iPhone ची बॅटरी लवकर संपतेय? तर ‘या’ ट्रिक्सच्या मदतीने वाढवा बॅटरी लाईफ

बरेच आयफोन वापरकर्ते तक्रार करतात की फोनची बॅटरी पूर्णपणे चार्ज केल्यानंतरही काही तासातच बॅटरी संपते. पण याचा अर्थ असं नाहीये की फोनची बॅटरी खराब झालीये. तर तुम्ही या ट्रिक्सचा वापर करून फोनची बॅटरी लाईफ वाढवू शकता, चला या ट्रिक्सबद्दल लेखात जाणून घेऊयात.

iPhone ची बॅटरी लवकर संपतेय? तर या ट्रिक्सच्या मदतीने वाढवा बॅटरी लाईफ
iPhone Battery Life
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Edited By: | Updated on: Jan 03, 2026 | 3:14 AM

ब्रँडेड फोन खरेदी करण्याचा विचार केला की सर्वात आधी आयफोन लक्षात येतो. त्‍यामुळे दिवसेंदिवस आयफोन खरेदी करण्याची संख्या वाढतच जाते. अशातच बरेच आयफोन वापरकर्ते तक्रार करतात की सकाळी फोन पूर्णपणे चार्ज केल्यानंतरही संध्याकाळपर्यंत बॅटरी टिकतच नाही. त्यामुळे वापरकर्त्यांना आयफोनची बॅटरी दिवसभर टिकवणे हे एक मोठं आव्हानच ठरते. पण याचा अर्थ असा नाही की तुमची बॅटरी खराब झाली आहे. बहुतेक वेळा काही iOS सेटिंग्ज, बॅकग्राउंड अॅक्टिव्हिटी आणि अनेक ॲप्समुळे बॅटरी जलद संपू शकते. त्यामुळे तुम्ही आयफोनची बॅटरी खराब झालीय म्हणून बॅटरी बदलण्याऐवजी या काही सोप्या ट्रिक्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या आयफोनची बॅटरी लाइफ लक्षणीयरीत्या वाढवू शकता. चला तर मग आजच्या लेखात आपण या ट्रिक्सबद्दल जाणून घेऊयात.

बॅटरी कुठे सर्वात जास्त संपते?

आयफोनच्या सेटिंग्जमध्ये संपूर्ण बॅटरीचा वापर कोणता ॲप करतो याचा डेटा मिळतो. बऱ्याचदा, सोशल मीडिया, व्हिडिओ स्ट्रीमिंग किंवा गेमिंग ॲप्स बॅकग्राउंडमध्ये देखील बॅटरीचा जास्त वापर करत राहतात. हे ओळखणे आणि नियंत्रित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

बॅकग्राउंड ॲक्टिव्हिटी आणि लोकेशन सेटिंग्स मुळे बॅटरी लवकर संपते

फोनमधील अनेक ॲप्स बॅकग्राउंडमध्ये सतत रिफ्रेश होत राहतात ज्यामुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते. त्याचप्रमाणे जर लोकेशन सर्व्हिसेस नेहमीच चालू असतील तर जीपीएस सतत चालू असते. गरज नसताना या सेटिंग्ज मर्यादित केल्याने बॅटरी लाइफमध्ये लक्षणीय फरक पडू शकतो.

ब्राइटनेस आणि डिस्प्ले सेटिंग्जचा योग्य वापर

आयफोनची स्क्रीन बॅटरी लाईफसाठी एक मोठं कारण आहे. जास्त ब्राइटनेसवर फोन जास्त वेळ वापरल्याने बॅटरी लवकर संपू शकते. ऑटो-ब्राइटनेस चालू करणे आणि डार्क इंटरफेसचा वापर मर्यादित करणे स्क्रीनचा वापर कमी करण्यास मदत करू शकते. तुमच्या मॉडेलवर उपलब्ध असल्यास ऑलवेज-ऑन डिस्प्ले सारखी फिचर नेहमी बंद ठेवणे देखील फायदेशीर ठरू शकते.

Low Power Mode सर्वात सोपी ट्रिक्स

तुम्हाला जर कोणत्याही कारणाशिवाय बॅटरी वाचवायची असेल, तर लो पॉवर मोड हा त्यासाठी सर्वात प्रभावी मार्ग आहे. हे फिचर बॅकग्राउंड प्रक्रिया, ईमेल फेच आणि व्हिज्युअल इफेक्ट्स कमी करते, ज्यामुळे फोनमधील बॅटरीचा वापर कमी होतो. दररोजच्या वापरात हा मोड चालू ठेवल्याने तुमचा आयफोन जास्त काळ टिकू शकतो.

iOS अपडेट्स आणि चार्जिंग सवयी देखील जबाबदार आहेत

जुने iOS व्हर्जन किंवा वारंवार अयोग्य चार्जिंग यामुळे बॅटरी लाइफवर परिणाम होऊ शकतो. नियमितपणे अपडेट्स इन्स्टॉल करणे आणि जास्त चार्जिंग टाळणे यामुळे बॅटरीचे लाईफ जास्त दिवस राखण्यास मदत होऊ शकते.