblox, Fortnite, Canva या सेवा वापरण्यात अडचणी येत आहेत.

ऐन दिवीळीत नेटकरी हैराण, इंटरनेट पडलं बंद, Amazon, Google ठप्प
internate outage
| Updated on: Oct 20, 2025 | 5:33 PM

भारतासह जगातील बऱ्याच देशांमध्ये दिवाळीचा उत्साह पहायला मिळत आहे. मात्र आता ऐन दिवाळीत नेटकऱ्यांना त्रासाचा सामना करावा लागत असल्याचे समोर आले आहे. जगातील बड्या वेबसाइट्स आणि अॅप्सना इंटरनेट सेवा खंडित झाल्यामुळे मोठा फटका बसल्या आहेत. जगभरातील युजर्सना Amazon, Google, Snapchat, Roblox, Fortnite, Canva या सेवा वापरण्यात अडचणी येत असल्याचे समोर आले आहे. अनेकांनी याबाबत तक्रारीही केल्या आहेत. हे अॅप्स आणि वेबसाईट लोड होत नाही किंवा हळू चालत असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

नेटकरी हैराण

इंटरनेट सेवा खंडित झाल्यामुळे लोकप्रिय वेबसाईट्स आणि अॅप्स वापरताना नेटकऱ्यांना अडचणी येत आहेत. यामुळे जगभरातील नेटकऱ्यांनी Down Detector वर तक्रारी केल्या आहेत. जगभरातील अनेक महत्त्वाच्या अॅप्सने अचानक काम करणे बंद केले आणि वेबसाइट्सवरी सर्व्हर डाउन सारखा एरर मेसेज दिसत असल्याचे नेटकऱ्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

लाखो युजर्सवर परिणाम

Amazon Web Services (AWS) मध्ये अडचण निर्माण झाल्याने ही समस्या उद्भवल्याचे बोलले जात आहे. कारण AWS हा एक क्लाउड प्लॅटफॉर्म आहे जो हजारो वेबसाइट्स आणि अॅप्सना सर्व्हर, डेटाबेस आणि स्टोरेज प्रदान करतो. ज्यावेळेस AWS मध्ये अडचण निर्माण होते, त्यावेळी जगभरातील प्रमुख इंटरनेट कंपन्यांना त्याचा फटका बसतो. आताही अशीच समस्या निर्माण झाल्याने युरोप, आशिया आणि अमेरिकेतील लाखो यूजर्सवर त्याचा परिणाम झाला आहे.

प्रमुख वेबसाईट्स योग्यरित्या काम करत नसल्यामुळे अनेक नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर नाराजी व्यक्त केली. काही कंपन्यांनी नेटकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेतली असून आमची टीम या समस्येवर काम करत असल्याची माहिती दिली आहे.

हे प्लॅटफॉर्म बंद

इंटरनेट सेवा खंडित झाल्यामुळे स्नॅपचॅट, स्लॅक, सिग्नल, टिंडर, कॅनव्हा, Amazon, Amazon म्युझिक, Amazon प्राइम व्हिडिओ, Roblox, Clash Royale, Clash of Clans, Fortnite, Pokemon Go या साईट्स आणि अॅप्सवर लॉगिन करण्यास अडचणी येत आहेत. तसेच UK ची टॅक्स वेबसाइट HMRC आणि फ्रान्सच्या SFR आणि फ्री टेलिकॉम कंपन्यांनाही याचा फटका बसला आहे.

दरम्यान, AWS ने एक पत्रक जारी करत तांत्रिक समस्या सोडविण्याचे काम सुरू असल्याची माहिती दिली आहे. हळूहळू सेवा पूर्ववत होत आहे. काही वेबसाईट्स अजूनही काम करत नाहीत, मात्र ही समस्या लवकरच सुटेल असं AWSने म्हटलं आहे.