AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Flipkart सेलमध्ये Iphone वर 10000 रुपयांहून अधिक डिस्काऊंट

फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलचा (Flipkart Big Saving Days Sale) आज शेवटचा दिवस आहे. या सेलमध्ये तुम्ही आयफोन 12 मिनी खूप कमी किंमतीत खरेदी करू शकता.

Flipkart सेलमध्ये Iphone वर 10000 रुपयांहून अधिक डिस्काऊंट
| Edited By: | Updated on: Aug 09, 2021 | 7:28 PM
Share

मुंबई : फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलचा (Flipkart Big Saving Days Sale) आज शेवटचा दिवस आहे. या सेलमध्ये तुम्ही आयफोन 12 मिनी खूप कमी किंमतीत खरेदी करू शकता आणि ही तुमची शेवटची संधी आहे. फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये ई-कॉमर्स वेबसाईट 9901 रुपयांची सवलत देत आहे. यानंतर, आयफोन 12 मिनीची किंमत थेट 59,999 रुपयांपर्यंत जाईल. परंतु येथे तुम्ही इतरही अनेक डील्सचा लाभ घेऊ शकता आणि हा फोन 58,999 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करु शकता. (IPhone 12 mini price drops to 58,999 rupees at Flipkart sale, discount up to 10,000)

फ्लिपकार्ट या सेलमध्ये निवडक बँक कार्डवर 10 टक्के सूट देत आहे, ज्यात अॅक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँक कार्डचा समावेश आहे. येथे तुम्हाला 1000 रुपयांची सूट मिळते. या व्यतिरिक्त, तुम्ही ईएमआय खरेदी ऑप्शनचादेखील लाभ घेऊ शकता. आयफोन 12 मिनी तुम्ही 26 महिने दरमहा 2051 रुपये भरुन खरेदी करु शकता. परंतु या ऑफरमध्ये नो कॉस्ट EMI चा पर्याय देण्यात आलेला नाही.

डील अधिक जबरदस्त बनवण्यासाठी फ्लिपकार्ट येथे ग्राहकांना 15,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील देत आहे. याचा अर्थ असा की, जर तुमच्याकडे तुमचा जुना फोन असेल आणि तो चांगला चालत असेल तर तुम्ही आयफोन 12 मिनी 58,999 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता. ‘आयफोन 12 मिनी’ आणि ‘आयफोन 12’मध्ये 12 मेगापिक्सेल सेन्सरचा कॅमेरा देण्यात आला आहे. याचबरोबर 12 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Independence Day Sale : Xiaomi च्या TV वर बंपर डिस्काऊंट

Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल आणि फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डे सेल सध्या चर्चेत असले तरी शाओमी (Xiaomi) कंपनी येत्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विशेष सेल (इंडिपेंडन्स डे सेल) आयोजित करत आहे. यामध्ये एमआय आणि रेडमी ब्रँडेड स्मार्टफोन आणि स्मार्ट टीव्ही मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध आहेत. Xiaomi इंडिपेंडन्स डे सेल (Independence Day Sale) कंपनीच्या अधिकृत वेबसाइट Mi.com वर लाईव्ह आहे आणि आज (9 ऑगस्ट) रात्री 12 वाजेपर्यंत चालणार आहे. विक्री दरम्यान, स्मार्ट टीव्ही, स्मार्ट वेअरेबल्स आणि लाइफस्टाइल गॅझेटसह इतर अनेक शाओमी उत्पादने सवलतीसह उपलब्ध असतील.

या सेल दरम्यान कंपनीने अनेक स्मार्टफोन्सवर डिस्काऊंट देऊ केल्या आहे. यामध्ये Mi 10i (किंमत 20,499 रुपयांपासून सुरू होते), Mi 10T (किंमत 30,499 रुपये) आणि Redmi 9 (किंमत 8,799 रुपयांपासून सुरू होते) समाविष्ट आहेत. स्मार्ट टीव्हीमध्ये, Mi TV 4X (43-इंच) 28,999 रुपयांच्या परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध आहे, तर या वर्षी Redmi Smart TV X50 (50-inch) 36,999 रुपयांना विकला जात आहे. शाओमीच्या इंडिपेंडन्स डे सेलदरम्यान शाओमीचा 55 इंचाचा QLED स्मार्ट टीव्ही 58,999 रुपयांना विकला जात आहे.

इतर बातम्या

YouTube वरून कसे कमवाल महिन्याला हजारो डॉलर? काय आहेत अटी? वाचा

 भारतात केवळ 9 महिन्यांत चीनच्या ‘या’ स्मार्टफोनची 20 लाख युनिटची विक्री

अमेझॉनची डिलिव्हरी आता एका दिवसात, ‘या’ 50 शहरांमध्ये सुरु केली नवीन सेवा

(IPhone 12 mini price drops to 58,999 rupees at Flipkart sale, discount up to 10,000)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.