iQOO Z10 Lite 5G स्मार्टफोनची भारतात विक्री सुरु,पाहा किंमत किती ?

या स्मार्टफोनमध्ये 6.74 इंच HD+ (720 x 1,600 पिक्सेल) LCD डिस्प्ले 90 Hz चा रिफ्रेश रेट आणि 1,000 निट्सच्या पिक ब्रायटनेस लेव्हलसह आहे. या फोनची किंमत दहा हजार रुपयांच्या आत आहे.

iQOO Z10 Lite 5G स्मार्टफोनची भारतात विक्री सुरु,पाहा किंमत किती ?
| Updated on: Jun 25, 2025 | 6:06 PM

चायनीझ स्मार्टफोन मेकर कंपनी iQOO च्या Z10 Lite 5G ची विक्री बुधवारपासून भारतात सुरु झाली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला कंपनीने हा स्मार्टफोन बाजारात लाँच केला होता. या फोनमध्ये MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमरा तर डयुअल रिअर कॅमेरा युनिट दिले आहे.

iQOO Z10 Lite 5G ची किंमत, कुठे मिळणार ?

iQOO Z10 Lite 5G स्मार्टफोनमध्ये 4 GB चा RAM आणि128 GB ची स्टोरेज क्षमता आहे. या स्मार्टफोनची किंमत 9,999 रुपये आहे. 6 GB + 128 GBचा व्हर्जन 10,999 रुपयांत तर 8 GB + 256 GB चे व्हर्जन 12,999 रुपयांत मिळणार आहे. या फोनमध्ये Titanium Blue आणि Cyber Green कलर्स मिळत आहेत. तसेच iQOO च्या मते या फोनला HDFC Bank या स्टेट बँक ऑफ इंडिया ( SBI) च्या क्रेडिट कार्डने खरेदी केले तर 500 रुपयांचा इंस्टन्ट डिस्काऊंट मिळणार आहे. मात्र, ही ऑफर विक्रीच्या पहिल्याच दिवशी ठेवली होती, या स्मार्टफोनची विक्री ई-कॉमर्स साईट Amazon आणि देशभरातील iQOO ई-स्टोअरद्वारे केली जात आहे.

Z10 Lite 5G ची वैशिष्ट्ये काय ?

या स्मार्टफोनमध्ये 6.74 इंचाचा HD+ (720 x 1,600 पिक्सेल) LCD डिस्प्ले 90 Hz चा रिफ्रेश रेट आणि 1,000 निट्सचा पीक ब्रायटनेस लेव्हल आहे. हा Android 15 वर बेस्ड FuntouchOS 15 वर चालतो.

यात प्रोसेसर म्हणून MediaTek Dimensity 6300 देण्यात आला आहे. iQOO Z10 Lite 5G मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) शी संबंधित काही फिचर्स देण्यात आले आहेत. यात AI Photo Enhance, AI Document Mode आणि AI Erase चा समावेश आहे. Z10 Lite 5G च्या ड्युअल रिअर कॅमरा यूनिटमध्ये f/1.8 अपर्चरसह 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमरा आणि 2 मेगापिक्सेलचा सेकेंडरी कॅमरा दिलेला आहे. या स्मार्टफोनच्या फ्रंटला सेल्फी आणि व्हिडिओ कॉल्ससाठी 5 मेगापिक्सेलचा कॅमरा दिलेला आहे.

सिक्युरिटीसाठी फिंगरप्रिंट सेंसर

या फोनमध्ये कनेक्टिव्हीटीसाठी 5G, Bluetooth, Wi-Fi, GPS, QZSS आणि USB Type-C पोर्टचा पर्याय दिलेला आहे. या स्मार्टफोनची 6,000 mAh ची बॅटरी 15 W चार्जिंगला सपोर्ट करत आहे.या फोनला मिलिट्री-ग्रेड ड्यूरबिलिटीसाठी MIL-STD-810H सर्टिफिकेशन मिळालेले आहे. या स्मार्टफोनचा आकार 167.3 mm x 76.95 mm x 8.19 mm आणि वजन जवळपास 202 ग्रॅम आहे. या फोनमध्ये सिक्युरिटीसाठी साऊंडवर फिंगरप्रिंट सेंसर दिलेला आहे.